माधव श्रीधर आपटे हा एक मध्यमवर्गीय नोकरदार माणूस. बँकेत नोकरी. रोज सकाळी त्याच वेळेस उठणार, तीच लोकल पकडणार, बँकेत जाणार त्याच प्रकारचे काम करणार, संध्याकाळी घरी येणार. घरी आल्यावर मुलीला प्रेमाने जेऊ घालणार, मग झोपणार. रोजचा तोच कार्यक्रम. त्यात काहीच फेरबदल नाही. यांना दोन मुलं प्राची आणि राहुल. राहुल मोठा आणि प्राची लहान. बायको नोकरी न करता घरीच गृहिणी असते. कारण माधव आपटे याला बायकोने नोकरी करू नये तर घरीच राहून मुलांवर संस्कार करावे अशी इच्छा असते आणि त्याप्रमाणे ती नोकरी करत नाही. घरात राहून, सारखी घरकाम करून वैतागते. त्यातून माधव आपटेची तत्व हीच डोकं खातात. खूप तत्वनिष्ठ असल्याने, लाच घेणे तर दूरच, पण लाच देण्याला पण नाकारत असतो. बँकेत नोकरी असल्याने तशी कमी काहीच नसते, पण अगदी उधळता येतील असे पैसे देखील नसतात. त्यामुळे जेव्हा राहुल तीन विषयात नापास होतो तेव्हा त्यामागील कारण नक्की काय याची राहुलला विचारणा होते. राहुल सांगतो कि कितीही अभ्यास केला तरी तो पास होणार नाही कारण त्याने त्याच्या शिक्षकाकडे शिकवणी लावली नाही. हे ऐकल्यावर बायको माधव आपटेच्या मागे लागते कि त्याला शिकवणी लावा. पण माधव आपटेच्या तत्वात शिकवणी म्हणजे लाच देण्याचा वेगळा प्रकार असेच असते. त्यामुळे तो त्याला नकार देतो.
खूप पैसे नसल्याने आपटे परिवार चाळीत राहत असतात, तिथे पाण्याचा प्रॉब्लेम असतो. तिथे रोज टँकरने पाणी येते. तो मुकादम, रोज लाच दिल्याशिवाय पाणी सोडत नाही. हे बघून माधव आपटे खूप वैतागतो.
ऑफिस मध्ये जातो, तर एक मोठा व्यापारी कागदपत्र न देताच लोनची मागणी करतो. माधव म्हणतो कि कागदपत्र आणून दे लगेच लोन देता येईल. पण हा मनुष्य बँकेच्या मनेजर कडे जातो आणि मॅनेजर
त्याचे लोन मान्य करतो. हे बघून माधव आपटेला खूप संताप येतो.
त्याच्या मुलीला शाळेत प्रवेश घ्यायचा असतो. तिथे शाळेची प्राध्यापिका, प्राचीला प्रवेश द्यायला तयार होते पण सांगते कि जर तुम्ही ३५००० रुपये डोनेशन दिले तरच प्रवेश दिला जाईल. सकाळपासून झालेल्या घटना बघितल्या तर माधव आपटेला एक सुसूत्रता दिसते. वेगवेगळ्या रुपात लोक काय करत आहेत, तर लाच मागत आहेत. कोणालाच कशाचीच मुल्ये शिल्लक राहिलेली नाहीत. माधव आपटे या डोनेशनला नकार देतो आणि आपटे परिवार घरी येतो. चांगल्या शाळेत प्रवेश डावलला गेला, कारण माधव आपटेने डोनेशन दिले नाही याचे त्याच्या बायकोला खूप म्हणजे खूप राग येतो. ती रागाच्या भरात माधवशी खूप भांडते व माधवला म्हणते कि नुसती तत्व तत्व काय करत बसलात, काही करून दाखवले तर या तत्वाला अर्थ.
डोक्याने तापलेला माधव ऑफिस मध्ये येतो तर ऑफिस मध्ये सगळे जण, त्या व्यापाऱ्याने दिलेल्या भेटवस्तू घेऊन खुश असतात. माधवला खूप चीड येते. मग बाहेर जाऊन पाण्याची बाटली विकणारा जास्त पैसे मागतो, त्याने हा वैतागतो. की याची मेहनतीची कमाई लोक कसे लाटत आहेत. आणि संतापाच्या भरात माधव या सगळ्यांना धडा शिकवण्याचा प्रयत्न करतो. आणि माधव आपटेचे एक भयंकर उग्र रूप लोकांना दिसते. माधव आपटे प्रकरणात सुभाष अनासपुरे नावाचा पोलीस अधिकारी लक्ष घालतो, या अधिकाऱ्याचे माधवच्या गुन्ह्याबद्दल काय मत होतं ? माधव आपटे सगळ्या लोकांना धडा शिकवू शकतो का? पोलीस त्याचा कसा बंदोबस्त करतात ? माधव आपटेच्या कृत्यांबद्दल लोकांचे काय मत असते हे बघा "डोंबिवली फास्ट" या सिनेमात.
सिनेमाचा शेवट खूप दुख दायक आहे. सिनेमातील सगळे प्रसंग मनाला भिडून जातात कारण सगळी सामान्य माणसे या अनुभवातून कधी न कधी तरी गेलेलीच आहेच. लाच दिल्याशिवाय कुठेच काही होत नाही, हे सध्या तरी आपल्या देशात अगदीच शक्य आहे. माधव आपटेचा, चित्र काढणाऱ्या मतीमंद मुलाच्या समोरील संवाद खूप उत्तम आहे. मतीमंद मुलाच्या समोर हे सगळे संवाद, म्हणजे भिंतीसमोर सगळे बोलल्यासारखे आहे. आणि खर तर तशीच परिस्थिती भारतात आहे हे दाखवण्याचा प्रयत्न छान वाटला. माधव आपटेच्या तोंडी असलेले वाक्य "मान मोडून जगताना एखाद्याने मान वर केली तर ती मान आम्ही खाली दाबायची" खूप म्हणजे खूप आवडले.
संदीप कुलकर्णी आणि शिल्पा तुळसकर दोघेही उत्तम. सगळेच पोलीस वाईट नाही, शिवाय त्यांच्या सिस्टम मध्ये राहून देखील काही चांगल्या गोष्टी करू शकतात हे दाखवण्याचा एक प्रयत्न केला आहे. सिनेमा जरूर बघाच. बघितला नाही तर एक चांगला सिनेमा हुकला असे मी नक्कीच म्हणीन.
माझ्या लिखाणावर किंवा तुम्ही हा सिनेमा बघितला असल्यास व तुम्हाला काही नवीन वेगळ्या गोष्टी आवडल्या असतील तर प्रतिक्रिया जरूर लिहा.
Madhav Shridhan Apte, is a typical middle class working gentleman staying in Dombivali. He is working for a bank, and leading a routine life. Every day same time to wake up, catch the same local, same type of work in his bank, return by the same local train, spend some time with his daughter and sleep. A very repetitive life. His family consists of his wife, who is home maker, two children, elder son Rahul and younger daughter Prachi. He feels that his wife should not work but stay at home and spend time with kids to bring them up well. She is not very happy with the decision of always staying at home and doing the house work. Madhav is a very principled man and that is a bit too much. This is also bothering his wife form time to time. Because of his bank job, he is earning well, but does not have too much money too spend.
Rahul flunks in three subjects and Apte family is trying to get to reason for the consequence. Rahul discloses that even if he studies hard, he can not pass because the teacher expects every student to attend his extra tuition classes for extra money. Madhav's wife requests him to get Rahul in the process, but he does not agree to this because this is kind of bribe which is against his principle.
Next incidence is Madhav is living in a chawl, which always faces water shortage. Water is supplied by a water tanker, and the operator needs tidbits of bribe to release water for residents. This makes Madhav upset. On reaching office there was a big businessman demanding some loan, without completing formalities of the paper work. Madhav denies the processing. He goes to higher officer and gets the loan passed and shows off in front of Madhav. This is really annoying for Madhav.
Later Madhav goes to good school near his house for his daughter's school admission. The principal agrees to admit her in school but demands Rs. 35,000 as donation. Now Madhav is really upset with the way everybody is tying to get money from him as a common man. How bribe has become part of Indian life. He denies to pay the donation and Apte family returns home without the school admission. At this point his wife is really upset with him. She started a heated argument with Madhav and in the process says that these is no use just talking and living by principles, but he need to show what he can do with them.
Upset Madhav on reaching his office is greeted by all his collegues very happy and busy looking at the gifts the same big businessman has given for passing his loan. He could not control his anger and decides to go out for awhile. Being summer time it is really hot outside and he goes to nearby stall to buy a bottle of water. When the seller demands two rupees more than the real price, Madhav looses his temper all together. He does something really unsual and scary that terrorize the whole Mumbai city for a while. Watch the movie Dombivali Fast to see what does he do ? How that affects several people ? What common man of Mumbai think about it ? What was Police department's reaction ? Was Madhav successful in his attempt to teach a lesson to all concerned ?
The movie ends with sad note. Many of the scenes are touching. These are kind of things happening in common man's life. The way the whole society has to pay bribe at every step and they have come to terms with it. There is an interesting scene where Madhav is talking to a mentallly retarded boy artist. Though Madhav is talking so much, the boy does not understand anything but Madhav fees so good because he could talk it out to someone. Some such scenes are really good.
Both Sandeep Kulkarni and Shilpa Tulaskar are very good in the movie. The police officer is also good, they tried to show in the movie how there are some good officers in the department and how they can contribute even within the system.
Do write your comments on the movie of you have seen it or on my writing of you have not.
Cast
- Sandeep Kulkarni संदीप कुलकर्णी
- Shilpa Tulaskar शिल्पा तुळसकर
- Sandesh Jadhav संदेश जाधव
- Dushyant Wagh दुष्यंत वाघ
- Shruti Bhosake श्रुती भोसके
- Ganesh Mayekar गणेश मयेकर
Direction
- Nishikant Kamat निशिकांत कामत
Link to watch online
बाबा रे सिनेमाचा रिव्ह्यु लिहितोस की त्याअ सिनेमाची सगळी स्टोरी लिहितोस???
उत्तर द्याहटवाजे काही महत्त्वाचं आहे ते सगळं वाचल्याव्र कोण सिनेमा बघायला काय मज्जा?
याला स्पॉयलर्स म्हणतात
I Read your article. Thanks for sharing such beautiful information, Watch Dombivali Fast full Marathi movie online on ShemarooMe. Stream full Marathi movie online Dombivali Fast.
उत्तर द्याहटवा