Pages

गुरुवार, डिसेंबर ३१, २०१५

बारह आना (Barah Aana )


स्वभावाने भिन्न प्रकृतीच्या तीन मित्रांभोवती ह्या सिनेमाची कथा गुंफली आहे. शुक्ला हा वयाने मोठा, मितभाषी व समंजस असा असतो. याचा भूतकाळ नक्की काय होता हे माहिती नसते, त्याच्या दोन मित्रांना देखिल. शुक्ला एका श्रीमंत माणसाकडे ड्रायव्हरची नोकरी करत असतो. शुक्लाला त्याचे मालक चांगली वागणूक देत असतात, पण मालकिणीचा या शुक्लावर खूप राग असतो आणि ती याला खूपच घालून पाडून बोलत असते.

अमन हा दिसायला एकदम हिरो, पण नोकरी मात्र एका हॉटेल मध्ये वेटरची करत असतो. याला शानशौकी  करण्याचा छंद असतो. त्यासाठी हा ज्याच्या त्याच्या कडून उधारी घेत असतो. तो राहत असतो, त्याच्या जवळपास असणाऱ्या एका किराणा दुकानातून पण हा उधारी घेतो. ते दुकान राणी नावाची एक मुलगी चालवत असते, तिचे ह्या अमनवर प्रेम असते. पण अमनचे मात्र त्याच्या हॉटेल मध्ये येणाऱ्या एका परदेशी मुलीवर मन लट्टू झालेले असते. ह्या परदेशी मुलीचे नाव केट. हि केट देखील अमनशी प्रेमाने वागत असते पण तिचे ह्याच्यावर काही प्रेम वगैरे नसते. पण अमन हिरोला याची काहीच कल्पना नसते.

तिसरा मित्र यादव, हा त्याच्या कुटुंबाला खेड्यावर ठेवून मुंबईत नोकरी साठी आलेला असतो. तो एका वॉचमनची नोकरी करत असतो. आता ह्या बिल्डींग मधल्या कमिटीच्या लोकांची आपापसात भांडण असते आणि त्याचा त्रास ते ह्या वाचमनला देतात. बिचाऱ्या यादव कडे हा जाच सहन करण्याशिवाय दुसरा काहीच पर्याय बाकी नसतो. यादव आणि अमन हे दोघे एकच खोलीत राहत असतात. शुक्लाचे घर दूर असते. आणि शुक्लाचे घर या दोघांच्या मानाने जरा सुस्थितीतले असते. तर अश्या परिस्थितीत असताना, यादवला त्याच्या बायकोचा फोन येतो कि मुलाची तब्येत खूप खराब झालीय आणि त्याला हॉस्पिटलमध्ये भरती करावे लागणार आहे आणि त्यासाठी ५००० रु. हवेत. यादव बिल्डींग मधल्या खूप जणांना पैसे मागतो पण पैसे द्यायला कोणीच तयार होत नाही. अमनकडे पैसेच नसतात. तो तरी कुठून देणार पैसे यादवला. आता मुलाचे काय होणार या चिंतेत यादव रडू लागतो. शुक्लाला त्याचे दुख बघवत नाही आणि तो घरी जाउन त्याच्याकडे त्याने जमवलेले पैसे यादवला नेउन देतो. यादव त्याच्या एका मित्राबरोबर पैसे गावाला पाठवायला म्हणून रेल्वे स्टेशन वर जातो, तेव्हा नेमके त्याचे पाकीट मारले जाते आणि मग यादव अगदीच हतबल होतो.

तो असाच निष्क्रिय होऊन एका हातगाडीच्या शेजारी बसून राहतो. तितक्यात ३-४ जणांचे एक टोळके येते आणि ते यादवशी हुज्जत घालू लागते. यादव लक्ष देत नाही पण तरी त्यातील एक जण त्याला जबरदस्तीने डिवचतो. यादव तिरीमिरीत उठतो आणि त्याला एक ठेवून देतो… इतक्या जोरात मारतो कि तो मनुष्य जमिनदोस्त होतो, त्याला खूप लागते. त्याचे सहकारी घाबरून पळून जातात. यादवला समाजात नाही काय करावे, त्या जखमी माणसाला कुठे सोडावे. यादव त्याला सरळ घरी घेऊन येतो. शुक्ला आणि अमनला सगळी कथा सांगतो. आता तिघेही जण खूप काळजीत पडतात कि काय करावे. त्यात यादवला एक कल्पना सुचते. तो अमन आणि शुक्ल या दोघांना न सांगता त्या जखमी मनुष्याच्या घरी फोन करतो आणि त्यांच्या कडून ३०००० मागतो आणि म्हणतो कि तुमचा नातेवाइक तुम्हाला पैसे मिळाल्यावर परत मिळेल. यादवने ठरवलेल्या प्लॅननुसार त्याला ३०००० रुपये मिळतात. तो ते ३०००० रुपये तिघांमध्ये सामान वाटतो. शुक्लाला खूप राग येतो त्याला असे वाईट धंदे करून मिळवलेले पैसे नको असतात. पण यादवला घरी पैसे पाठवायला हवेच असतात, तसेच अमनला देखील पैसे हवे असतात, कारण केटला पैसे हवे असतात. आता हे असे अपघाताने मिळालेले पैसे तर वापरले जातात.

आता यादवला एक कल्पना सुचते कि तिघांनी मिळून असेच लोकांचे अपहरण करायचे आणि थोडे थोडे पैसे मागायचे, खूप पैसे पण मागायचे नाही जेणे करून ते मिळणे शक्य होणार नाही. अमनला यादवची कल्पना खूप आवडत नाही, पण तरी तो त्यासाठी तयार होतो. आता शुक्लाला तयार करणे हे काम जरा कठीण आहे याची यादवला जाणीव असते. तरीही, यादव आणि अमन, शुक्लाला पटवण्यासाठी त्याच्याकडे जाउन त्याला समजावण्याचा प्रयत्न करतात. आता या प्रयत्नात त्यांना यश येते का ? यादवचा अपहरण करण्याचा प्लॅन यशस्वी होतो का हे बघा "बारह आना" मधे.

सिनेमा ठीक आहे. विनोदी आहे असे म्हणतात, पण फार काही विनोदी वाटला नाही. निदान मध्यंतरा पर्यंत तरी बऱ्यापैकी गंभीर सिनेमा वाटला. सिनेमात फार पात्र नाहीत. शेवट आपण ओळखू शकतो, पण इतका सहजासहजी ओळखण्याइतका नाही. सिनेमा बघायलाच हवा असा नाही, पण बघितल्यास फार पश्चाताप होणार नाही


This is a story of three friends who are totally different in most respects form each other. Shukla, is the eldest of all, a bit loner but matured person. His past is a bit mysterious and unknown to his two friends. He is working as a driver for a rich family. His boss is a gentle man and treats Shulka well, but the wife of his boss never treats him well and always passes derogatory remarks on him. 

Second person is Aman, a very smart and young man. He is woking as a waiter in a restaurant. He is happy go lucky man, with hobbies like watching movies and good clothing. He is in habit of borrowing money form everyone for his needs. He always borrows money form a girl called Rani, who runs a small shop near his house. Rani is in love with Aman, but Aman is falling for a foreigner girl Kate, who frequents his restaurant for breakfast. Kate is also really good with Aman as a friend, but is not in love with him. She is stuck in India, while she visited as a tourist and is trying to make money selling drugs.

Third guy is Yadav, who has his family in the village and is trying earn money to support his family back home. He is working as watchman in a residential building and is stuck in the internal fights between the committee members of that building, and suffering torture. But he has to work and make a living and has no other go. 

One day Yadav receives a call form his wife, telling his is son is very sick and the treatment is going to cost at least 5000. He needs to send the money urgently, so he tries to borrow money form almost each member in the building where he is working, but no one gives him any. He is very sad and dejected, and Aman is also not able to help him, since he does not have any money and in small debt himself. When Shulka sees Yadav broke down, he decides to help him with his savings, and gives him the required Rs. 5000. 
Yadav is happy finally and goes to railway station to pas on the money to one of his friends ho was travelling to his village, to pass it on to his wife, for the treatment. Unfortunately someone picks his pocket and he could not send the money. Yadav is totally dejected with his life and is wondering aimlessly in the situation. He is sitting roadside, lost in his thoughts, under a tree near a snack stall. One car stops near the stall and thinking that Yadav is a stall employee, they call him to serve them. Yadav is lost in his thoughts and does not pay any attention to the people, one of the person gets down and approaches Yadav, abusing him. Yadav in fit of anger hits him just one, which makes the person unconscious. The car gang is scared and flee the seen.  

Now Yadav, clueless what to do with this situation, brings the man to their home. The night passes somehow, but next morning they are very worried, what to do with the person at home. Finally Yadav goes out to figure out something, and calls the family to inform the whereabouts of their person. He demands Rs. 30,000 for returning the man, and the family happily agrees to the sum. He executes the kidnap deal flawlessly and returns the person to the family and gets the money. He divides the money equally with his partners Shukla and Aman. Aman is very happy to get the money, but Shukla is upset and does not want the money. But since he is part of the deal and kidnapping, he has to keep quite. 
Yadav is confident of the deal and decides to make this his profession. His plan is to kidnap people and as for money form the family. The sum should be small, so no one will go to the police, but just pay them the money. Aman wants to make money, so even he is scared, he agrees to the plan. Now they need Shulka involved, so that he can drive the people around. Both Yadav and Aman try to convince him. Are they successful in that, does Shukla join the business, can they successfully do it? Watch is in the Hindi movie "Barah Anna".

The movie is good time pass, not really of Comedy genera, but may be called as comedy thriller. Fairly serious story line till interval, It is a story line with few characters and the end is not that predictable. Our recommendation is to watch the movie for some decent pass time, but not must watch type. Do let us know your comments.


Direction

Cast





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा