मिकी हा नावाचा १२ वर्षाचा मुलगा असतो. याचा बोनी नावाचा एक खूप खास मित्र असतो. मिकीच्या घरात आई, वडील व लहान बहिण मिनी असे लोक असतात. मिकी तसा लहानपणापासूनच खूप समजूतदार असतो. वडिलांचे व्हीडीओ गेमचे दुकान असते. मिकीला लहानपणापासूनच व्हीडीओ गेमची आवड असते. त्यात घरचेच दुकान, त्यामुळे हा सतत गेम खेळत असतो. याच्या वडिलांना त्यामुळे याचा राग येतो. मिकी सकाळी उठल्यापासून मितिका नावाच्या मुलीच्या मागावर असतो. मितिका हि १८-२० वयोगटातील एक सुंदर मुलगी असते. गावातील खूप मुलं हिच्या मागे असतात. पण हि कोणाचीच डाळ शिजू देत नाही. तर अश्या या मितीकाच्या प्रेमात मिकी कधीचाच पडलेला असतो.
एकदा मिकी, मितीकाची वाट बघत कोपऱ्यावर उभा असतो, मितिका येते. बोनी मिकीला सांगतो कि हिच्या मागे आपण जाऊ. त्याप्रमाणे ते तिच्या मागे मागे एका हॉटेल मध्ये जातात. तिथे मितिकाला कसा मित्र हवाय याची चर्चा ते ऐकतात. त्यात त्यांना असे कळते की तो मुलगा क्युट असला पाहिजे, गालावर खळ्या हव्यात. मग तो मुलगा तिच्यापेक्षा लहान असला तरी चालेल. हे ऐकल्यावर मिकीचे मनोधैर्य वाढते आणि तो तिच्याशी बोलायला जातो. बोलताना तिच्या मैत्रिणी म्हणतात, की अगं, हा तर तुझ्या मनातील मुलगा आहे. ते ऐकून मितिका म्हणते छे, हा तर अजून बच्चा आहे. हे ऐकल्यावर मिकीला खूप म्हणजे खूप वाईट वाटते.
त्याच दुखा:त तो घरी येतो तर घरी आई वडिलांचे भांडण सुरु. आणि त्या भांडणातून त्याला कळते कि मिकी हा त्यांचा मुलगा नसून तो त्यांचा दत्तक घेतलेला मुलगा आहे. हे कळल्यावर तर त्याला अतिशय दुख होते. तो घरातून लगेच बाहेर पडतो आणि दूर डोंगरावर जाऊन रडत बसतो. तर तिथे त्याला हिचकॉक भेटतो. हा हिचकॉक जे बोलेल ते खरे होत असते. हिचकॉक त्याला म्हणतो की तू आता खूप दुखात आहेस आणि त्याचे कारण म्हणजे तू सध्या लहान आहेस आणि तुला मोठे व्हायचे आहे. हे ऐकल्यावर मिकी म्हणतो हो कि हे बरोबर आहे. पण मी तर इतक्यात मोठा होऊ शकणार नाही. हिचकॉक म्हणतो की तिथे एक विहीर आहे, त्यात जर का तू तुझी खूप आवडती गोष्ट टाकली आणि एक इच्छा केली तर ती पूर्ण होईल. हे ऐकल्यावर मिकीला खरे वाटत नाही. पण हिचकॉक हा जे बोलतो ते खरे होते, त्यामुळे मिकी त्यात एक नाणे टाकतो आणि डोळे उघडून बघतो तर तो तितकाच असतो. मिकीला वाटते की हिचकॉक जे बोलला ते खरे होणार नाहीये. तो तसाच घरी जातो आणि झोपतो. सकाळी उठतो तर काय तो एकदम मोठा झालेला असतो.
आता एकदम मोठा झाल्याने याला त्याचा फायदा होतो का तोटा ? मोठा झाल्यावर मितिका त्याच्या प्रेमाला हो म्हणते का ? हे बघा "आओ विश करे " मध्ये.
सिनेमा चांगला आहे. मुख्य म्हणजे पौन्गडावस्थेतील मुलांना आवडू शकेल असा वाटतंय. आफताबची अक्टिंग उत्तम आहे. या सिनेमातील नायिका हि नवीन आहे. ती पण ठीक आहे. एकदम लो बजेट सिनेमा आहे पण चांगला आहे. गाणी खूप आहेत ती जरा कंटाळवाणी होतात. सिनेमाचा शेवट छान आहे. ज्यांना फॅन्टसी आवडते त्यांना हा सिनेमा नक्की आवडेल. सिनेमातील विनोद चांगले आहेत, मध्ये मध्ये काही नाजूक, भावनिक क्षण आहेत जे तुमच्या डोळ्यात पाणी आणतात. हा सिनेमा टॉम हॅन्क्सच्या "बिग" या सिनेमावरून घेतला आहे. मी बिग बघितला नाहीये, पण हा सिनेमा चांगला आहे, असे माझे मत आहे. पण हा सिनेमा खूप चालला नाही, काही लोकांना अजिबात आवडला नाही. तर काहींना खूप आवडला. एकदा बघण्यास हरकत नाही.
तुमच्या सिनेमाबद्दल किंवा माझ्या लिखाणाबद्दल प्रतिक्रिया जरूर लिहा.
Micky and Bony are two very fast friends. They both are just teenagers. Micky has his mom, dad and younger sister at him home. Considering his age, he is very matured in thinking. His dad owns a video game parlor. And Micky likes to play video games a lot and being owner of the games parlor, he plays video games a lot. His father is not very happy with his always playing video games.
Over his summer holidays, Micky has been following a girl called Mitika. She is stunningly beautiful girl about 18-20 years old. She is dream girl of so many youths in the town, but does not have a boyfriend yet. Irrespective of the age difference Micky has fallen for Mitika. Once Micky is waiting for Mitika to show up on a street corner. They see her coming and decide to follow her. She enters an restaurant to join some of her friends. Bony and Micky follow her inside and sit on one adjacent table. Incidentally her friends get into a discussion on how their dream boyfriends will be. Mitika is talking about herself and says she would like a cute boy, with dimples. She will not mind if he is younger than her. In short Micky fits in her expectations. This really boasts Micky's courage and he goes to talk to Mitika while her friends are on counter to pick up some ice cream. On return her friends say. wow this kid looks like your dream boy. On this Mitika say oh this is just a kid. Micky is very sad hearing this.
He returns home with disturbed mind, and as he was entering the house, he overheard his parents conversation. They are in heated argument over something, and learns from his dad that he was an adopted child. This adds to his sorrow considerably and he goes off to a near by hill and cries sitting on a bench. He meets his friend Hitchcock there. This is an weird character, dressed odd and whatever he says becomes true. Hitchcock is trying to talk with him about his grief, so he starts a conversation with him. He says the cause of your sorrow is your age. You want to grow up soon. Micky agrees to this and says how can I grow up fast. Hitchcock tells him there is a wish well nearby and anyone drops a favorite possession and makes a wish with sincerity, that wish gets fulfilled.
Micky did not believe this wish well story, but decides to give it a try anyway. He has a coin, which is really his prized possession. He drops that coin with a wish of growing up immediately, but on opening his eyes, he is still the same. Frustrated with this, he goes home and sleeps. The next morning when he wakes up, he is a handsome adult man. Now what kind of advantages and disadvantages this brings to his life ? Is he able to get in good books of Mitika and get her ? Watch this in "Aao Wish Kare". Meaning in English "Let's Wish".
The movie is good, and specially for kids. Altaf has done a good job. The lead actress is new face, but has done a decent job too. There are a bit too many songs in the movie. If you like fantasies, you will enjoy it. Some parts are really funny. And some are touchy too. This is based on Tom Hanks movie "Big". We enjoyed this family movie and though this has not done good business in Box Office, I would recommend it to watch once.
If you have seen the movie already, do write your comments about the movie, if you have not seen it, please comment on this review.
Cast
- Aftab Shivdasani आफताब शिवदासानी
- Amna Shariff अमन शरीफ
- Rati Agnihotri रती अग्निहोत्री
- Johnny Lever जॉनी लिव्हर
- Yatin Karyekar यतीन कार्येकर
- Pushti पुष्टी
- Tiku Talsania टिकू तलसानिया
Direction
Movie DVD
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा