मंगळवार, मे २२, २०१२

तनु वेड्स मनु (Tanu weds Manu)

मनोज शर्मा हा इंग्लंड मध्ये राहणारा एक भारतीय डॉक्टर असतो. इंग्लंड मध्ये राहून देखील हा मानाने भारतीयच असतो. लग्न करण्यासाठी म्हणून तो भारतात येतो. याच्या घरी एक पपी नावाचा त्याच्या केयरटेकर + मित्र देखील राहत असतो. मुली बघायला म्हणून याचे आई-वडील, पपी, आणि मनोज उर्फ मनु, कानपूरला जातात. मुलीच्या घरात अगदी आनंदी आनंद असतो, घरातील सगळे लोक चांगले असतात पण मुलगी कुठेच दिसत नाही. मुलीच्या आईचे असे म्हणणे असते कि मुलाला व मुलीला एकत्र भेटू द्या. त्या दोघांना भेटायला एका खोलीत नेतात. तिथे, मुलगी तनुजा ही डोक्यावर पदर घेऊन असते, ज्यातून तिचा काहीच चेहरा दिसत नसतो. काय बोलावे हे मनुला समजत नाही पण तो थोडी प्रस्तावना करतो, पण तनुजा उर्फ तनु कडून काहीच प्रतिसाद येत नाही. हिला नक्की काय झाले हे बघण्याकरता म्हणून तो तिच्या जवळ जातो तर ती झोपली असते तो ती झोपली असतानाच तिचा फोटो काढतो आणि ठरवतो की हिच्याशीच लग्न करायचे. दोन्ही घरातील लोक खूप खुश होतात. या आनंदात दोन्ही कुटुंब वैष्णव देवीला जायचे ठरवतात. आणि त्या प्रवासात तनु सांगते की तिचे आधीच एका मुलाबरोबर लग्न करण्याचे ठरवले आहे त्यामुळे मनुने लग्नाला नकार द्यावा. मनुला समजत नाही या गोंधळातून बाहेर कसे पडावे. पण शेवटी पापी चा सल्ला घेऊन तो स्वत:च्या वडिलांना सांगतो आणि शेवटी ते लग्न मोडते. मग अजून मुलींचा शोध सुरु होतो. पण प्रत्येक मुलीमध्ये काहीना काही दोष असतो. आता लग्न न करता इंग्लंडला जावे लागणार असे मनुला वाटू लागते.

पण त्याच दरम्यान त्याचा मित्राचा जस्सीचा फोन येतो की त्याचे लग्न ठरले आहे, व त्यासाठी मनुने त्याच्या घरी पंजाबला जावे. मनु व पापी तेथे जातात. जस्सीची होणारी बायको पायल ही नेमकी तनुची मैत्रीण असते. पायालला जेव्हा कळते की मनु, तनुच्या प्रेमात वेडा झालाय, तेव्हा ती तनु ला समजावण्याचा प्रयत्न करते की तिने तिच्या बॉयफ्रेंड (राजा) चा नाद सोडून द्यावा. व मनु शी लग्न करावे. पण तनु राजाच्या प्रेमात वेडी झालेली असते त्यामुळे ती ते काही ऐकत नाही. कर्मधर्म संयोगाने राजा आणि मनु ची ओळख निघते. पुढे राजाचे आणि तनुचे काय होते, अर्थात मनुचे तनुशी लग्न होते हे सिनेमाच्या नावावरून ओळखण्यासारखेच आहे.

सिनेमा अत्यंत टुकार आहे. कंगना रानौतचा मेकअप, कपडे जरा विचित्र वाटतात आणि एकूण कथा अगदीच कंटाळवाणी आहे. सिनेमा बघितला नाही तर काहीही बिघडणार नाही. पण माधवन सारखा कलाकार या सिनेमात वाया गेला असे मात्र निश्चित वाटते.

तुम्ही हा सिनेमा बघितला असल्यास किंवा तुमच्या इतर काही प्रतिक्रिया असतील तर अवश्य लिहा.

Manoj Sharma aka Manu is a Indian doctor settled in England. I want to get married to an India girl so he visits India. His parents have lined up a few prospective girls for him to see. They also have a caretaker called Pappi, who is like brother to Manu. They all go to Kanpur to see a girl The girl has a huge joint family. The family is very good, but the girl is not at all seen around. The girl's mother suggests that let the girl and boy meet alone and talk. So Manu is taken to the room where Tanuja aka Tanu is sitting with her face covered with her long scarf. Manu is not able to see her face and is confused how to start talking. He tries to initiate some discussion but she does not respond. Finally to check out what really is happening, he approaches near her and find out that she is fast asleep. He takes a photo of her in his mobile and decides to marry her.


When both the families hear from Manu his consent, they are all very happy. They decide to celebrate this by visiting Vaishav Devi temple. But on the way to Vaishnav Devi Tanu tells Manu that she has always committed to a boy and Manu should reject her. Now Manu is totally confused. But finally after discussing with Pappi Manu tells his father what has happened. They break up the proposal and Manu is back for bride search. He v isits several girls but there is always some rejection point. Finally he decides that it is not going to work and he should go back to England and try after few more months. 
As he starts preparing for his travel, he receives a phone form his best friend Jassi, telling he is getting married soon and Manu should come and attend the ceremonies. Manu agrees to it and goes to Punjab with Pappi. Jassi is getting married to Payal and as destiny has it, Tanu is Payal's best friend and Tanu is there with her. Payal learns that Manu is in deep love with Tanu. She tries to talk it over to Tanu, explaining that Manu is much better match for her than her boyfriend Raja, and she should leave Raja and get married with Manu. But Tanu is mad in love with Raja. Another typical twist in the movie is Manu and Raja have already met some time ago and knew each other. We know form the title that Tanu weds Manu but what exacly happens between him and Raja needs to be watched in the movie.
The movie is a typical Masala movie and many many not really enjoy it. Kangana Ranaut has a bit weird in this movie, story line os not that interesting, so you are not going to miss much by not watching the movie. Madhavan has wasted his time in acting in a movie like this. 

If you have seen the movie, do write your comments.

Cast

Direction
  • Anand Rai  आनंद राय

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा