मंगळवार, मे २९, २०१२

द मॅन विथ वन रेड शु (The man with one Red Shoe)

रिचर्ड हा एक साधाभोळा व्हायोलीन वादक असतो. त्याचा मित्र त्याची थट्टा करण्याकरता त्याचा एक बूट लपवतो. त्यामुळे रिचर्डला दोन वेगळेच बूट घालून विमानातून प्रवास करावा लागतो. त्यामुळे त्याच्या एका पायात लाल रंगाचा स्पोर्ट बूट व दुसऱ्या पायात एक फॉर्मल शु असतो. असा विचित्र वेश करून विमानातून परत येत असताना त्याच्या समोर मॅडी नावाची एक सुस्वरूप ललना येते. हि मॅडी खर तर सी आई ए ची एजंट असते. हा मनुष्य नक्की कोण आहे हे बघण्यासाठी ती त्याला मिठी वगेरे पण मारते. रिचर्डला खूप आश्चर्य वाटते, पण याचे बघता क्षणीच तिच्या वर प्रेम होते.

कुपर आणि रॉस हे दोघे सीआईएच्या डिरेक्टर पदासाठीचे उमेदवार असतात. रॉसला शर्यतीतून मागे खेचण्यासाठी कुपर खोटी केस रचतो आणि त्यात रॉस हवा तो रिझल्ट आणू शकत नाही आणि त्यामुळे रॉसची प्रतिमा खराब होते. रॉसला समजते की हा सगळा उद्योग कुपरने केला आहे. आता त्याला काटशह देण्याकरता म्हणून रॉस अशी हूल उठवतो की आता खूप मोठा कोकेनचा माल अमेरिकेत येणार आहे आणि त्याच्या मागे असलेला सूत्रधार म्हणजे ज्या मनुष्याने एकाच लाल बूट घातला आहे तो आहे. आता रॉसची टीम आणि कुपरची एकमेकांवर कुरघोडी करण्याकरता रिचर्डच्या मागे लागतात. पण रिचर्ड हा खरोखरीच एक पापभिरू मनुष्य असतो. कोणालाच त्याच्या रेकोर्ड मध्ये काहीच वाईट आढळून येत नाही. मग त्याच्या घरी नकळत जाऊन, त्याच्यावर पाळत ठेवण्यासाठी काही गोष्टी ठेवतात.

इकडे रिचर्ड मॅडीच्या प्रेमात पडल्यामुळे, मॅडी जिथे जिथे दिसेल तिथे तिच्या मागे मागे जातो. शेवटी कुपर मॅडीला म्हणतो की रिचर्डला प्रेमाच्या जाळ्यात ओढ आणि त्याच्या कडून सगळी माहिती काढून आण. कुपर त्याच्या मिशन मध्ये यशस्वी होतो का ? रॉस आणि कुपर यांच्यातील कोण सी आई ए चा डिरेक्टर होते ? मॅडी आणि रिचर्ड पुढे काय होते हे बघा द मॅन विथ वन रेड शु मध्ये.

सिनेमा खूपच विनोदी आहे. टॉम हॅन्क्सचे जे काही चित्रपट लायब्ररीत मिळतील ते बघायचे, असे धोरण ठेवल्याने हा सिनेमा मिळाला. अर्थात हा सिनेमा बघितला नसता तरी काही हरकत नव्हती. डोके बाजूला काढून ठेवले तर निखळ करमणूक आहे. सगळे विनोद एकदम झकास जमले आहेत. टॉम हॅन्क्स या सिनेमात अगदीच पोरगेलासा आहे. पण त्याचा अभिनय उत्तम आहे.

तुम्ही हा सिनेमा बघितला असल्यास किंवा माझ्या लिखाणावर इतर काही प्रतिक्रिया असतील तर जरूर लिहा.

Richard is a violin artist and is very simple guy. Once on a performance tour, one of his friends hides one each of his two shoes. So finally Richard travels on flight with two different shoes in his feet. One red sports shoe and another formal leather shoe. While exiting out of airport he bumps on Maddy a very hot airport girl. But in reality she is a CIA agent. She is conning all this to figure out who this strange guy is with a red shoe. Richard falls for her in their very brief encounter.
Cooper and Ross and competing for getting CIA directors post and to win over Ross, Cooper plots a false case and makes sure that is assigned to Ross. Ross is not able to deliver results, so his image is tarnished. Ross learns that this was all plotted by Cooper, so now he plots another case. Richard is picked up by them due to his strange shoe style that day. 
Now both the teams and trying to follow every movement of Richard. They bug Rishard's house, thoroughly check it in his absence. But Richard is so innocent that nothing could be found or proved. In this process Richard keeps bumping on Maddy several times. Most of the times purposefully plotted. They realize that he is falling for her and then plan to use that and make Maddy act as if she is also in love. What happens next between them ? Who is successful in the race. Who becomes next director of CIA needs to be watched in the movie The Man with a Red Shoe.

This movie is a good comedy. We got to watch this because we like Tom Hanks and we are trying to watch all his movies. If you like comedies or fan of Tom Hanks, you should not miss this movie. Tom looks very young in this movie and as usual his acting has his own class.

Do give your comments on the movie of you have seen this and comments on the review if you have not.

Cast

Direction

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा