हरप्रीत सिंग हा एक अत्यंत सामान्य बुद्धीचा पदवीधर असतो. प्रत्येक परीक्षेत याला ४०% टक्क्याच्या वर मार्क कधीच मिळालेले नसतात. आता इतक्या कमी मार्कांवर कुठे नोकरी मिळणार असा याच्या मित्रांना प्रश्न पडतो. हा जरी सामान्य बुद्धीच मुलगा असला तरी याचे सगळ्या मित्रांशी खूप चांगले संबध असतात. म्हणजे तो कागदी परीक्षेत जरी मागे असला तरीही, लोकसंबध कसा नीट जपावा याची याला पूर्ण कल्पना असते. शिक्षण झाल्यावर पुढे उच्च शिक्षण घेण्याचा प्रश्नच नसतो. घरात आईवडील नसल्याने आजोबांनी याला मोठे केलेले असते. आता नोकरी करणे हा एकाच पर्याय याच्या समोर असतो. पण कुठली नोकरी करणार असा प्रश्न विचारला की "सेल्स" असे याचे उत्तर असते.
तर असा हा हरप्रीत नोकरीसाठी मुलाखत द्यायला AYS नावाच्या एका कॉम्पुटर विकणाऱ्या कंपनीमध्ये जातो. मुलाखतीला बोलावण्याची वाट बघत असताना त्या कंपनीतील सेल्स मधील लोकांच्या प्रत्येक हालचाली हा टिपून घेतो. मुलाखत घेताना, सेल्स मॅनेजर याला मुद्दामून इरेजर काढून घेतलेली पेन्सिल मला विक असे म्हणून त्याच्या समोर फेकतो. हा प्रयत्नांची पराकाष्टा करून पेन्सिल कशी चांगली आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न करतो. पण सेल्स मॅनेजर नितीनला काही पटत नाही. पण तितक्यात कंपनीचा मॅनेजिंग डिरेक्टर खोलीत येतो आणि नितीन म्हणतो की इतकी छोटीशी पेन्सिल हा मर्सिडीज म्हणून विकतो आहे, तू याला तुझ्या टीम मध्ये घे. नितीनची इच्छा नसते, पण मॅनेजिंग डिरेक्टर सुनील पुरीच्या आग्रहाखातर हा याला घेतो.
छोटेलाल मिश्रा हा या ऑफिस मधील प्युन असतो. याला ऑफिस मधील सगळे जण कप-प्लेट असे म्हणत असतात. मिश्राला हे आवडत नसते, पण हा कंपनीमधील सगळ्यात कमी दर्जाचा नोकर असल्याने याला बोलण्याचा काहीच अधिकार नसतो. कोयना म्हणून रिसेप्शनिस्ट असते. हिचा वापर एक अॅटम गिर्ल म्हणून केला जातो. हि ऑफिस मधील खूप कामे सांभाळत असते. गिरी म्हणून कस्टमर सपोर्टचा मॅनेजर. हा गिरी एक वल्ली असतो, ज्याला पोर्नोग्राफी फोटो बघण्यात खूप रस असतो. हा ऑफिस मध्ये बसल्या बसल्या हेच काम करत असतो. पण हा त्याच्या कामात खूप हुशार असतो. ऑफिस मधील सगळे सेल्समन एकमेकांशी खुनशीने वागत असतात. प्रत्येकाची एकमेकांशी स्पर्धा असते, आणि एकमेकांवर अजिबात विश्वास नसतो. थोडक्यात काय तर ऑफिसमधील वातावरण चांगले नसते.
साध्याभोळ्या हरप्रीतला हे सगळे बघून खूप विचित्र वाटते. पहिल्याच दिवशी याला वर्षभराचे टारगेट दिल्या जाते. प्रत्येक सेल्समनला शहरातील एक भाग वाटून दिलेला असतो. तो सेल्समन त्याच भागात सेल करू शकेल, तर हरप्रीतच्या वाटेला एक रेसिडंट एरिया येतो. हरप्रीत, नितीनला म्हणतो कि इथे तर कोणीच कॉम्पुटर घेणार नाही, त्यावर नितीन त्याला म्हणतो कि तू नवीन आहेस तुला हाच भाग सांभाळला पाहिजे. जेव्हा हरप्रीत फिल्ड वर जायला निघतो तेव्हा नितीन त्याची काम हरप्रीतला करायला सांगतो. तो असाच एका कंपनीत जातो, आणि तिथे त्याला लाच किती देणार असे विचारले जाते. हे बघून हा खूप गडबडून जातो व परत येताना कंपनीच्या तक्रार केंद्रात या अधिकाऱ्याबद्दल तक्रार नोंदवतो. याच्या तक्रारीमुळे कंपनीची मोठी ओर्डेर कॅन्सल होते.
सगळे लोक याला नाव ठेवू लागतात. व याला काही बुद्धी नाही हा एकदम झिरो आहे असे सुनील पुरी म्हणतो. हरप्रीतला बाहेर जाण्यास मनाई केल्या जाते, आणि ऑफिस मध्ये बसूनच याने कस्टमरला फोन करायचे असे ठरवल्या जाते. हा फोन करायला लागला कि ऑफिस मधील सगळे उरलेले सेल्समन याला कागदाची विमाने करून फेकतात. एकुणात याला इथे खूप अपमानित वागणूक मिळते. पण हरप्रीत सगळे सहन करतो. कोयना जरी फटाकडी असली तरी, तिला हरप्रीत बद्दल एक सॉफ्ट कॉर्नर असतो. ती त्याला चोरून २ कॉम्पुटर विकत घ्यायला उत्सुक असलेल्या ग्राहकांचे पत्ते देते. सुरवातीला हरप्रीत म्हणतो कि मला हे नको, पण शेवटी ते पत्ते ठेवतो.
दुसऱ्या दिवशी या ग्राहकांना चोरून म्हणजे कंपनीच्या लोकांना न सांगता भेटतो. तिथे त्या २ मुलींना नक्की कुठला कॉम्पुटर हवा आहे याची चौकशी करून तो कॉम्पुटर बाजारात कुठे असेम्बल करून मिळेल याची सगळी माहिती काढतो. कंपनी किती नफा घेते याचा हिशोब याच्या लगेच लक्षात येतो. आणि तेव्हाच तो ठरवतो, कि हे कॉम्पुटर आपण स्वत: विकायचा. त्याप्रमाणे तो सकाळी ऑफिस मधून या मुलींना कॉम्पुटरच्या डीलचा फोन करत असतानाच याच्या अंगावर एक रॉकेट येते. आणि त्याच आवेशात तो सांगतो कि तुम्ही "रॉकेट सेल्स कार्पोरेशन" या नावाने चेक द्या. तिथेच हरप्रीतच्या रॉकेट सेल्स कार्पोरेशनचा जन्म होतो. नंतर हरप्रीत कंपनी कशी पुढे नेतो व रॉकेट सेल्स काय काय कमाल करते, हे बघा "रॉकेट सिंग- सेल्समन ऑफ दि इअर" या सिनेमामध्ये.
सिनेमा टिपिकल हिंदी सिनेमा नाहीये. त्यामुळेच का काय, हा बॉक्स ऑफिस वर आपटला. हा सिनेमा बघून झाल्यावर एकदम ताज तवाने वाटावे इतका छान सिनेमा आहे. कुठेही वास्तवाची अवास्तव साथ सोडली नाहीये. सिनेमातील सगळी पात्र खूपच सुंदर रंगविली आहेत. सिनेमात एकाच हिरो आणि बाकी त्याला सपोर्टिंग असे नाहीये. सगळ्यांच्याच भूमिका तितक्याच महत्वाच्या आहेत. चक दे इंडिया च्या जोड गोळीने पुन्हा एकदा चांगल्या विषयावरील आशावादी सिनेमा दाखवला आहे. रणबीर कपूरचा हा पहिलाच सिनेमा मी बघितला, पण अभिनयात तो कुठे कमी पडला आहे असे वाटलेच नाही. बाकी बरेचसे कलाकार नवीनच आहे. त्यांच्या अभिनयावरून सगळ्यांनी खूप मेहनत घेतली असावी असे वाटले. हा सिनेमा जरूर बघावा असे मी म्हणीन. सिनेमाचे ट्रेलर बघून सिनेमा बघावा किंवा नाही हे ठरवत असाल, तर सिनेमाचे प्रोमो मात्र निश्चित कमी दर्ज्याचे आहेत.
तुमचे या सिनेमाबद्दल काय मत आहे हे जरूर अभिप्रायात लिहा.
Harpit Singh is a commerce graduate with very ordinary academic records. He has never scored more than 40% marks in his college. More than him, his friends are worried how he is going to get a job. But he has a very good friends circle and he has maintained very good human relations. And he is very clear in mind that he doe not want to study further. His grandfather has raised him so far and now as soon as possible he needs to get a job for himself. On being asked anytime what kind of job he would get into he always replies with confidence S-A-L-E-S.
Harpit approaches a company called AYS, which is into sales of PCs. While waiting for the interview, he is very closely observing the sales staff of the company. The sales manager Nitin checks his academic records and is not very happy with him. But when Harpit insists he can do a good job with sales, passes him a pencil after removing its eraser and challenges him that he should sell it to him for Rs.100. Harpit takes this challenge and tries very hard to convince him, but Nitin is not convinced. At this point Sunil Puri the managing director of the company enters Nitin's office and tells Nitin to hire Harpit, since he was impressed with Harpit's hard work to try to sell a pencil as if it was a Mercedes Benz Car. With a bit of resentment Nitin agrees and hires Harpit.
Chhotelal Mishra is a office boy / peon in the office with jobs like serving tea / coffee, clearing plates, moving files etc. Everyone calls him Cup-Plate, which he finds insulting, but has no choice, since he needed the job. Office receptionist and telephone operator, Koyana, she too has similar situation. She is very efficient and able person, but she is more used as eye candy for the office. Giri is customer support manager, he is one character in itself. He spends most of his time in office watching pornography photographs. He is very good in his work. All the sales team has unhealthy and cut throat competition among each other. Rather than helping and working as a team, they are trying to prove each other wrong and try to prove they are smarter than others. In general we can say the work culture is not good.
Harpit is fresh out of college and is not aware of the office politics. He is uncomfortable with all these. On top of it, he is given a big target for a year. Whole city is divided in sales zones among the sales team members. Every sales person has to operate in his own territory. Harpit is assigned a region which is largely residential area, which may not have much of computer business. Harpit tries to talk this to Nitin, but he tells him being a new comer Harpit has to work in that category. Now Nitin started using harpit for his small tasks like moving some documents, dropping off quotations etc. But in the process he learns a big philosophy from Nitin, "Even Spiderman has to take risks in life, then why not a salesman ?" On one of such job, Harpit visits a company to hand over a quotation for a big order, the office in charge directly asks him how much he can give him under the table to award Harpit's company the order. Harpit is a new comer and straightforward guy, he gives a complain about this officer in customer's company, and in the process looses the big order.
This earns a bad name to Harpit rather than praise. Sunil Puri starts calling him duffer and zero IQ person in front of all the people. Harpit is stopped from making any marketing calls outside, but has to make only phone calls to get business. All the sales team starts teasing him and when he is busy making calls, they will throw paper rockets. He is insulted by all the sales team. Koyana is bold and rough in communications with most office members, but she has some soft corner for Harpit. She secretly passes him couple of inquiries for computer orders. Initially Harpit hesitates, but later accepts the contacts.
Next day, Harpit directly visits the clients and finds out, it is a newly started company by two fresh graduate students. He gets the specifications from them and explores the assembled computers market on his own. Very quickly he realizes the amount of profit the company is making on such computers. After a lot of mental calculations, he decides to pick up and fulfill the order himself, rather than the company. While in the office, he receives the call form the client, for the order and he finalizes it. When it come to payments, he is banged by one more rocket from one of his naughty colleague. In a spur of a moment, he tells the client to pay the check on Rocket Sales Corporation. This was the moment, a new company is born, it takes some shape, has some really rough times you need to enjoy in Rocket Singh Salesman of the year.
This is not a very typical Hindi movie. I am not sure, how well it fared on the box office. But I liked the movie because of its optimistic outlook. Good thing about the movie is it is very much down to earth and realistic story. All the characters in the movie are played well. This movie is made by the same team as "Chak De India". It is a good balanced movie, having several characters with significant roles rather than a single hero centric movie. Ranbeer Kapoor has justified the role he has been offered with his spark of acting. Several new faces had done well in the movie. I would recommend you to watch this family movie. Do not decide looking at the theatrical trailer of the movie, which we feel is not well done.
Do write your comments on the movie and the review.
Cast
- Ranbir Kapoor रणबीर कपूर
- Prem chopra प्रेम चोप्रा
- Gauhar Khan गौहर खान
- Gauhar Khan मुकेश भट्ट
- Naveen Kaushik नवीन कौशिक
- Manish Chaudhari मनीष चौधरी
- Sumeet Darshal Dabhal सुमीत दर्शल दाभाल
- Mokshan dodwani मोक्षण दोडवाणी
- Bikramjeet Kanwarpal बिक्रम्जीत कन्वरपाल
- Shazahn Padamsee शाझाहन पदमसी
- D.Santosh डी.संतोष
- Neeraj Sood नीरज सूद
Director
- Shimit Ameen शिमित अमीन
Movie DVD
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा