Politics लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Politics लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, सप्टेंबर ०७, २०१५

बदाम राणी गुलाम चोर (Badam Rani Gulam Chor)


सिनेमाची गोष्ट आहे तीन मित्रांची. तिघे मित्र एकाच मोठ्या घरात राहत असतात. घरचे नाव असते, "अनब्रेकेबल". यातील एकाचे टोपण नाव असते "चाकू". हा एका गॅरेज मध्ये नोकरी करत असतो. दुसरा असतो पुस्तक, हा एका कॉलेज मध्ये प्रोफेसर असतो. तिसरा असतो माकड, हा एका न्यूज चॅनेल मध्ये नोकरीला असतो. हे तिघे एकमेकांना टोपण नावानेच हाका मारत असतात. प्रत्येकाची अशी विचित्र टोपण नावे देखील त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्यामुळे ठेवलेली असतात. चाकू हा कधी न सुधारणारा, बिनधास्त स्वभावाचा असतो. त्याचे असे नाव पडण्याचे कारण म्हणजे सगळ्या शस्त्रांची उत्क्रांती झाली. पण चाकू हा कायम चाकूच राहिला. चाकू हे पात्र देखील तसेच आहे. प्रोफेसर हा खूप पुस्तके वाचत असतो आणि कुठलीही गोष्ट कधीही चूक सांगत नाही, पुस्तकी ज्ञान नेहमी पाजळतो. तर माकड, हा न्यूज चॅनेल मध्ये असतो, तिथे कायम बातम्या मिळत नाही, तेव्हा बातम्या तयार करणे हा त्याचा मुळ स्वभाव असतो त्यामुळे त्याचे नाव माकड असे पडते. आता या चाकुला गाडी दुरुस्त करायला आलेली एक खूप आकर्षक तरुणी आवडू लागते व तो तिला घरी बोलावतो. ती या तिघांची नावे ऐकून सांगते की माझे नाव पेन्सिल. पेन्सिल म्हणजे जिने लिहिलेले कधीही पुसता येते, कायम असे काहीच नाही. कारण भूतकाळात केलेली कुठलीच विधाने ती लक्षात ठेवत नाही व त्याची जबाबदारी घेत नाही.

पेन्सिल घरात आल्यावर या तिघांच्याही मनात तिच्या विषयी ओढ निर्माण होते. खरेतर चाकूने पहिला नंबर लावलेला असतो. कारण तिला तो घरी यायला निमंत्रण देतो त्यावेळेस त्याने या दोघांना सांगितले असते की मला पेन्सिलीशी लग्न करायचे आहे. पण पेन्सिल घरी आल्यावर पुस्तक त्याच्या बुद्दीमात्तेच्या जोरावर चाकुशी वाद घालतो आणि म्हणतो कि जर का तू तिला अजून पर्यंत लग्नाबद्दल सांगितले नसशील तर मी देखील लग्नाच्या स्पर्धेमध्ये उभा आहे. चाकू सुरवातीला खूप चिडतो. पण नंतर सावरतो. एक दिवस सकाळी सकाळी अचानक पेन्सिल घरी येते. चाकू आणि पुस्तकाची स्पर्धा लागते, प्रथम चाकू म्हणतो कि मला तुझ्याशी लग्न करायचे आहे, तसेच लगेच पुस्तक देखील ते म्हणतो. पेन्सिल आश्चर्याने माकडाकडे बघते, माकड म्हणतो मला यात इन्टरेस्ट नाही.

मग माकड आणि पेन्सिल एक डाव रचतात. ते ठरवतात कि पेन्सिल, चाकू व पुस्तकाची परीक्षा घेईल. त्यासाठी पहिल्या दिवशी चाकुबरोबर, दुसऱ्या दिवशी पुस्तकाबरोबर व तिसऱ्या दिवशी चाकू व पुस्तक बरोबर दिवस घालवेल. आणि अशी दोन आवर्तने होतील. अर्थात परीक्षक म्हणून माकड बरोबर असेलच. या स्पर्धेमध्ये काही नियम असतील आणि त्या नियमांचे काटेकोर पालन होईल. स्पर्धेमध्ये पेन्सिल दोघांना काही प्रश्न विचारेल, त्या प्रश्नांना दिलेल्या उत्तरावरून पेन्सिल कोणाशी लग्न करायचे ते ठरवेल. आता या स्पर्धेत काय होते व पेन्सिल कोणाशी लग्न करते, त्यानंतर पेन्सिलीच्या आयुष्यात काय बदल होतात, त्या बदलांमुळे दुसऱ्या उमेदवारांच्या मनात काय येते व तो काय प्लॅन करतो. माकड त्याच्या स्वभावानुसार कश्या बातम्या बनवतो. ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला "बदाम राणी गुलाम चोर" या सिनेमात मिळतील.

या तीन मित्रांच्या स्टोरीबरोबरच राजकारणातील एक गोष्ट यात गुंफण्याचा यात प्रयत्न केला आहे. दोन प्रतिस्पर्धी, मुख्यमंत्र्याच्या उमेदवारीसाठी प्रयत्न करत असतात, त्यात जुन्या उमेदवाराचा पराभव होतो व नवीन उमेदवार निवडून येतो. व मग मिडिया कशी या दोघांना प्रतिक्रिया देण्यासा भाग पाडते. जनता या सगळ्या गोंधळात कशी पिचून गेलेली असते, हे यात गुंफण्याचा प्रयत्न केलेला आहे. सिनेमातील पात्रांची खरी नावे कळत नाहीत. सिनेमा मध्यंतरापर्यंत चांगला वाटतो. त्यातील काही विनोद चांगले वाटले. पण नंतर नंतर कंटाळा येतो. या सिनेमा सतीश राजवाडे यांनी दिग्दर्शित केलेला आहे. यांनी २-३ खूप छान सिरीयल काढल्या होत्या त्यामुळे या सिनेमाकडून खूप अपेक्षा होती. पण ती अपेक्षा पूर्ण होत नाही. सगळे कलाकार त्यांच्या त्यांच्या भूमिकेत उत्तम आहेत. पण त्यांचा एकत्रित प्रभाव पडलेला नाही. एकूण सुरवातीला खूप उत्साहने सिनेमा बघायला सुरवात केली आणि शेवट पर्यंत उत्साह मावळून गेलेला होता. सिनेमा बघण्यास हरकत नाही पण खूप अपेक्षा ठेवू नये.

This is a story of three friends living together in a big house they names "Unbreakable". All three friends have nicknames. All the names are for a reason and describe their nature and behavior. First one is Chaku or Knife. He is car mechanic and own a garage. Second one is Pustak or Book. He is a studious person and works as a professor in a college. Third one is Makad or Monkey, who works for a news agency. All three call each other with the nicknames only.

Knife is called so because he is person who will not change and is not scared of anything. All the weapons have changed and improved, but knives have remained like they were for several centuries. Book is very studious and is always busy reading something. He is never wrong and has answer with reference for all the discussions. Monkey is working for news agency and when there are no news to cover he is good in making up the news.

Once Knife falls for a girl, who come to his garage for repairing her car. She is really cute and Knife likes her very much. He manages to invite her to his home. When she visits their home and was introduced to all three of them. She tells them that her name is Pencil, the reason being whatever she writes can be erased quickly and she does not care a dime about what she said the earlier day, and never take a responsibility of what she said earlier.

After meeting Pencil, all three are in the competition. Logically Knife is the guy, because he has met her first and invited her to their home. He has also made it clear before inviting her, to other two friends that he plans to propose her for marriage soon. But once Book meets Pencil, he starts using his intellect to convince Knife that since he has not proposed her already, Book also can jump into the competition. Knife is really upset with this situation, but then decides to take it cool. One day Pencil arrives to their home without notice. Knife immediately tells her that he want's to marry her. Book without wasting any time declares the same intention. Pencil loks at Monkey with surprise. Monkey just replies "I am not interested".

Then Monkey and Pencil get together and make a plan. They decide to test Knife and Book to decide who is suitable to marry Pencil. On day one Pencil will spend time with Knife on second day she will spend time with Book on day three she spend time with both Knife and Book. This will be repeated one more time. Monkey will be there all along to watch over. There will be some ground rules set and need to be followed very carefully. Pencil will ask few questions to both of them and take a decision based on all this.How does this whole plan work out, who does she decids to marry at the end, what does the other person do about it, how Monkey makes news stories out of it needs to be undestood and enjoyed by watching movie "Badam Rani Gulam Chor".

In this movie, with the story of these three friends there is another story woven, which is of two politicians. There are two leaders of opposing parties in the election, The ruling one gets defeated and a new chief minister takes charge. Monkey as a media man and his competitors are using different tricks to make news stories out of this. Interesting part of the story is we do not know the real names of all the four lead characters in the movie. The movie takes off really well and is very interesting and some good comedy, but after the intermission it kind of drags a bit. Satish Rajwade the director of the movie is well know and has delivered some really good TV serials. All the main characters are well known faces and good acting reputations. So finally the recommendation is good to watch with a caution of not so interesting till the end, so be prepared for a little disappointment.

Cast

Direction
  • Satish Rajwade सतीश राजवाडे 

रविवार, एप्रिल २५, २०१०

झेंडा (Zenda)


काकासाहेब सरपोतदार हे जनसेना नावाच्या मोठ्या पार्टीचे प्रमुख. राजेश सरपोतदार हा काकासाहेबचा पुतण्या तर प्रशांत हा काकासाहेबांचा मुलगा. आता काकासाहेब म्हातारे झाल्याने या दोघांपैकी कोणाला तरी त्यांचा उत्तराधिकारी म्हणून सगळे कार्यकर्ते जमलेले असतात. बऱ्याच कार्यकर्त्यांच्या अपेक्षेनुसार राजेश हा जनसेनेच काम बघणार असे वाटत असते. पण काकासाहेब सगळ्या कार्यकर्त्यांचा अपेक्षाभंग करतात व प्रशांत ला उत्तराधिकारी म्हणून नेमतात. पण राजेश हा सगळ्या कार्यकर्त्यांचा आवडता असतो, तरीही काकासाहेबांच्या शब्दाबाहेर त्यांच्या पार्टी मधील कोणीच कार्यकर्ता जात नाही. त्यामुळे बरेच कार्यकर्ते काकासाहेबांच्या या निर्णयाला स्वीकारतात.
याच कार्यकर्त्यांमध्ये दोन अगदी जीवाभावाचे मित्र असतात. संतोष शिंदे आणि उमेश जगताप दोघे मित्र, व जनसेनेचे निष्ठान्वंत कार्यकर्ते. संतोष हा १२ वी नापास व नुसते निष्टवान कार्यकर्ते आहोत याचा अभिमान बाळगणारा तर उमेश हा शिकलेला आणि खूप विचारी. राजेशला उत्तराधिकारी नेमले नाही याचा उमेशला खूप त्रास होतो, तर संतोष, काकासाहेबांच्या शब्दाबाहेर कसे जायचे या विचाराने त्रस्त. त्यात राजेश सरपोतदार, महाराष्ट्र साम्राज्य सेना नावाची पार्टी काढतो व जनसेने पासून वेगळा होतो. आता कार्यकर्त्यांची होरपळ सुरु होते, त्यांना समजत नाही आता काय करावे. उमेशच्या मते राजेश सरपोतदारकडे सावरकरांचे स्वप्न पूर्ण करण्याची पात्रता आहे आणि म्हणून तो महाराष्ट्र साम्राज्य सेनेमध्ये जातो.

अविनाश मोहिते एका खेड्यात जनसेनेचा नेता. याचा जनसेनेत असण्याचा उद्देश म्हणजे काही वर्ष्याने जिल्हापरिषदेत अध्यक्ष व्हायचे आणि त्यानंतर राजकारणात पुढे जाऊन आमदार, खासदार. अविनाशला तसे तर जनसेनेबद्दल फार प्रेम असते असे नाही, तर हा आपली स्वप्नं घेऊन जनसेनेत येतो. म्हणजे जर स्वप्न पूर्ण होणार नसतील तर हा दुसरीकडे जाऊ शकेल अशी याची मनस्थिती असते.
आदित्य हा एका अँडव्हर्टाईजींग कंपनी मध्ये मॅनेजर म्हणून काम करत असतो. याचे स्वप्नं म्हणजे सगळ्या जगभर फिरायचे खूप ऐश करायची आणि खूप पैसे मिळवायचा. आदित्यचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन व्यावसायिक असतो. आदित्यला महाराष्ट्र साम्राज्य सेनेचे निवडणूक प्रचाराचे कॅम्पेन करण्याचे काम मिळते आणि त्यामुळे त्याचे महाराष्ट्र साम्राज्य सेनेच्या राजेश सरपोतदारशी संबध येतात.

आता या चौघांच्या आयुष्याशी राजेश सरपोतदारचे निर्णय कसे अवलंबून असतात, आणि त्यांना आयुष्य कुठे नेते हे बघा "झेंडा" मध्ये.
सिनेमा ठीक आहे. शेवट अगदीच गुंडाळून टाकला आहे असे वाटते. सिनेमाच्या सुरवातीला जरी अवधूत म्हणत असला कि या सिनेमाचे कोणाही मृत अथवा जिवंत व्यक्तीशी संबध नाही, तरीही हा सिनेमा शिवसेनेवर आधारित हे अगदीच दिसून येते. सिनेमातील गाणी चांगली आहेत. विशेषता कोणता झेंडा घेऊ हाती, आणि सावधान सावधान, वणवा पेट घेत आहे, खूपच छान. पदार्पणात अवधूतने केलेला प्रयत्न चांगला आहे.

राजकारणात शहाण्या माणसाने पडू नये, तर आपापली ध्येये राजकारणाशी निगडीत ठेवू नये असा एक संदेश या सिनेमातून देण्यात आला आहे. पण सध्याच्या देशाच्या परिस्थिती कडे बघता, काही चांगल्या माणसांनी राजकारणात पडायला हवे असे माझे मत आहे. तुमच्या प्रतिक्रिया अवश्य लिहा.
Santosh and Umesh are two very close friends. Both are workers of a political party Janasena. Santosh is 12th fail and Umesh is post graduate. Santosh is very proud of his political connections but Umesh always thinks about the political process. He does not follow orders of the higher leaders blindly, but always raises questions. Santosh is more rowdy type who always wants to use muscle power.
Janasena supremo Kakasaheb Sarpotdar is very old and he is to announce his political hair. The main contestants are his own son Prashant and his nephew Rajesh. Most of the people envisage Rajesh as trhe future leader due to his charismatic personality and dynamic nature. But unexpectedly Kakasaheb declares Prashant as the future leader. Though most of the party workers did not like the decision, they just go by Kakasahb's words and keep quite.

Santosh is unhappy, still agrees the decision, but Umesh is disturbed by this. Very soon, as expected, Rajesh announces a new party Maharashtra Samrajya Sena. Now there is a big dilemma among all the dedicated party workers. Umesh believes that Rajesh has the capacity to fulfill Vir Savarkar's dream of strong country and decides to join him. Santosh decides to remain with Janasena, due to his blind dedication.

Avinash is a small politician in a town. He is educated, and has a clear political road map. He wants to become Zilla Parishad President, then MLC and MLA. He is not very dedicated to the party as such, but sticking to it, for the political dreams. He can quickly change his party for fulfilling his dreams.
Aditya is a manager in Advertising and event management company. He is very ambitious and wants to earn a lot of money by hook or crook. He has a total corporate mindset and wants to go around the world with his pockets full of money. He gets involved into politics by accidnt. He gets the project of desiging the whole political campaign for Maharashtra Samrajya Sena of Rajesh Sarpotdar.

The whole movie depicts how Rajesh's decisions affect the lives of all these concerned people. How some get the benefit and how some of them suffer. The name of the movie Zenda or flag is to suggest what flag will each of them fight for.

Movie is alright to watch and with family. It depicts the picture of Maharashtra politics and Shivsena, though it claims it is not based on any person or incidence in real life. Very good job by Avadhoot Gupte as first time director. Songs are good specially "Vanava pet ghet aahe", "Savdhan Savdhan" and "Konata Zenda gheu hati".

Do leave your comments on the movie and the review in the comments section.

Cast
  • Rahesh Shringarpure राजेश शृंगारपुरे
  • Santosh Juvekar संतोष जुवेकर
  • Siddarth Chadekar सिद्धार्थ चादेकर
  • Sachit Patil सचित पाटील
  • Pushkar Shrotri पुष्कर श्रोत्री
  • Chinmay Mandlekar चिन्मय मांडलेकर
  • Shubhangi Gokhale शुभांगी गोखले
  • Meghna Erande मेघना एरंडे
  • Ujjwala Jog उज्ज्वला जोग
  • Sunil Tayade सुनील तावडे
  • Atul TodnKar अतुल तोडणकर
  • rahul Newale राहुल नेवाळे
  • Shrirang Godbole श्रीरंग गोडबोले
  • Prasad Oak प्रसाद ओंक

Director
  • Avadhoot Gupte अवधूत गुप्ते

Link to watch online 

मंगळवार, मार्च ३०, २०१०

त्या रात्री पाउस होता (Tya ratri paaus hota)

विश्वास आणि गायत्री यांचे एक सुखी कुटुंब. यांना रावी आणि अविनाश (अवि) अशी दोन मुले. विश्वास आणि गायत्री यांची एका छोट्याश्या खेड्यात एक छोटीशी फॅक्टरी असते. गायत्री आणि विश्वास दोघेही या फॅक्टरी मध्ये काम करत असतात. गायत्री एकदम कर्तबगार असते. सगळ्या कामगारांबरोबर हातात अवजारे घेऊन काम करत असते. यांच्याच गावात एक श्रीपती नावाचा एक राजकारणी असतो. त्याला गायत्री आणि विश्वास यांच्या फॅक्टरी मध्ये खूप रस असतो. याचे स्वप्न म्हणजे खूप मोठा राजकारणी व्हायचे. आणि त्याची सुरवात म्हणजे तो ज्या खेड्यात राहत असतो त्याची सुधारणा करणे.
सुधारणा करण्यासाठी सगळ्यात प्रथम ह्याच्या मनात येते कि स्त्री मतदार संघात गायत्रीला उभे करायचे. त्यासाठी म्हणून गायत्रीला राजकारणात ओढण्याचा प्रयत्न सुरु होतो. विश्वासला वाटते कि गायत्रीने राजकारणात पडावे. एक वेगळा अनुभव म्हणून ग्रामपंचायतीत जायला काही हरकत नाही. विश्वासच्या आग्रहाखातर गायत्री ग्रामपंचायतीत जातेही. आता हिच्या हुद्द्याचा गैरवापर श्रीपत करायला लागतो आणि त्यालाच गायत्री नकार देते. याने चिडून श्रीपत, गायत्री आणि विश्वास यांच्या कुटुंबाला उध्वस्त करण्याचे ठरवतो.
त्यासाठी मग तो विश्वासवर चरस चा धंदा करण्याचा आरोप करतो व त्याला तुरुंगात टाकतो. गायत्री त्याला सोडवण्याची खूप धडपड करते, पण काहीच कुठे करता येत नाही. ती जेव्हा अगदी अगतिक होते, तेव्हा श्रीपत तिला सांगतो कि माझा तुझ्यावर डोळा आहे तू माझ्या बरोबर आज राहा, मी लगेच विश्वास ला सोडवतो. या प्रस्तावापुढे गायत्री काय निर्णय घेते, तिच्या या निर्णयामुळे त्यांच्या कुटुंबाचे पुढे काय होते, अविनाश आणि रावीचे भविष्य तिच्या या निर्णयामुळे कसे होरपळते हे बघा "त्या रात्री पाउस होता" मध्ये
"त्या रात्री पाउस होता", त्या रात्रीत फक्त क्लायमॅक्स शिवाय काही घडत नाही. फक्त अवि आणि रावी एकमेकांना ओळखतात, त्यांच्या गप्पा व जुन्या आठवणींना उजाळा देणे इतकेच घडते. बहुतेक संपूर्ण सिनेमा फ्लशबक मधेच आहे. तानाजीचे एक महत्वाचे पात्र या सिनेमामध्ये आहे. तानाजी या सगळ्या गोष्टीचा साक्षीदार म्हणून आपल्याला सदैव दिसतो. क्लायमॅक्स मध्ये तानाजी कुणाची साथ देतो, हे बघण्यासारखे आहे.
सिनेमातील गाणी चांगली आहेत. गायत्री सारखी कर्तबगार आणि सडेतोड असलेली स्त्री अगतिक झाल्यावर जो निर्णय घेते तो समजू शकतो, पण त्यानंतर ती विश्वासला सगळे खरे का सांगत नाही हा प्रश्न नक्कीच पडतो. त्यानंतर श्रीपतवर बदला घेण्याच्या ऐवजी तिचा जो शेवट दाखवला आहे तो पटला नाही. बदला भलेही यशस्वी न झालेला दाखवता आला असता पण तिची अगतिकता मनाला पटत नाही. सगळेच कसलेले कलाकार असल्याने नाव ठेवायला कुठेच जागा नाही. सिनेमा बघावाच असा काही नाही.
Vishwas Kamat and his wife Gayatri are residents of a small town. They have two kids Avinash (Avi) and Ravi. A very happy family. They have a small factory and both work hard along with workers to earn their living. Shripati is a local politician, who has an ambition to become a MLA. He is interested in the factory and is helping them to improve.

Shripati approaches with a proposal of filing Gayatri's nomination for a Ladies Reserved Seat in the village panchayat. Initially Gayatri refuses, saying she is happy with taking care of family and small business they have. But subsequently Vishwas convinces her to give it a try. He feels it will be good experience. Gayatri agrees and becomes a member of the panchayat. Later Shripati tries to misuse her name and post for his own interests which she opposes.
Shripari decides to plot against Gayatri and her family to get control. He puts Narcotic Drugs in the lorry transporting Vishawas's factory goods and gets him arrested under the false case. Gayatri tries hard for his release for several days. Vishwas is beaten badly in the custody and finally Gayatri decides to get him released at any cost. At this point Shripati tells her, that he is interested in her and if she spends time with him, he can get Vishwas released in no time. After two long days of brain storming, Gayatri finds no way out but to bows to Shripati's wish.

This is a pivotal point in the story which decides the whole future of the family and consequences of this follow the lives of Avinash and Ravi. In the night of rain in the title of the movie, Avinash and Ravi meet after years, recognise each other and talk out the whole story through flashbacks. Third person Tanaji is witness (mostly silent) to the whole lives of these people. When all the misunderstandings between the siblings were clear, what happens when Shripati comes in front of them.

All the actors have really plays their parts very well but a bit disappointment from Gajendra Ahire. Some things in the storyline are totally contradictory to the initial character of Gayatri. Strong Gayatri, who is working with her husband in the factory, with all the equipments and tools and managing strongly the whole business, seems very lame and weak in the later part of the movie. A movie not really a must watch category and definitely not suitable to watch with children.
Cast

Direction

Link to watch online 

सोमवार, जून १५, २००९

सैल (Sail)

वादळी वारा, मुसळधार पाऊस सुरु असताना विद्याधर आडोसा शोधात असतो आणि अचानक त्याची विद्याशी गाठ पडते. विद्याला बघून विद्याधर चाट पडतो. या बाईशी आपली अशी घाठ पडेल असे त्याला स्वप्नात पण वाटले नसते. राजकारणात पडून नावाजलेली आणि अनुभवी झालेली विद्या जीव मुठीत धरून लपते आहे हे समजल्यावर त्याला खूपच आश्चर्य वाटते. पैश्याच्या मागे लागलेला विद्याधर प्रोफेसर झाला आहे हे समजल्यावर विद्या पण चमकते. पैश्याचा लोभ आणि राजकारणाचा मोह यामुळे कुटुंबाची कशी दैना झाली, हे प्रेक्षकांसमोर येते. एका गोजिरवाण्या कुटुंबाची ताटातूट होते. जरी दोघे दूर असले तरी दोघांचे एकमेकांवरचे प्रेम कमी झालेले नाही याचा साक्षात्कार दोघांना झाल्यावर दोघे नव्याने आयुष्य सुरु करायचे ठरवतात. वादळ ओसरल्यावर एकत्र घरी जाण्याचे ठरवतात, तितक्यात राजकारणातील काही उलाथापालाथीत पुन्हा विद्याचा जयजयकार सुरु होतो. आता या निर्णायक क्षणी विद्या काय करते हे बघा "सैल" मध्ये.

या सिनेमात फक्त दोनच पात्र आहेत. संपूर्ण सिनेमा रात्रीतून उलगडतो. भूतकाळ फक्त बोलण्यातून कळतो. त्यासाठी फ़्लँशबँक चा उपयोग केलेला नाहीये. मोहन जोशी आणि रीमा लागू यांच्या अभिनय सुंदर. फार वेगळा सिनेमा आहे असे मी म्हणणार नाही. मोहन जोशी आणि रीमा लागू तुम्हाला आवडत असल्यास हा सिनेमा जरून बघा. बघितल्यावर पश्चाचाताप होणार नाही याची खात्री आहे.

Cast:
  • Reema Lagoo रीमा लागू
  • Mohan Joshi मोहन जोशी

Direction :
  • Gajendra Ahire गजेंद्र अहिरे

Vidyadhar meets vidya accidentally while looking for shelter, when his car breaks down in a thunderstorm in outskirts of the city. He approaches a nearby farm house and convinces the security guard to let him in till storm subsides. This a very interesting drama unfolded within just these two characters Vidyadhar and Vidya. They are separated husband and wife meeting after several years. Both had great ambitions, Vidyadhar wants to make lot of money while Vidya is interested in politics. Vidya was hiding in the farm house due to some political problem.

Their life stories in reveled in the course of their conversations in the whole night. The difference from other movies is, not a single flashback is used and still the movie remains interesting binding the viewers to their chairs. The movie ends with the breaking of dawn with a unexpected twist. Very good acting by both Reema and Mohan Joshi. If you like drama, do not miss this movie.