Baby Mrunal Jadhav लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Baby Mrunal Jadhav लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, ऑगस्ट ३०, २०१६

दृश्यम (Drushyam)

विजय साळगावकर हा चौथी पास असून याचा व्यवसाय केबल ऑपरेटरचा असतो. याला सिनेमा बघण्याची खूपच आवड असते. त्याला इतकी पराकोटीची आवड असते, कि घरून आलेला फोन देखील हा मनुष्य घेत नाही, जेव्हा सिनेमा बघत ऑफिस मध्ये बघत बसतो. जरी हा चौथी पास झालेला असला तरी तसा तो खूप हुशार, आणि व्यवहारज्ञान असलेला मनुष्य असतो. आणि घरातील सगळ्या माणसांवर खूप प्रेम करत असतो. घरात दोन मुली आणि बायको इतकेच लोक असतात.

मोठी मुलगी कॉलेजमध्ये असते. आणि लहान मुलगी शाळेत जाणारी असते. विजय साळगावकरचे सासर पणजीला असते. मार्टिन नावाचा एक हॉटेल मालक हा विजय साळगावकरचा खूप चांगला मित्र असतो. या हॉटेल समोरच पोलिस स्टेशन असते. त्या पोलिस स्टेशन मधला सब-इंस्पेक्टर गायतोंडे हा खूप वाईट काम करत असतो, लोकांना उगीचच त्रास देणे, त्यांच्या कडून पैसे उकळणे, अशी काम करण्यामुळे विजयला गायतोंडे बद्दल अजिबात आदर नसतो. त्यामुळे जेव्हा जेव्हा मोका मिळेल तेव्हा विजय साळगावकर गायतोंडे ला त्याच्या या वागण्यावरून टोकत असतो. पण विजय हा एक खूप चांगला मनुष्य आहे असे मात्र इतर सगळ्या पोलिस ऑफिसरचे मत असते.

विजयच्या मोठ्या मुलीला अंजूला एकदा एका ट्रीपला जायचे असते, त्यासाठी विजयची बायको खूप आग्रह करून विजयला पटवते आणि अंजूला ट्रीपला पाठवते. त्या ट्रीपमध्ये एक सम नावाचा मुलगा, ट्रीपला आलेल्या मुलींचे फोटो काढत असतो. जेव्हा एका मुलीच्या लक्षात येते, तेव्हा ती सॅमवर खूप ओरडते आणि मग सॅम फोटो काढणे बंद करतो. पण हे सॅम रुपी वादळ अंजूच्या मागे लागते. एकदा अंजू कॉलेज मधून घरी येत असताना सॅम तिला अडवतो, आणि तिला म्हणतो कि मला भेटायला ये, पण अंजू त्याला नकार देते. मग सॅम तिला ब्लॅकमेल करतो आणि तो तिला तिचा ट्रीपला गेला असताना, ती अंघोळ करत असतानाचा व्हिडियो दाखवतो. आणि म्हणतो कि जर तू मला भेटली नाहीस तर हा व्हीडीओ सगळी पाठवला जाईल. हे ऐकून अंजू खूप घाबरते. घरी येते आणि तिला काहीच सुचेनासे होते. तिच्या आईच्या हे लक्षात येते.

अंजू, आईला सगळे सांगते, तोवर सॅम अंजूच्या घरी पोचलेला असतो. आता अंजूची आई सॅमला समजवायला जाते, पण सॅम आता विजय च्या बायकोच्या मागेच लागतो, आईला वाचवण्याच्या झटापटीत सॅमचा मृत्यू होतो.  दोघीही खूप घाबरून जातात, विजयला फोन करतात, पण विजय सिनेमात बघण्यात दंग असतो, तो फोन घेतच नाही.

घरी आल्यावर विजयला घरातील सगळी परिस्थिती कळते, मग ते ठरवतात कि आता आलेल्या परिस्थितीला धैर्याने तोंड द्यायचे. सगळ्या कुटुंबाने एकत्र ह्या संकटाचा सामना करायचा. विजय साळगावकरचे कुटुंब हि आलेली बला परतवून लावू शकतात का हे बघा "दृश्यम" या सिनेमात.

सिनेमा अफलातून आहे. प्रत्येक गोष्ट खूप सुंदर रीतीने मांडली आहे. सॅमच्या मृत्युचे पुरावे लपवणे असू दे, पोलिसांची तपास करण्याची दिशा असू देत, सगळ्या गोष्टी खूप उत्तम रीतीने मांडल्या आहेत. आपण कल्पना करू शकत नाही असे प्रसंग खूप बारकाईने दाखवले आहेत.

सगळ्या गोष्टींचा उलगडा सिनेमाच्या शेवटीच होतो. सिनेमा अक्षरश प्रेक्षकांना जागेवर  खिळवून ठेवतो. सिनेमा अगदी बघावाच असा आहे.


Vijay Salgaonkar is a school dropout and running a Cable Television business. He is a big fan of movies and spends a lot of time watching movies in his office. At times he woulf just remove telephone receiver off the hook, so that his wife does not disturb him while watching movies. Even thought he is a school drop out, he is very sharp and wise person. He just loves his family a lot. He has a small family of wife and two daughters.

His elder daughter is studying in college and younger one is in elementary school. His in laws are in a near bye town. There is a hotel near his office, where he frequents for break fast and tea. The owner Martin is a good friend of VIjay. Opposite the Hotel is the police station, so most of the police too frequent the hotel. One of the sun inspectors Gaitonde is particularly notorious person. He always troubles people around him, and also tries to extract undue advantage of his powers as police person. Vijay being a genuine person hates Gaitonde and on many occasions, tries to correct Gaitonde or stop for wrong doings. All the other police personnel have high respect for Vijay. 
Vijay's elder daughter Anju wants to attend a school educational camp. Vijay was not very keen but the ladies in the house convince him that it will be very useful. In that camp, there was guy called Sam. He was always with his cell phone camera taking pictures of all the girls. Finally one of the girls scolds him for that and he stops that non sense. But after a few days after the camp, Sam meets Anju again and tells her to meet him in a particular location. Anju denies that proposition ans then he shows her a video of her taking shower during the camp. He tells Anju, if she does not comply with what he is telling, the video will be circulated to lot of people on internet. Now Anju is scared and goes home. She is not able to tell this to her mother too. But the mother realizes that something is wrong.

 Finally Anju tells what has been happening since the afternoon. In the meantime Sam reaches Anju's backyard. Anju and her mother try to request him that he shoild not try to trouble or blackmail them, but at this point Sam gets attracted to Anju's mother and before he could touch her, Anju and attacks him and in the event Sam dies on the spot. Both of them scared now try calling Vijay, but as usual he is busy watching movie and is not reachable on phone. 
On reaching home, Vijay knows the whole situation, the family decides to face the situation together with courage. But it really possible to to manage such a situation with four members of the family? Specially with a person like Gaitonde seeking every opportunity to frame them? Watch it in Hindi Movie Drishyam.

This is one of the most interesting movie we have watched in recent times. It is really well done. The situations like hiding the evidences of death of Sam, anticipating course of action that police will take, and preparing the whole family to face it etc. The plot and execution is really done well. A lot of suspense really remains suspense till the end. 

This is certainly a must watch movie, and it is already being remade in several Indian languages from the original Malayalam version. 


Direction
  • Nishikant Kamat

Cast


गुरुवार, जानेवारी २१, २०१६

तू ही रे (Tu Hi Re)

नंदिनी एका खेड्यात राहण्याऱ्या खूप मोठ्या कुटुंबातील वाढलेली मुलगी असते. तिचे सिद्धार्थ नावाच्या शहरात वाढलेल्या इंजिनियरशी लग्न ठरते. लग्नाच्या पहिल्या रात्री नंदिनी सांगते कि तिला खरतर हे लग्न करायचे नव्हते कारण तिला लव-मॅरेज करायचे होते. पण आता लग्न झालय त्यामुळे जसा काय नवरा असेल तो तिने पत्करला आहे.

नंदिनी आणि सिद्धार्थ या दोघांना एक पीहू नावाची मुलगी असते. सिद्धार्थ एका प्रायव्हेट कंपनी  नोकरी करत असतो. तो इंजिनियर असतो. नंदिनी एका कंपनी मध्ये रिसेप्शिनस्टची नोकरी करत असते. दोघांचे एकमेकांवर निरतिशय प्रेम असते. या तिघांचे कुटुंब एकदम मजेत जगत असते. सिद्धार्थला कंपनी मध्ये एक कॉन्ट्रॅक्ट मिळवायचा असतो, पण तो कॉन्ट्रॅक्ट घेण्यासाठी जो मनुष्य येतो त्याला बघून सिद्धार्थ चपापतो कंपनीसाठी डील करण्याऐवजी हा मनुष्य सिद्धार्थ बरोबर डील करतो कि, तू नंदिनीला ठेवतोय त्याहीपेक्षा जास्त मी नंदिनीला सुखी ठेवीन. अर्थातच सिद्धार्थ त्याला काही बोलत नाही. घरी पण नंदिनी पासून हे घडलेले लपवून ठेवतो.

सिद्धार्थला त्या मनुष्याने दिलेली ऑफर खूप मानसिक त्रास देत असते. त्याचा परिणाम नंदिनी आणि सिद्धार्थच्या संबंधांवर होतो. दोघांची उगाचच वादावादी होते, सिद्धार्थ नंदिनीवर रागवतो. हे सगळे झाल्यावर नंदिनीला शंका येते कि सिद्धार्थ तिच्या पासून काहीतरी लपवून ठेवतोय. त्यात भर म्हणून पोस्टाने एक पाकीट येते. त्यात सिद्धार्थचे लग्न झालेले फोटो नंदिनीला सापडतात. ते बघून नंदिनी खूपच अस्वथ होते. आणि आता हे नक्की काय प्रकरण आहे हे शोधून काढायचे ठरवते. अर्थातच हे सगळे ती सिद्धार्थच्या अपरोक्ष करत असते. सिद्धार्थला याबद्दल काहीच कल्पना नसते.



सगळ्यात प्रथम नंदिनी सिद्धार्थचा खूप जवळचा मित्र प्रसादला भेटते. प्रसाद तिला सुरवातीला सांगण्याची टाळमटाळ करतो. पण नंदिनी जेव्हा त्याला पोस्टाने आलेले फोटो दाखवते, तेव्हा मात्र तो खोटे बोलू शकत नाही. तो नंदिनीला सगळी गोष्ट सांगायचे काबुल करतो, जेणे करून नंदिनीच्या मनात कुठलीही शंका राहणार नाही. आता नक्की या गोष्टीमध्ये काय असते, त्या फोटोमध्ये असलेले सिद्धार्थचे लग्न ही काय भानगड आहे हे बघा "तू ही रे" मधे. 

सिनेमा चांगला आहे. पण सुरवातीचे सिद्धार्थ आणि नंदिनीचे प्रेम दाखवून स्टोरी खूप लांबवली आहे असे वाटले. त्यात खूप जास्त वेळ गेला आहे. त्याचप्रमाणे पिहुचे बरेच संवाद फारच आगावू वाटतात सिनेमात प्रेमाचा त्रिकोण आहे हे लवकरच उघड होते. पण त्याचा शेवट नक्की कसा होतोय हे बघण्याची उत्सुकता मात्र लागून राहते. सिनेमाचा शेवट अपेक्षित असाच आहे. पण क्लायमॅक्स जवळ आल्यावर नक्की काय शेवट असेल अशी उत्सुकता वाटते. सिनेमा बघावाच असे काही नाही, पण बघितल्यास फार पश्चाताप होणार नाही. सई ताम्हणकर खूपच चांगली दिसतेय तिने काम पण चांगले केलय. अर्थात भैरवीच्या भूमिकेत तेजस्विनी पंडित चांगली दिसतेय. 

हा सिनेमा बघितला असल्यास किंवा इतर काही प्रतिक्रिया असल्यास  द्याव्या. 



Nandini is a girl from a rich family in a village. She gets married to Sidhharth, who is a city guy and an engineer. First chance she gets to talk to him, she tells him that she intended to love someone, and then marry the same person, but now that she is married to him, she will be very faithful to him.

Fast forward eight years, now Nandini and Sidhharth have a daughter called Pihu. Shdhharth has become engineering manager in a private company. Nandini is also working as a receptionist in another company. Both Nandini and Sidhharth are totally in love with each other and the the family of three is very happy family. 

One day, when Sidhharth reaches office, he meets a high official. Sidhharth looked shocked to see him, but pretends nothing has happened. The person is suppose to sign a very big deal with the company. He offers Sidhharth to sign the contract on condition that Sidhharth should let him take care of Nandini, and he will do it in much better way. Sidhharth keeps quiet and does not even mentions this to Nandini.


Sidhharth is very disturbed by the offer and his behavior changes at home with family. Him and Nandini have frequent arguments without much reason. At that point Nandini starts thinking there is something going on in Sidhharth's mind, which he is not talking out. To add fuel to this suspicion Nandini receives a envelop with photographs showing Sidhharth getting married. This now causes turmoil in Nandini's mind. She decides to find out the truth behind all this, without confronting Sidhharth. Sidhharth is totally unaware of Nandini's struggle. 

Nandini starts with Prasad, who is Sidhharth best friend and knows him for years. He was also there in one of the photos that Nandini received. Prasad denies any knowledge of this, but when Nandini confronts him with the photographs, he agrees to tell her everything in detail, so that there is no confusion in her mind. Now telling you what was the incidences that Prasad narrates would be spoiler and should be watched in the movie "Tu hi re".

Cinema is good. But goes bit slow while Sidhharth and Nandini's happy married life is continuing. But later catches some good pace. Pihu seems to be over smart and bit of over acting. The love triangle is known but still remains interesting for a while. Close to climax, the story line is clear but continues well till the end. Both Sai Tamhankar and Tejaswini Pandit are looking good and acted well. Won't recommend movie as must watch but a good pass time.

Do let us know your comments.  



Direction