अमोल चिटणीस एक अतिशय निरागस, प्रसन्न, स्वच्छंद व मनमोकळी मुलगी एका कॉलेज मध्ये मराठीत
एम. ए. करत असते. हिला एक लहान भाऊ असतो. घरात आई, वडील आणि हि दोघे भावंडे असे राहत असतात. वडील प्रकाशक असतात. अमोल चिटणीस वर्गात जेव्हा शिक्षक कविता शिकवत असतात, तेव्हा त्या कवितांचे नुसते रसग्रहण करत नाही तर त्यात ती रममाण होते. वर्गात जास्त मुली आणि कमी मुलं असतात. एक दिवस अचानक फादर रोड्रीगो त्यांच्या कॉलेज मध्ये दाखल होतात. ते त्यांच्या वेशात येतात त्यामुळे सगळ्या मुलांना ओळखू येतात. प्रौढत्वाकडे झुकलेले फादर सगळ्यांच्या कुतूहलाचा विषय बनतात. पण फादर मात्र शांतपणे वर्गात एकटेच मागच्या बाकावर बसतात.
अभ्यंकर सर कविता शिकवत असतात, आणि बरेचदा सगळी मुलं त्यांची टर उडवत असतात. अमोलला अभ्यंकर सरांकडून बरेचदा टोमणे ऐकावे लागतात, कारण हि मुलगी कविता शिकवणे सुरु झाले कि त्यातील स्वप्नात रममाण होते.
फादर रोड्रीगो यांना मराठीत एम. ए. करण्याची खूप इच्छा असते, पण फादर झाल्यामुळे त्यांना वेळ मिळालेला नसतो. आता थोडा वेळ मिळाल्याने ते एम. ए. करण्याचे मनावर घेतात. वर्गात सगळी मुलं लहान आणि हे एकटेच मोठे, ह्यामुळे ह्यांना खूप अवघडल्यासारखे वाटते. ते अवघडलेपण अमोलच्या लगेच लक्षात येते व फादरला वर्गात सामावून घेण्याच्या दृष्टीने ती त्यांच्याशी गप्पा मारू लागते. फादर आणि अमोलची मैत्री वाढू लागते.
इकडे चर्च मध्ये एक मारिया नावाची मुलगी फादर रोड्रीगोला भेटायला येते आणि सांगते कि तिला फादर सम्युअल पासून दिवस गेले आहेत. रोड्रीगो, मारियाला सांगतो की ते सुपेरीअरशी बोलतील आणि फादर सम्युअलला तुझ्याशी लग्न करायला भाग पाडण्यात येईल. पण प्रत्यक्षात सुपेरीअर फादर, मारियाच्या आई वडिलांना तिचे लग्न दुसऱ्या मुलाशी करून देण्याचा सल्ला देतात. या निर्णयाने फादर रोड्रीगो खूप खिन्न होतात. या प्रसंगानंतर त्यांचा चर्चमध्ये असलेल्या मुल्यांवरील विश्वासाला तडा जातो.
फादर या गोष्टींवर खूप विचार करतात. सुपेरीअरच्या मताच्या विरुध्ध जातात, त्यामुळे सुपेरीअर त्यांना एका दूरच्या गावात सेवेसाठी पाठवू लागतो. त्यामुळे यांचे क्लासेस बुडू लागतात. फादर कॉलेज मध्ये येत नसल्याने इकडे, अमोल खूप अस्वस्थ होते. तिला त्यांची खूप काळजी वाटू लागते. फादर तिला तिथे भेटतात आणि मग अमोलला खूप बर वाटत. फादरला देखील अमोल भेटल्याने खूप छान वाटते. शेवटी या दोघांचे जुळलेले भावबंध त्यांना कुठवर आणि कशी साथ देतात, या भावबंधाचे पुढे काय होते हे बघा "मनातल्या मनात" या सिनेमामध्ये.
सिनेमा ठीक आहे. बघावाच असा काही नाही. सिनेमाचा शेवट मात्र अनपेक्षित आहे. फादर गावातून कॉलेज मध्ये जाताना, सायकलवर जातात, ते सारखे सारखे आणि बराच वेळ दाखवून खूप वेळ वाया घालवला आहे असे वाटते. गोष्ट खूप वाढवता आली नाही पण सिनेमाची वेळ तर कमी करायची नाही या तत्वामुळे, हा वेळ घालवला आहे कि काय असा प्रश्न पडतो. त्याचप्रमाणे, अमोल आणि फादर रोद्रिगो मध्ये धर्मावर झालेले संवाद खूप खोटे वाटतात. फादर जेव्हा सांगतात कि सगळे धर्म म्हणजे अंतिम ध्येयाकडे नेणाऱ्या वेगवेगळ्या वाटा आहेत. हे वाक्य अगदीच खोटे वाटते, कारण ख्रिश्चन धर्माच्या मते, येशू हाच फक्त मार्ग आहे. हे वाक्य हिंदू धर्माचे म्हणून अमोलच्या तोंडी घातले असते तर ते जास्त भावले असते.
फादर रोद्रिगो म्हणून गिरीश ओक आहे. अर्थात त्यांनी काम चांगले केले आहे, यात वादच नाही. अमोल (बहुदा हेमांगी कवी) हिचे काम ठीक आहे. सिनेमा सगळ्यांनी एकत्र बघता येईल असा आहे, पण सिनेमाच मुळात "बघावाच" या विभागात मोडत नसल्याने, फार वेळ असल्यास सिनेमा बघा.
तुमच्या प्रतिक्रिया जरूर लिहा.
Amol Chitnis is a pleasant, open minded and simple girl doing her MA in Marathi. She has a younger brother in 10th standard. They has a happy family with parents. Her father is publisher of books and mother is home maker. Amol had a habit of enjoying poems in the class, and frequently gets lost in the thoughts about it, living them in the dreams. As expected there are few boys and more girls in the class doing MA in Marathi.
One day Father Rodridgo comes to the class with intention to join college for MA. Since he is in his robe, everyone know he is a Father in a church. He is a middle aged man much older than most of the students, so all the students are curious about him. But Father is well composed person and sits on one of the class benches.
From first day itself Amol develops friendship with Father. She learns that Father was very much interested in perusing MA in Marathi but since he had to serve church, he could not pursue his MA that time. Now with some time to spare he decides to take up that wish and joins college. He is also planning to restart the magazine, which was closed down by the church due to lack of interested personnel to run it. Amol is helping him to bridge the generation gap between Father and other students in class, and very soon they are good friends.
One of those days in the church Father meets a girl called Maria, who is frequent church visitor. She seems very upset and on further probing revels that she is pregnant and carrying a child of Father Samuel. Rodrigo promises her to talk to Father superior and permit Father Samuel to marry her. As per the promise he goes and talks to Father superior. But Father superior advises Maria's parents to marry her off to another person. Father Rodrigo is sad and disturbed due to this incidence. He looses his faith on the church and its value system.
Father Rodrigo is deeply thinking about all this, discusses this with some of his colleagues and finally goes back to Father Superior and discusses this. In return Father Superior sends him to another church for extra work. As a result he is not able to attend classes. Amol tries to contact Father in his absence and is worried about his well being. Finally looking for him she reaches the church and meets Father Rodrigo there. Both are very happy so see each other after a while. Amol invites him for a dinner at her home. This is a beginning of a delicate emotional relationship between them. The movie develops nicely from hereafter.
The movie is OK and not in "must watch" category. The movie ends with a bit of unexpected and interesting twist. At times movie gets repetitive like the Father riding bicycle from his church to the college. Some interesting discussions between Father Rodrigo and Amol on religion. One of the Father's statement is All the religions are different paths leading to the same ultimate god. This does not really fit into conventional Christen preaching but fits more with the understanding of Hinduism, so would have been appropriate if said by Amol.
Girish Oak as Father looks good and he has acted well. Hemangi Kavi as Amol is good too. The movie is a family movie and can be watched with children. Final note is watch the movie if you have time do and comment on the movie and review in the comments section.
Cast
- Dr. Girish Oak डॉ. गिरीश ओक
- Hemangi Kavi हेमांगी कवी
- Purushottam Berde पुरुषोत्तम बेर्डे
- Rajan Tamhane राजन ताम्हाणे
- Anand Abhyankar आनंद अभ्यंकर
- Anant Abhyankar अनंत अभ्यंकर
- Smita Tambe स्मिता तांबे
- Gaurang Choudhari गौरांग चौधरी
- Milind Phatak मिलिंद फाटक
Direction
- Girish Mohite गिरीश मोहिते