Farmer लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Farmer लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, मार्च १०, २०१०

मेड इन चायना (Made in China)


अप्पा जगदाळे खूप मोठे राजकारणी. यांची पिंपळगावला खूप जमीन असते. पुणे-मुंबई रस्त्यावर जर सेझ (स्पेशल इकॉनॉमिक झोन) आणला तर तेथील भागाची खूप प्रगती होईल व त्याचबरोबर स्वताला पण बरेच पैसे मिळतील, अश्या विचाराने अप्पासाहेब थडानी नावाच्या मोठ्या व्यावासिकाबरोबर हातमिळवणी करतात. आता याच भागात पिंपळगाव असल्याने तिथली जमीन मिळवणे पण सोपे होणार, आणि सगळ्या भागाचा विकास होणार या कल्पनेने सगळे लोक आनंदाने त्यांची जमीन विकतील असे अप्पासाहेबांना वाटते. अप्पाना एक मुलगी असते, तिचे नाव प्राची. प्राचीचे सगळे शिक्षण अमेरिकेत झालेले असते. अप्पांचे भाऊ, भाऊसाहेब जगदाळे, यांना २ मुले, दीपक व मोहित. दीपकला अप्पांनी स्वताबरोबर राजकारणात घेतले असते. व प्राची पण त्यांच्याकडे राजकारणाचे धडे घेत असते. दीपक हा बाहेरख्याली असतो, शिवाय त्याला जुन्या शस्त्रांचा संग्रह करण्याचा छंद असतो. दीपकचे त्याच्या बायकोबरोबर खास पटत नसते. इकडे मोहित व त्याची बायको निलांबरी हे दोघे खूप सुखी असतात. व निलूला दिवस गेले असल्याने दोघे खूपच खुश असतात.


मोहितने इस्त्रालय मध्ये जाऊन शेतीचे शिक्षण घेऊन इथे आधुनिक प्रकारची शेती करत असतो. व पिंपळगाव मधील सगळ्या शेतकर्यांना देखील आधुनिक शेतीचे ज्ञान देऊन तिथे खूपच प्रगती होते. तेथील माल एक्स्पोर्ट होत असतो. SEZ मुले आता सगळी जमीन थडानीला देणे मोहितला अजिबात पटत नाही.

याच गावात राहणारा अप्पांचा विरोधक कैलाश शिंदे याला देखील हि गोष्ट पटत नाही. आता थडानी सारख्या मोठ्या उद्योगपतीला तोंड द्यायचे म्हणून कैलाश त्यांच्या कार्यकर्त्यांकरवी हिंसेचा मार्ग अवलंबतो. जेव्हा जमिनीचा सर्वे करण्यासाठी जेव्हा लोक येतात तेव्हा हे कार्यकर्ते त्यांना चांगले बडवून काढतात. मोहित कैलाश बरोबर हात मिळवणी करायला जातो. कारण दोघांचा उद्देश एकाच असतो सगळ्या सुपीक जमिनी वाचवणे. पण कैलाश मोहितवर विश्वास ठेवत नाही. व दोघे आपापल्या मार्गाने अप्पाना सगळ्या जमिनी थडानीला देण्यात अडथळे निर्माण करतात. SEZ प्रकरण असे बरेच चिघळत जात असते, आणि चित्रपटाला एकदम कलाटणी मिळते. अप्पाचा एका मॉल मध्ये खून होतो. त्यामुळे SEZ प्रकरण जरा थंड होते व आता पुढे SEZ चे काय होणार असे वाटू लागते. पोलीस अप्पांच्या खुनाचा शोध घ्यायला येतात. या शोधात नक्की काय सापडते, कोणी खून केला असेल, सेझसाठी लागणाऱ्या जमिनी थडानीला मिळतात का हे बघा "मेड इन चायना" मध्ये.


सिनेमा ठीक आहे. SEZ म्हणजे नक्की काय हे या सिनेमातून नीटसे समजत नाही. SEZ नावाचे काहीतरी असते, हे फक्त कळते. सेझ हि संकल्पना चायनाने सुरु केली आहे त्यामुळे या सिनेमाला मेड इन चायना असे नाव देण्यात आले आहे. नावाकडे बघून असे वाटते, कि चीन मधून भारतात एक्स्पोर्ट होणाऱ्या गोष्टीमुळे नक्की काय होतंय, याचे चित्रण असेल, पण तसे काही होत नाही. पूर्वार्धात सुपीक जमिनी जाऊ नये, म्हणून शेतकऱ्यांचा लढा असेल अशी वाटणारी गोष्ट उत्तरार्धात रहस्यकथा वाटायला लागते. सोनीवर बघत असलेला CID कार्यक्रम बघत आहोत कि काय असं वाटू लागते. सिनेमात एकाच गाना आहे, आणि ते पण आता कशाला उद्याची बात चे रिमिक्स. ते काही खूप छान नाही. एकूण सिनेमा ठीक आहे. रहस्यकथा आवडत असेल तर बघावा असा. पण शेवटच्या काही मिनिटात आपण खुनी कोण आहे हे देखील ओळखतो.

अभ्यासू लोकांना जर SEZ बद्दल माहिती हवी असेल तर इथे लिंक दिली आहे. या सिनेमाला मेड इन चायना हे नाव का दिले आहे याचा शोध घेत असताना SEZ बद्दल बरीच माहिती मिळाली. हीच माहिती काही थोड्या संवादातून टाकली असते तर अधिक चांगले झाले असते.


Mohit Jagdale is a progressive farmer is Pimpalgaon. He is staying with his wife Nilambari and Grandmother. Appasaheb Jagdale, his uncle is Politician and Member of Parliament for the region. He is very renowned for his good developmental work in the region. He has one daughter Prachi, who has studied management abroad, and is back to Pimpalgaon to work with her father. Deepak is elder brother of Mohit, who is also in politics with his uncle Appasaheb. Deepak is characterless and treats his wife Yogita is unhappy due to this. Deepak has a hobby for collecting weapons and has a good collection of antic weapons and guns.


Appasaheb decides to get Special Economic Zone (SEZ) to his region, and develops ties with a businessman called Thadani. This needs a huge land of the order of 45 thousand acres for the project. This land needs to be procured from all the farmers of the region. So many families will loose their land and in turn their source of income. As part of the deal, Appasaheb is responsible to handle procurement of the land using his goodwill and political powers. Thadani on the other hand would invest in the infrastructure and develop the industries and townships.

Several people including Mohit are unhappy about this. Another major opposition is from Kailash Shinde, who is opposition politician in the town. His father has disappeared few years back, who was also opposing Appasaheb, and Kailash believes Appasaheb is behind his disappearance. He has a Agriculture supplies business and is worried if the lands are converted into industries, his business will close down. Both Kailash and Mohit have their own setsof supporters.


Bhausaheb, Mohit's father and Appasaheb's brother was a simple man, and respects farming then anything else. After his death Appasaheb supported Mohit and sent him to Israel for further training in agriculture. On his return he told him to take charge of the farmland and transform it into model agriculture. Thadani has been doing business in the region and has been major customer for agricultural and dairy products. Mohit has established modern dairy and poly-house for export oriented Flori-culture. With the new proposal his whole profession is in danger. So he tries to convince Appasaheb against the plan, but he faltly refuses and looses Mohit's respect.


Mohit tries to join hands with Kailash to protest against SEZ. But Kailash does not believe him and refuses to work with him. The whole issue is getting complicated and Appasaheb is killed by a shooter in a mall, while he was inaugurating it. The movie becomes a mystery at this point. Who is the killer ? What happens to the plan of SEZ ? Who succeeds Appasaheb in his political career ?

The movie starts with political movie with a theme of agriculture versus development. It touches issues like should a good fertile and well developed land be converted into industry ? Would people dependent of farmlands as their source of income, get decent jobs in the proposed industries or they will be left with labor jobs like sweepers etc. ? It it good idea to borrow concepts like SEZ blindly ?


It took some time for me to research and understand why the movie is named Made in China. The main concept of SEZ was developed and demonstrated successfully in China and was then copied by several other developing countries. More information on SEZ can be found here.

I would recommend you to watch the movie, if you enjoy Mystery movies and movies which make you think a bit. There is no powerful character role in the movie, though there are several renowned actors like Madhura Valankar, Sandeep Kulkarni, Milind Gunaji, Mrunal Kulkarni. Dr. Sharad Bhutadiya has justified his role in the movie well.


Cast
  • Sandeep Kulkarni संदीप कुलकर्णी
  • Milind Gunaji मिलिंद गुणाजी
  • Mrunal Kulkarni मृणाल कुलकर्णी
  • Upendra Limaye उपेंद्र लिमये
  • Madhura Velankar मधुरा वेलणकर
  • Deepshikha दीपशिखा
  • Dr. Sharad Bhutadiya डॉ. शरद भुताडिया
  • Shilpa Nawalkar शिल्पा नवलकर
  • Puja Naik पूजा नाईक
  • Uttara Bawkar उत्तरा बावकर
  • Anand Alakunte आनंद अलकुंटे
  • Kanchan Pagare कांचन पगारे

Director
  • Santosh Kolhe संतोष कोल्हे


Link to Watch online


Official website

गुरुवार, नोव्हेंबर १२, २००९

गोष्ट छोटी डोंगराएवढी (Goshta chhoti dongaraevadhi)



राजाराम शेतीचे शिक्षण घेऊन नोकरीच्या शोधात असतो, त्यात त्याला एका आमदाराला ३ लाख दिल्यास नोकरी मिळेल असे कळते व तो आपली जमीन विकून पैसे देण्याचा विचार करतो. पण त्याची आई त्याला तसे करू देत नाही, त्यामुळे तो गावी येऊन शेती करायची असे ठरवतो. त्याचा लंगोटीयार "नंदा" इथेच गावात असतो, एक मुलगा, घरी आई व लग्नाला आलेली बहिण असा मोठा संसार घेऊन, शेती करत असतो. कोरडवाहू जमीन असल्याने कापूसची लागवड केलीली असते, कापसाचे पैसे सरकारकडे अडकलेले असतात. विहीर खणायला देखील कर्ज काढावे लागते, आणि मग खत, बियाण्याला तर काढावेच लागते. त्यामुळे नंदा अगदीच कर्जबाजारी झालेला असतो. इकडे राजाराम स्वत शेती करायला घेतो तो पण कर्ज काढतो, पण नंदा पेक्षा त्याची परिस्थिती जरा बरी असते. कर्ज काढायला गेले, किंवा खत, बियाणे विकत घ्यायला गेले, तरी सगळीकडे भ्रष्ट्राचार बघून दोघेही खचून जातात. इकडे गावात एका NGO मधून वैदेही नावाची एक मुलगी गावातील प्रश्न आणि त्यावरील उत्तर शोधण्याचा प्रयत्न करून एक अहवाल लिहिणार असते. त्यामुळे राजाराम आणि वैदेही यांच्यामध्ये बरीच वैचारिक चर्चा होत असते. इतक्यात अतिशय कर्जबाजारी झाल्याने नंदाला काही सुचेनासे होते आणि नंदा कीटकनाशक खाऊन आत्म्यहत्या करतो. त्यानंतर गावात २-३ शेतकरी आत्म्यहत्या करतात. या सगळ्या प्रकाराने राजाराम खूप विचार करू लागतो आणि त्याला एक युक्ती सुचते. त्या प्रमाणे तो ठरवतो कि शेतकऱ्याच्या प्रश्नाला सरकार जबाबदार आहे आणि त्यासाठी सरकारला शिक्षा झालीच पाहिजे. तो शिक्षा कशी करतो आणि त्याचे पुढे काय परिणाम होतात हे बघा "गोष्ट छोटी डोंगराएवढी" मध्ये.


सिनेमामध्ये राजाराम आणि नंदा हे दोन शेतकऱ्यांचे प्रतिनिधी, त्यांचे संवाद खूप विचार करण्याजोगे आहेत. सगळीकडे जो भ्रष्टाचार माजला आहे ते बघून मनाला खरच त्रास होतो. पण त्यांनी जे दाखवले आहे ते खुपच अतिशोयक्तिचे आहे असे वाटले. शेताकर्यांचा प्रश्न खरच आहे, पण त्यात शेतकर्यांची काहीच चुक नाहीये हे मनाला पटत नाही. सरकार भ्रष्ट झाले आहे हा खरा प्रश्न आहे. मुळातून आपल्या सगळ्याच लोकांची वृत्ती भ्रष्ट झाली आहे आणि कोणालाच ती स्वत बदलायची नाहीये तर दुसरे कोणीतरी त्याला कारण आहे असे सगळ्यांना वाटते तिथेच चूक आहे असे मला वाटते.

सिनेमाचा शेवट माझ्या मते खूपच फिल्मी झाला आहे. शहरातून गावात येणारी वैदेही सिनेमामध्ये कशाला आहे असा प्रश्न पडतो. मला तरी वाटत होते कि या सिनेमात खरच काही उत्तरे दिली असतील पण तसे माझ्या मते झाले नाहीये.

एकतर्फी का होईना शेतकऱ्यांचा प्रश्न इथे मांडला आहे त्यामुळे सिनेमा जरूर बघण्यासारखा आहे. विचार करण्याजोगा आहे.

तुम्ही हा सिनेमा बघितला असल्यास किंवा बघणार असल्यास तुमच्या प्रतिक्रिया जरून लिहा.


Another good movie on Farmers problems in Marathi. Rajaram is a educated youth, looking for job. He plans to sell his farmland and pay bribe to get a job. His mother prevents him from doing that for good, as he later learns that he might get job for some time and then will be removed.

He decides to get back to farming. His fast friend Nanda is farming in the village. His family consists of old Mother, Sister, Wife and a Son. He is dreaming of marrying his sister off soon. He is waiting for his payment for cotton harvest for the government federation. The payment is always delayed.



The corruption on all levels is depicted in the movie. Nanda and Rajaram wanted to dig wells in the farm. Rajaram gets loan, since he has not taken any loan, but Nanda is rejected since his previous loan is not cleared. He is not able to pay back the loan, since his money is stuck with cotton federation. Rajaram gets loan in his hands, after a "cut" by bank officers. Once the well was ready, he needs to pay bribe for electricity connection, for which he is not left with money, since the bribe amount is unreasonably high.

Due to increasing burden of loan, Nanda commits suicide by consuming pesticides. The whole family is broken due to this incidence. The police demands bribe for even postmortem and handing over the body of dead man to the family. Few more incidences of suicides happen in the village and Rajaram decides to do something about it.

He tries working with NGO in his villages, but finally decides to take the matter in his own hands. After a lot of brainstorming, he decides to punish government for this. Interesting to see how he does it. The end of the movie is "masala". But still the movie is worth watching.


Cast

Director



Wikipedia link

Link to Watch online