शुक्रवार, एप्रिल २४, २००९

मुंबईचा डबेवाला (Mumbaicha Dabewala)

मुंबईचा डबेवाला हा आता जगप्रसिद्ध आहे. इंग्लॅण्ड च्या राजा पासून six-sigma experts पर्यन्त सर्वजण यांना ओळखु लागले आहेत. त्यामुळेच की काय यावर एक चित्रपट काढलेला दिसतो.

या चित्रपटाचे कथानक अगदीच साधारण पठडीतले आहे. एक सच्चा इमानदार डबेवाला कथेचा नायक. मग प्रेमाचा त्रिकोण, वरून सभ्य दिसणारा खलनायक, मोठे देशद्रोहाचे कारस्थान, त्यात नायक गोवला जाणे, ...... नावावरून या चित्रपटात कमीतकमी मुंबईच्या डबेवाल्यांचे जीवन बघायला मिळेल अशी अपेक्षा होती पण ती सुद्धा नीटशी साधली नाही.

या चित्रपटात फारसे काही पहाण्यासारखे वाटले नाही. पण भारत जाधवचे सच्चे चाहते असलात तरच या चित्रपटात वेळ खर्च करा.

सिनेमा बघून झाल्यावर / बघितला असल्यास आपल्या प्रतिक्रियांची प्रतीक्षा आहे.

Mumbai Dabewala has become a well- known community from Six Sigma to Duke of Edinburgh for their efficient handling of material without mistakes by un-educated people. So the movie industry also decided to cash on it with this movie Mumbaicha Dabewala.

This is a story of a youth in the Lunch Tiffin Delivery Business of Mumbai. The story line is a very typical bollywood "masala" movie. Simple and honest hero, love triangle, villain pretending to be a honest gentleman but trying to sell top level country secrets to foreigners etc.

The movie fails to make any point or even show the real life of Mumbai Dabawala Community. So unless you are big time fan of Bharat Jadhav, you are not recommended to invest the time to watch this movie.

Do leave your comments, if you have seen the movie.

Cast


Direction
  • Manohar Raghoba Sakhankar मनोहर राघोबा सखणकर
Link to watch online
Mumbaicha Dabewala on Marathi Tube

शुक्रवार, एप्रिल १७, २००९

एक डाव धोबी-पछाड़ (Ek Dav Dhobi Pachhad)



दादा दांडगे एक "दादा", शहरातील बहुतेक काळे धंदे हेच चालवतात. त्यांना आता एक नविन दारू व जुगाराचा अड्डा काढायचा आहे. पण त्यांच्या मनातील जागा शाळेसाठी राखीव आहे व कोणी एक बाई त्यांची डाळ शिजू देत नाहिये. दादा स्वता: या कामात लक्ष घालायचे ठरवतात. शाळेच्या जागेवर पोचल्यावर दादा ना कळते की ती बाई त्यांची पुर्वायुष्यातली प्रेयसी आहे जी अचानक त्यांना सोडून गेली होती.

या घटनेनंतर दादा बदलतात. ते स्वतःला बदलायचे ठरवतात. पहिली पायरी म्हणजे सर्व काळे धंदे ते आपल्या साथीदारांना वाटुन देतात. त्यांच्या बरोबर फक्त दोन जिवाभावाचे सोबती ठेवतात भगवान आणि बाबुराव. आता त्यांना त्यांची भाषा सुधारणे व थोडी प्रतिष्टा कमावणे अशी ध्येय असतात. त्यासाठी ते एक मराठी चे प्राध्यापक ठेवतात व एका शिक्षण संस्थेचे पदाधिकारी होण्याचे ठरवतात.

यापुढे सुरु होते सगळी धमाल. दादांना या कामात कश्या अडचणी येतात. दादाच्या मुलीचे प्रेमप्रकरण, पिशव्यांचे घोटाळे, दादांच्या हीतशत्रुंचा परिस्थितीचा फायदा घेण्याचा प्रयत्न इत्यादि ...

चित्रपटात खुप नावाजलेले कलावंत आहेत परंतू सर्वांना म्हणावा तेवढा वाव मिळालेला नाही. संजय मोने आणि सुकन्या कुलकर्णीने खुपच लहान भूमिका केली आहे आणि ती पण फारशी छाप पाडत नाही.

एकुणात मात्र विनोदी चित्रपट आवडत असल्यास पाहण्यासारखा आहे.


Dada Dandge is a gangster. Accidentally he meets his long lost love, while trying to vacate a piece of land to start a bar. The brief talk with her proves a turning point for his life.

He decides to become a gentleman and win back his love. So he divides all his illegal business among his gang and tries to become a good person. He wants to get his daughter married to decent person. He also wants to get on management board of an educational trust.

The story complicates with his accountant, his Marathi teacher and daughter's love triangle. The whole movie is full of comedy and can be watch as very good stress reliever.

Must watch for Ashok Saraf comedy fans.

Cast:
Director
Eak Dav Dhobi Pachhad on Marathi Tube

शुक्रवार, एप्रिल १०, २००९

चेकमेट (Checkmate)

चेकमेट (Checkmate) मराठी मधला एक Thriller चित्रपट.

हा चित्रपट म्हणजे एक खेळ आहे. आता खेळ म्हंटला म्हणजे हारजीत, डावपेच, इर्षा आलीच. ह्या चित्रपटात खुप कलावन्त आहेत. पण खुप पात्रे असल्यामुळे की काय पण हा चित्रपट खुप (Complicated) किचकट आहे आणि गोष्ट समजायला वेळ लागतो.

कथानक थोड़े पठडीतल्या पद्धितेने सुरु होते. एक Chit Fund अनेकांना फसवते. थोड्या दिवसात पैसे दाम दुप्पट होणार असतात. त्यामुळे खुप लोक पैसे गुन्तवतात. आणि पैसे (प्रेक्षकांच्या अपेक्षेनुसार ) गायब होतात. कथानाकातील मुख्य ३ पात्रे या लोकामधिल एक. मग पैसे परत कसे मिळवायचे यावर एकत्र येउन कट रचतात. त्यात पोलिसांची मदत घेण्याचा प्रयत्न होतो. इतर काही लोकांची पण मदत मिळवण्याचा प्रयत्न होतो. आणि मग उलटसुलट डाव पडतात. Underworld मधे कथानक पुढे सरकणे असे अनेक नेहेमीचे मसाला फोर्मुले आहेत. तिघे सर्वस्व लावून स्वतःचे पैसे परत मिळवण्याचे प्रयत्न करतात.

पण शेवटी कथानक अपेक्षेपेक्षा वेगळ्या कलाटण्या घेते व मनोरंजन होते. सिनेमात काही काही गोष्टींचा सन्दर्भ लवकर लागत नाही. एकदा सिनेमा बघून झाल्यावर पुन्हा एकदा उजळणी करावी लागते. सिनेमातील नायक / खलनायक कोण हे शेवटपर्यंत कळतच नाही. सिनेमातील रहस्य शेवटपर्यंत टिकून राहते.

थ्रिलर आणि Action चित्रपट आवडत असल्यास हा चित्रपट अवश्य पहा.





A good Action and Thriller movie of the recent times in Marathi.

The plot opens with a Chit Fund scheme giving very high returns in short period of time. Several people invest in the scheme, and one day find that the office is closed. Many people have lost their money.

Three people among them get together and decide to find out the gang beihind the scam and get their money back. All three of them had put huge amounts gambling their lives and now in a do or die situation.

The story takes lot of twists and turns, involves Underworld, Police and many more.

If you like Action and Thriller, you will enjoy it.


Cast:

Director, Story

सिनेमा बघून झाल्यावर / बघितला असल्यास आपल्या प्रतिक्रियांची प्रतीक्षा आहे.

गुरुवार, एप्रिल ०२, २००९

कदाचित (Kadachit)


"कदाचित", कथा गायत्रीची. गायत्री एक खुप ख्यातनाम Neurosurgeon असते. तिला एक गोड मुलगी असते. नवरा anesthesia specialist असतो. उत्तम संसार सुरु असतो. आणि अचानक, २० वर्षांनी तिचे वडिल येतात. त्यांना बघून गायत्री चक्रावून जाते. तिचा असा विश्वास असतो की तिच्या वडिलांनी, आईचा खून केला आहे. तिला त्यांना अजिबात त्यांना घरात ठेवून घ्यायचे नसते. पण ते येउन चिकटतात. त्यांच्याशी नाईलाजाने बोलल्यानंतर तिला वेगळीच गोष्ट कळते. मग गायत्रीचा सत्य शोधण्याचा आटोकाट प्रयत्न सुरु होतो. सत्य समजल्यावर तिची कशी मानसिक ओढाताण होते, तिच्यातल्या अपराधीपणाची भावना कशी तिला त्रास देते. हे बघा कदाचित मधे. माणसाच्या अपरम्पार जपलेल्या विश्वासाला जेव्हा तडा जातो तेव्हा कसे होऊ शकते याचे सुरेख दर्शन आपल्याला इथे घडते.

अश्विनी भावे ची गायत्री अप्रतिम. मनोरुग्णाची भूमिका खुपच छान साकारली आहे. सदाशिव अमरापुरकरचे वडिल खुपच सही. आपल्याला खलनायक वाटणारे सदाशिव अमरापुरकर कधी नायक बनुन आपल्या ह्रुदयात स्थान घेतात हे आपल्याला देखिल कळत नहीं. सचिन खेडेकर गायत्रीच्या नवरयाच्या भूमिकेत छान शोभुन दिसतो. सिनेमा बघताना ३ तास कसे निघून जातात ख़रच कळत नाही. सिनेमाचा शेवट नक्की काय असेल हे देखील शेवटपर्यंत समजत नाही.

सिनेमा खुप छान. जरुर बघाच.

Direction
  • Chandrakant Kulkarni चंद्रकांत कुलकर्णी 
Cast
  • Ashwini Bhave अश्विनी भावे
  • Sachin Khedekar सचिन खेडेकर
  • Sadashiv Amarapurkar सदाशिव अमरापूरकर
  • Tushar Dalavi तुषार दळवी

Link



आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा.