मंगळवार, एप्रिल १२, २०११

आय हॅव फाऊंड इट - I have found it (kandukondain kandukondain)


सौम्या, मीनाक्षी, कमला अश्या तिघी बहिणी, त्यांची आई पद्मा आणि अंथरुणाला खिळलेले आजोबा यांच्या बरोबर तामिळनाडू मधील एका छोट्याश्या गावात राहत असतात. सौम्या हि सगळ्यात मोठी बहिण आजोबांची प्रॉपर्टी व्यवस्थित सांभाळत असते. आजोबा खूप श्रीमंत असतात. त्यांचे खूप मोठे घर असते, त्यांनी एक खूप सुंदर देऊळ देखील बांधले असते, शिवाय त्यांची एक मोठी शिक्षणसंस्था असते. सौम्या तिथेच प्रिन्सिपॉल म्हणून काम बघत असते. मीनाक्षीचे शिक्षण झालेले असते आणि तिला गाण्याची आवड असते. कमला अजून शाळेत जात असते. पद्मा म्हणजे या तिघींच्या आईने तिच्या वडिलांच्या इच्छेविरुध्ध पळून जाऊन लग्न केलेले असते. त्यामुळे वडिलांचा तिच्यावर राग असतो. पद्माला एक भाऊ असतो साई, तो अमेरिकेत असतो. वडिलांची तब्येत बिघडते, भाऊ यायला नकार देतो , तेव्हा पद्मा सगळे विसरून वडिलांची सेवा करायला घरी येते. वडिलांची तब्येत इतकी बिघडते, कि ते नीट बोलू देखील शकत नाहीत. त्यामुळे त्यांचा पद्मावरील राग गेला आहे हे समजायला मार्ग नसतो.

तर अश्या कुटुंबामध्ये, सौम्याचे एकदा लग्न ठरते. मुलगा अमेरिकेचा असतो. साखरपुडा करण्यासाठी तो येत असताना, तो आत्म्यहत्या करतो. सगळ्यांना वाटते, की हिच्याशी लग्न ठरले म्हणूनच त्याने आत्म्यहत्या केली. त्यानंतर जी पण मुलं हिला बघायला येतात त्यांना काहीना काही तरी होते. त्यामुळे हिच्या पत्रिकेत काहीतरी ग्रह वाईट आहेत, त्यामुळे हिचे लग्न ठरत नाही असा आईचा ग्रह झालेला असतो. त्यावरून जेव्हा जेव्हा हिला बघायला मुलं येतात आणि त्यांची बोलणी फिसकटतात तेव्हा तेव्हा आई हिच्या नशिबाबद्दल बोलते.  एकदा मुलगा बघायला येणार म्हणून सौम्या तयार होते, आणि दार उघडते तर मनोहर म्हणून एक सिनेमा स्क्रिप्ट लिहिणारा, घर शुटींग करायला देणार का म्हणून विचारायला येतो. यांना वाटते की हाच मुलगा आहे. आणि त्या कन्फुजन मध्ये मनोहरला समजते कि हिचे लग्न ठरत नाहीये. पण पहिल्या भेटीतच त्याला सौम्या आवडली असते. याचे वडील खूप श्रीमंत असतात त्यांचा मोठा उद्योग असतो. त्यांना मनोहर सिनेमात काम करतो आहे हे आवडत नसते. पण मनोहरला तेच आवडते आणि तो वडिलांच्या उद्योगात मदत करत नाही. तो आई-वडिलांना सांगतो कि त्याला सौम्याशी लग्न करायचे आहे पण ते नकार देतात. मग तो ठरवतो कि तो त्याचा पहिला सिनेमा काढेल आणि मगच सौम्याशी लग्न करेल. सौम्याला पण तो आवडू लागतो.

असे दिवस जात असताना, त्यांच्या देवळात एक कार्यक्रम असतो, तो कार्यक्रम बघायला बरेच लोक येतात. तिथेच मेजर बाला पण येतो. याचा एक पाय तुटलेला असतो. श्रीलंकेच्या पीस फोर्स मध्ये गेला असताना त्याचा पाय एका बॉम्बवर पडतो व त्याचा पाय तुटतो. मेजर बालाला मीनाक्षी खूप आवडते कारण तिचे गाणे खूप सुंदर असते. पण मीनाक्षीला बाला आवडत नाही अर्थात तिला त्याच्या बद्दल कणव असते. मीनाक्षीच्या प्रेमाखातर बाला दारू सोडतो, व्यायाम करायला लागतो. बाला मीनाक्षीला गाणं पुढे शिकण्यासाठी प्रोत्साहन देतो. मीनाक्षीला भारती नावाच्या कवीच्या कविता खूप आवडत असतात ती त्याच्या कविता पद्यात खूप सुंदर म्हणते. मिनाक्षिनी ठरवले असते की ती मुलगा बघून लग्न करणार नाही तर तिचे ज्याच्यावर प्रेम होईल त्याच्याबरोबर ती लग्न करेल. तश्यातच तिला श्रीकांत भेटतो, ह्याचा चीट फंडचा उद्योग असतो. हा दिसायला खूप गोजिरवाणा, बोलायला खूप गोड असतो. त्यामुळे मीनाक्षी त्याच्या प्रेमात पडते. हे बघून बालाला खरंतर खूप दुख होते, पण तो ते मनात ठेवतो आणि विचार करतो कि मीनाक्षीपेक्षा आपण खूप मोठे आहोत त्यामुळे मीनाक्षीने दुसऱ्या मुलाबरोबर लग्न केले तरी हरकत नाही. तिच्या आवाजावर म्हणजे तिचे गाणे ऐकत आपण आयुष्य काढू शकू.

पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच असते. त्यांचे आजोबा मरण पावतात. मरण्यापूर्वी ते सारखे एका पेटीकडे हात दाखवत असतात आणि ती उघडा असे सांगत असतात. पण कोणीच त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाहीत. त्यांना त्यांच्या अमेरिकेतील मुलाला भेटण्याची खूप इच्छा असते, त्यामुळे ते तेच बोलत आहेत असे सगळ्यांना वाटते आणि त्यांच्या इच्छेकडे दुर्लक्ष केले जाते. वडील गेल्यावर त्यांचा मुलगा साई, बायकोबरोबर परत येतो मग मृत्युपत्राची शोधाशोध सुरु होते. ते मृत्युपत्र कुठे असते व त्यात काय लिहिलेले असते ? सौम्याला तिचा मनोहर मिळतो का ? मीनाक्षीचे कोणाबरोबर लग्न होते ? तिच्या गाण्याचे पुढे काय होते? या सगळ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे "I have found it " मध्ये आहेत.

सिनेमा तमिळ आहे. मला तमिळ येत नाही पण तरीही सबटायटल लावून बघितला. सिनेमा मस्तच आहे. त्याची स्टोरी एकदमच समजून येणारी आहे. पण तरीही सिनेमा बघायला छान वाटते. मुख्य तब्बू आणि ऐश्वर्या या दोघी असल्याने हा सिनेमा बघावासा वाटतो. सिनेमातील गाणी तोंडावर घोळत राहतील अशी आहे. ए. आर. रहमानचे संगीत आहेत. जरी ती गाणी काहीच समजत नसली तरी म्हणावीशी वाटतात. दोघीही जणी खूप सुंदर दिसतात. या सिनेमात दोघींनी कुठेही अंग प्रदर्शन केले नाहीये. साडी किंवा पंजाबी ड्रेस मध्ये आहेत. तमिळ येत नसतानाही सिनेमा बघावा असा आहे. घरातील सगळ्या लोकांबरोबर बघण्यालायक निश्चितच आहेत.

तुमच्या प्रतिक्रिया जरूर लिहा.

Soumya, Minakshi a.k.a. Minu and Kamala are three sisters from a small village in Tamilnadu. They have their mother Padma and old ailing grandfather in the house. Soumya is the eldest daughter, who is taking care of their family property. They have sufficient for making a decent living with spacious house and a small temple in the yard. They also run a school and Soumya is the principal of the school. Minakshi has just finished her studies and is very much into singing. Kamala is a school student yet. 

Padma has married against her fathers wish, and he is still angry with her and not in talking terms with her. He gets sick and Padma's US based brother refused to come back and take care of him. Padma decides to forget her past trouble with dad and goes home to take care of him. Her father is so sick, that he has lost his voice, so she not able to know of he has forgiven her, but still continues to take care of him.

During this time, Soumya gets a relationship proposal from a US based person. But unfortunately on his way back to India for their engagement, this person commits suicide. She gets blames for this incidence. Later on few more proposals get rejected for some reason or another. Finally they all start thinking that her astronomical situation is not suitable. One more incidence of proposal getting fussed out, her mother starts blaming her destiny.

One more time, she is expecting another family to visit them for discussions, she is all ready to receive them. She answers the door knock and there stands Manohar, who is working as a script writer and assistant director of a movie. They are in town for shooting for a movie. And he has come to ask the family if they can rent their house for some time to shoot some sequences for the movie. But they confuse him for the prospective. In all this confusion, Manohar learns about her problems. Manohar has fallen in love at first sight. He is from a very rich family. His father runs a big business, but is unhappy with Manohar, because he is not helping him in the business and has this craze for making movies. He tells his parents about his intentions of marrying Soumya but they flatly refuse. He takes a decision at that moment. He will make his first movie and then marry Soumya. Soumya has also started liking him.

Major Bala is introduced to the family in one of the functions in the temple, He has lost one of his legs in Srilanka while working as peace keeping force. So he is retired from the service and is now running a florist and nursery business in the village. He likes Minakshi very much for her singing talents. Minakshi has sympathy for Bala but not love. For Minakshi's love, Bala stops his drinking habit. He also encourages Minakshi for singing. Minakshi is fond of the famous poet Bharathidasan. Minakshi is a independent person. Looking at Soumya's experiences with marriage, she decided that she will marry a person according to her will and not the traditional way. Minakshi meets Shrikant during this time. He has a business of his own. He is very well behaved and nice looking. He is also interested in poetry. Very soon both of them are in love with each other. Bala is disturbed due to this. But he makes up his mind. He is much elder than Minakshi anyway, so decides to be on his own and live life listening to her songs.

But destiny has her own way. Minakshi's grandfather dies during this time. Before his death, he is always pointing towards a suitcase and telling them to open. As he is not able to talk, no one really understands the meaning of this. They all think he is suggesting them to call his son from US. Finally after his death, his son Sai comes back to India with his wife to perform the rituals. After things settle down a bit they, they started looking for his will. Where did they find the will ? What was in the will ? Did Soumya marry Manohar ? Did Minakshi marry Shrikant? What does Bala do? Could Minakshi pursue her singing? Do watch "I have found it" for the answers.

This is a Tamil movie, and my Tamil language skills are null, but still I enjoined the the movie with subtitles. We enjoyed the movie, Both Tabbu and Aishwarya are good. Songs are really nice and A R Rahman's music is very good. Though I could not get the meaning of the songs, we kept on singing them. The movie is really good family movie and can be enjoined with family.

Do comment about our review.


Cast
  • Aishawarya Rai ऐश्वर्या राय
  • Tabbu तब्बू
  • Mamothy मामुटी
  • Ajit अजित
  • Abbas अब्बास
  • Shreevidya श्रीविद्या 
  • Shamili शामिली
  • Raghuvaran रघुवरन   

Direction
  • Rajiv Menon राजीव मेनन


A bollywood adaptation of Jane Austen's Sense and Sensibility
Movie DVD

1 टिप्पणी: