डियागो कोबायाशी हा टोकियो मध्ये एका ऑर्केस्ट्रा मध्ये चेलो वाजवत असतो. त्यांच्या ऑर्केस्ट्राला खूप प्रेक्षक नसतात. त्यामुळे सगळे कलाकार चिंतेत असतात. काय उपाय करावा म्हणजे आपला ऑर्केस्ट्रा चांगला चालेल याबद्दल ते विचार करत असतात. त्याच दरम्यान त्यांच्या ऑर्केस्ट्राचा मालक त्यांना आता ऑर्केस्ट्रा बंद झाला आहे असे सांगतो कारण त्याला यातून काहीच उत्पन्न मिळत नसते. आता अचानक नोकरी गेल्याने डियागो खूप चिंतेत पडतो. त्याने त्याच्या बायकोला न सांगता १८ मिलियन येनला एक खूप चांगल्या प्रतीची चेलो विकत घेतली असते. आता नोकरी गेली, कर्ज घेऊन चेलो घेतली पुढे काय असा मोठा प्रश्न पडतो. याची बायको मिका ही वेब डिझायनर असते. ती म्हणते की आपण चेलोचे कर्ज फेडू पण जेव्हा तिला कळते की चेलो खूपच महाग आहे तेव्हा ती हतबल होते.
डियागो विचारांती ठरवतो की चेलो विकून टाकायची आणि त्याच्या गावाला निघून जायचे. तिथे जी काय नोकरी मिळेल ते करायची आणि समाधानाने राहायचे. त्याचा निर्णय तो मिकाला सांगतो. मिका तयार होते, गावात त्याच्या आईने त्याच्या नावावर ठेवलेले एक घर असते. हे दोघे तिथे जातात. या घरात डियागोच्या सगळे बालपण गेलेले असते या घराशी त्याच्या सगळ्या आठवणी जडलेल्या असतात. आई-वडिलांचा घटस्फोट झाल्यावर आई डियागोला घेऊन याच घरात राहत असते, वडिलांच्या काही आठवणी त्याच्या सोबत असतात. पण आता मोठा झाल्यावर तो वडिलांचा द्वेष करायला लागलेला असतो. कारण घटस्फोटाचे कारण म्हणजे वडिलांचे एका दुसऱ्या बाई बरोबर असलेले संबध आणि तिच्यासाठी वडील डियागो आणि त्याची आईला सोडून गेलेले असतात.
आता गावी परत आल्यावर नोकरी शोधणे असा कार्यक्रम सुरु होतो. त्याला एक जाहिरात दिसते. त्यात लिहिलेले असते की डिपार्चर्ससाठी एक सहकारी हवा आहे. डियागोला वाटते की ही एखादी ट्रॅव्हल कंपनी असावी. तो तिथे जातो, तिथे गेल्यावर त्याला दिसते की बरीच कॉफीन ठेवलेली आहेत. त्याला जरा शंका येते. पण आता आलोच आहोत तर बॉसला भेटून बोलावे असे तो ठरवतो. त्या कंपनीचा मनेजर असतो, तो त्याला म्हणतो की मी तुला नोकरी देईन, आणि तुला ५००००० येन इतका पगार देईन. आणि ज्या दिवशी काम असेल त्या दिवशी काम करायचे. रोज काम असेलच असे नाही. सिझन मध्ये जास्त काम असेल. डियागोचे डोळे पगार बघून फिरतात. तो म्हणतो नक्की काय काम असणार. तेव्हा बॉस त्याला समजावून सांगतो की लोक मेल्यावर त्यांना स्वच्छ पुसून, सजवून, कॉफीन मध्ये ठेवणे इतकेच काम आहे. डियागोला ते पटत नाही. पण पगार खूप, अनुभवाची आवश्यकता नाही, काम कमी असे सगळा विचार करून तो हो म्हणतो. मग त्याचे बॉस बरोबर ट्रेनिंग सुरु होते. डियागोला नक्की काय अनुभव येतात, मिकाला कळते का हा नक्की कुठली नोकरी करतो आहे?, गावातील लोकांचे काय म्हणणे असते. त्याहून मुख्य म्हणजे डियागोला त्याच्या नोकरी बद्दल काय वाटते हे बघा "डिपार्चर्स" या सिनेमा मध्ये.
हा जापनीज सिनेमा आहे. जपान मध्ये अशी समजूत आहे की माणसाचा मृत्यू झाला की त्याला सजवायचे, त्या व्यक्तीची जी इच्छा असेल त्याप्रमाणे सजवायचे, पण त्या व्यक्तीने जर आधी इच्छा सांगितली नसेल तर घरातील लोकांची इच्छा असेल त्याप्रमाणे सजवायचे आणि मग त्या मृत शरीराला सदिच्छेपूर्वक पुरायचे. मृत्यू नंतर जे संस्कार करतात ते थोडे आपल्या हिंदुच्या जवळपास जाणारे आहेत. फक्त आपण इतकी सजवणूक करीत नाही. पण अंघोळ वगैरे घालतो. हे काम करता करता डियागोची अध्यात्मिक प्रगती कशी होते, त्याच्या बायकोचे आणि त्याचे संबध कसे बदलतात हे खूप सुंदर तर्हेने दाखवले आहे. तसेच वडिलांची माया कशी त्याला शेवटपर्यंत स्वस्थ बसू देत नाही आणि शेवटी वडिलांना सजवताना त्याला काय काय उलगडते हे बघायला हवे. सिनेमा आम्हाला आवडला. पण खूप लहान मुलांना घेऊन बघण्यालायक हा सिनेमा निश्चित नाही. या चित्रपटाला ऑस्कर, अकॅडेमी आणि अजून ३३ अवार्ड मिळाले आहेत.
Diago Koyabashi is an artist Cello with an Orchestra in Tokyo. The orchestra is not doing too well so the artists are worried. They are all discussing what can be done to improve the viewership. At the same time the owner walks into the meeting and finally announced the news everyone is scared to hear. He informs that he has closed the orchestra. Diago is really worried now due to this news. He has recently bought an expensive Cello for 18 million yens without telling his wife. He was hoping to pay off the money form his salary. His wife Mika is a web designer and not really earning too much. On getting the news of job as well as big loan, she is really helpless and worried too.
Finally he decides to sell off his cello and go back to his town, and find a new job there. He conveys that to Mika and she also agrees. He has his house which his mother has left for him. Both of them shift there and clean the house and make it ready for staying. Diago remember his childhood in the house. His parents separated when he was about six years old. His mother brought him us as single mother. He hated his father because he felt that he dumped Diago and his mother for some other lady.
On his return he starts looking for a job for himself. He spots a advertisement for job. It says there is a requirement for a companion for departure. He thinks that looks like a travel company and it will be a good job, so he goes in search of that with the address and lands up in the office. On entering the office he sees coffin there, so he get cautious. But since he has been there all the way, he decides to talk to the boss. He tells him that he will be paid 500K yen as salary. There will not be too much work every day, but in season it could get bit busy. He is excited looking at the salary figure, so he enquirers what kind of job it is ? Boss tells is the the work of undertaker. After death of any person, the job is to clean the body, make it up and put it inside a coffin. Diago is not comfortable with that, but his situations compels to take it up. High salary and no experience required, so the boss starts to train him. What all he learns, what all he experiences did Mika figure it out, how did she react all watch in the movie Departure.
This is a Japanese movie. The tradition there is after the death of any person, he needs to be cleaned and do make up, resembling its real life. Many old people will have a wish conveyed how they want themselves to be prepared. If not the family will decide about it. They are bit similar like Hindu rituals of bath and changing before the final journey. The movie had very nicely shown how he learn things, how his spiritual learning takes place and how he deals with his wife during this period. During all this time he always remembers his father and finally we need to see how he learns more about his father in this process.
The movie is really good and we would highly recommend it. Departures has been awarded Oscar, Academy and other 33 awards. This may not be suitable to watch with children.
Cast
- Masahiro Motoki मासाहिरो मोटोकी
- Ryôko Hirosue र्योको हिरोसुये
- Tsutomu Yamazaki श्युतोमू यामाझाकी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा