हि गोष्ट आहे रेनबो नेशन मधील. कॉम्रेड्स मॅरॅथॉन हि जगातील एक कठीण मॅरॅथॉन समजली जाते. या सिनेमाची गोष्ट या कॉम्रेड्स मॅरॅथॉनच्या अवती-भवती फिरते. या सिनेमाचा हिरो बेरी, ह्याच्या आयुष्यात धावपटूंना कोचिंग देण्याशिवाय काहीही नसते. ह्याला रात्रंदिवस सगळी कडे धावणेचे दिसत असते.
बेरी एका विटा बनवण्याच्या फॅक्टरी मध्ये काम करत असतो. तिथे ४ काळे लोक खूप चांगले धावत असतात. त्यामुळे बेरी त्यांना ट्रेनिंग देण्याचे ठरवतो. चौघेही जण बेरीवर खूप विश्वास ठेवून असतात. बेरी आता म्हातारा झालेला असतो, त्यामुळे बेरीला नोकरीवरून काढण्यात येते. त्याच्या जागेवर गाजा नावाचा एक तरुण मनुष्य येतो. गाजा आल्यावर, या चौघांचे धावणे बंद पडते. बेरीला असे सांगण्यात येते कि जर तू या चौघांना पुन्हा धावण्याचे ट्रेनिंग दिले तर या चौघांची नोकरी जाईल. असे सांगितल्यावर बेरी त्यांना सांगतो कि तुम्ही माझा विचार करू नका, तुम्ही तुमची नोकरी करा. बेरीच्या आयुष्यात "पळणाऱ्यांना" ट्रेनिंग देणे या शिवाय दुसरा कुठलाच विचार नसतो. त्यामुळे त्याला आता काय करावे असा खूप मोठा प्रश्न पडतो. त्याच दरम्यान त्याला एक मुलगी रोज एका विशिष्ट ठिकाणी पळताना दिसते.
तो हिच्या मागावर जातो. हिचे नाव असते ख्रिस्तीन. हि नामिबियाची रहिवासी असते आणि आता तिथून पळून येऊन साउथ आफ्रिकेमध्ये आलेली असते. साउथ आफ्रिकेतील लोकांना असे पळून आलेले लोक आवडत नाही आणि त्यांना पकडून नेतात. त्यामुळे हिच्या मागे पोलीस लागतात आणि असेच ख्रिस्तीनला एकदा पकडून नेतात. आता ख्रिस्तीनला प्रश्न पडतो कि काय करावे. पण बेरी हिच्या मागावरच असतो. तो खटपट करून हिला सोडवतो. तिला स्वतच्या घरी घेऊन येतो.
ख्रिस्तीनला सांगतो कि तुझ्या मध्ये पळण्याचे खूप चांगले टॅलेंट आहे, मी जसे सांगीन त्याप्रमाणे जर का तू वागशील तर तू खूपच लवकर जग प्रसिध्ध होशील. ख्रिस्तीनला सुरवातीला याबद्दल खूप काही प्रेम वाटत नाही. थोड्या दिवसाने तिला खरतर बेरीच्या शिक्षणाचा जाच होऊ लागतो. तिच्या मते पळायला आवडेल, पण सारखे दिवस रात्र पळण्याचा विचार शक्य नाही. आयुष्यात दुसरे देखील काहीतरी हवे.
बेरी ख्रिस्तीन साठी सगळे करीत असतो. ख्रिस्तीनला राहण्यासाठी जागा नसते त्यामुळे ती बेरी कडेच राहत असते. बेरी तिच्या साठी सैपाक करतो. तिच्या धावण्याच्या व्यायामाला योग्य असाच आहार तो तिला देतो. तिच्या जेवणाच्या वेळा पाळतो. पण शेवटी शेवटी ख्रिस्तीनला सोन्याच्या पिंजऱ्यात बंद असल्या सारखे वाटू लागते. बेरीची मुलगी त्याचा गावात असते. बेरीच्या मुलीला ख्रिस्तीन तिच्या मनातील गोष्ट सांगते. पण मुलगी काही तिला मदत करू शकत नाही. कारण बेरीला कोणीतरी ती मॅरॅथॉन जिंकणे हेच महत्वाचे वाटत असते आणि त्यापुढे बेरी काही एक ऐकणार नाही याची संपूर्ण जाणीव त्याच्या मुलीला असते. त्यात गाजा बेरीला शह देण्याकरता ख्रिस्तीनच्या प्रेमात पडण्याचे नाटक करतो. त्याने तिचे धावण्यातील लक्ष उडते. बेरीचे ध्येय व ख्रिस्तीनच्या स्थलांतरित जीवनातील संघर्ष यात पुढे काय होते हे बघा "लाँग रन" मध्ये.
सिनेमा उत्तम आहे. सिनेमा बऱ्यापैकी जुना आहे. कुठे बघायला मिळाल्यास जरूर बघावा. सिनेमा इन्स्पिरेशनल आहे. मुलांना दाखवावा.
This is a story in South Africa. Comreds Marathon is one of the toughest and prestigious race in the world. The story line of this movie is woven around this competition. Comred marathon is assumed to be a difficult marathon due to its path. The path of marathon goes around mountains and this is the hardest patch in the marathon. The main character of the movie is Berry and he is a coach. He himself had tried this marathon and could never complete it. His life is just about running and coaching runners. Berry has a day job in brick factory. He has four African runners working there. Berry decides to work on them for the upcoming marathon. The runners too were liked Berry and has respect for him. But Berry looses his job, the unsaid reason being his age. New supervisor Gaja is a young man, but not interested in running at all. So these four runners are not permitted to run. Berry is told, if he remains involved in training the four guys, they would loose jobs.
Berry is frustrated, but for the runner's good, he tells them not to keep in touch with him. Berry has a big void in his life, because he has nothing but running and training on his mind. During this time, he sees a girl running on the same road couple of times. Berry follows the girl and finds out her name is Christine and she is from Namibia. She has fled her country and came to South Africa. South African's hate the illegal emigrants like her, and police are always on lookout of such people. Christine is caught by police during this time. Fortunately Berry is on watch, and realizes the problem. He uses his contacts and manages to get her released on bail and brings her home.
Berry tells Christine that she really has some running talent and she should use Berry's coaching to become a successful runner. Christine is not too happy with Berry but has no choice for the time being. As the training proceeds, she really gets pissed up with his coaching. She enjoyed running, but doing this day in and day out is not possible for her. She feels person needs to have some life beyond running too. Berry is doing all the things for Christine. She is staying in his house itself. Berry is cooking healthy food for her. He keeps her food timings very meticulously. But being a young lady, Christine starts finding this too rigorous and jail like.
Berry's daughter is in the same city, Christine tries telling her about the situation, but his daughter was not able to her either. Berry is totally dedicated to work on Christine to make her major contestant in the marathon. Gaja tries to lure Christine, pretending that he is in love with her, just to prove him better against Berry. Christine gets involved a bit and looses her concentration on her workout. The struggle of Berry for the marathon and Christine's life as illegal emigrant is beautifully captured in the movie Long Run.
The movie is motivating and enjoyable. Do not miss the opportunity to watch this movie. It is a good family movie.
Cast
- Armin Mueller-Stahl अरमिन मुलर स्टल
- Nthati Moshesh स्तति मोशेह
- Paterson Joseph पॅटरसन जोसेफ़
- Seputla Sebogodi सेपुल सेबोगोडी
- Desmond Dube देसमन्ड दुबे
- Anna-Mart van der Merwe अॅना-मार्ट वॅन दर मेरवे
- Chrostopher Kubheka ख्रिस्तोफर कुभेका
- Gift Leotlela गिफ़्ट लिओटेला
- Jeremia Ramasita जेरेमिया रामासिता
- Johann Potgieter जोहान पॉटगिटर
Grade 23 titanium ore recipe | The Institute of Horticulture
उत्तर द्याहटवाA titanium mens rings relatively young thaitanium stone age stone age titanium rings for women is a highly-structured ore that is used in the grinding of grinding or other benjamin moore titanium grinding titanium vs ceramic operations of grinding or other grinding methods. It is not