Pages

गुरुवार, मे ०३, २०१२

द सिक्थ सेन्स (The Sixth Sense)


 माल्कम क्रोवे हा एक मानसोपचारतज्ञ असतो. याचे मुख्य काम मुलांना मानसिक तणावातून मुक्त करणे हे असते. तो चांगलाच नावाजलेला डॉक्टर असतो. त्याला मेयर कडून एक खूप सन्माननीय बक्षीस मिळालेले असते. त्याची बायको अना, आणि माल्कम बक्षीस मिळाल्याचा आनंद साजरा करत असतात. तितक्यात त्यांना त्याच्या घराच्या खिडकीची काच फुटलेली दिसते. कोण घरात घुसलाय याचा ते शोध घेत असतात, तितक्यात त्यांना माल्कमचा एक जुना पेशंट दिसतो तो माल्कम वर खूप रागावतो आणि त्या रागाच्या भरात तो गोळी झाडतो.

त्यानंतर मग माल्कमच्या दुसरा पेशंट गोष्ट सुरु होते. या वेळेस माल्कम हा एका ९ वर्षाच्या मुलाबरोबर "कोल" बरोबर काम करतो. या मुलाला दिवसा-उजेडी अर्थात २४ तास मृत लोक दिसत असतात. आणि त्याला याची खूप भीती वाटत असते. त्यामुळे तो कोणाबरोबर बोलत नाही. व जरा एकलकोंडा होतो. त्यात त्याच्या आई-वडिलांचा घटस्फोट होतो त्यामुळे तर ह्याला खूपच एकटे वाटत असते. माल्कम ला वाटते की आई -वडिलांचा झालेला घटस्फोट यामुळे हा मुलगा एकलकोंडा झालेला आहे व याचे वागणे बदलले आहेत की काय ? माल्कम या मुलाला भेटायला जातो तेव्हा कोल हा त्याला भेटायला तयार नसतो. माल्कम आणि कोलची आई कोलची शाळेतून येण्याची वाट बघत बसलेले असतात. कोल घरी येतो जेव्हा तो माल्कमला बघतो तेव्हा तो अचानक त्याचे अस्तित्व नाकारून खोलीत जायला निघतो. पण माल्कम कोलशी बोलतो आणि म्हणतो की मी उल मदत करायला आलेलो आहे. मी लोकांच्या मनातील गोष्टी ओळखतो. जर मी तुझ्या मनातील गोष्ट ओळखली तर तू एक पाउल पुढे यायचे नाहीतर तू दोन पावले मागे जायचे. बऱ्याच प्रश्नोत्तरानंतर कोल माल्कमशी बोलायला तयार होतो.

मग कोल माल्कमला सगळ्या गोष्टी सांगू लागतो. आणि कोल च्या वर्तनात थोडा बदल होऊ लागतो. एकदा कोल त्याच्या आईबरोबर एका पार्टीला जातो. तिथे काही द्वाड मुले कोलला एका कापतात बंद करतात. आणि त्यामुळे कोलला फीत येतेआणि त्याला दवाखान्यात दाखल करावे लागते. त्याची आई गेल्यावर माल्कम कोल शी बोलायला जातो, तेव्हा कोल त्याच्या मनात खोल दडवून ठेवलेले गुपित सांगतो. कोलला मृत लोक दिसत असतात आणि ते मृत लोक कोलशी बोलण्याचा प्रयत्न करत असतात. हे ऐकल्यावर माल्कमला जरा विचित्र वाटते आणि मग माल्कम त्याच्या जुना पेशंट, ज्याने माल्कमवर गोळी झाडली असते, त्याची ट्रीटमेंट करताना रेकोर्ड केलेले सगळे संभाषण ऐकतो आणि त्याच्या लक्षात येते कि तो पेशंट आणि माल्कम च्या व्यतिरिक्त अजून काही आवाज त्यात आलेले आहेत.

मग माल्कम त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो आणि मग शिवाय कोल बरोबर जाऊन त्याला नक्की कुठे मृत लोक दिसतात याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो. माल्कमला जरी काहीच दिसत नसले, तरी तो कोलला या सगळ्याकडे खूप पोशितीव दृष्टीने बघायला सांगतो आणि म्हणतो कदाचित हे मृत लोक तुझ्याशी बोलतात कारण त्यांना तू मदत करू शकशील असे वाटते. त्यानुसार कोल २-३ मृत लोकांच्या नातेवाईकांना काही गोष्टी सांगतो आणि मग कोल ची मृत व्यक्ती दिसण्याबद्दलची भीती नाहीशी व्हायला लागते. नंतर माल्कमची पुढील केस काय असते.. माल्कम आणि कोल यांचे संबध कसे संपतात हे बघा "द सिक्थ सेन्स" मध्ये.

सिनेमाचा शेवट एकदमच निराळा आहे. सिनेमा अतिशय छान आहे. सगळ्यांनी बघावा.. अर्थात ज्यांना भूत-प्रेतांची भीती वाटत नाही त्यांनी बघावा. सिनेमात फार काही बिभित्स सीन नाहीत. एक-दोन सीन असले, तरी ते सिनेमाच्या कथेच्या दृष्टीने आवश्यक आहेत. हा सिनेमा जरी इंग्रजी असला तरी भारतीय मूळ असलेल्या एकाने लिहिला आहे. त्यामुळे अजून छान वाटले.

तुम्ही हा सिनेमा बघितला असल्यास किंवा अजून काही प्रतिक्रिया असल्यास जरूर लिहाव्या.

Malcolm Crow is a leading psychologist in the town. He is specialized in child psychology and is helping a lot of children to come out of mental stress and tensions. Because of his reputation and service to society, Mayor recognizes him with a honor plaque. As he returns home and is celebrating his award with his wife, they hear a sound and notice one of the glasses is broken. He starts looking for an intruder in his house and he discovers a old patient of his. His patient looks very upset and disturbed and just shoots at Malcolm.

Another patient of Malcolm is a nine year old boy Cole. He sees ghosts everywhere and even during the day time, specially when no other people are around him. Cole is really scared due to this ghosts around him. He is also becoming a loner and is not having any friends. His parents are recently separated and this has added more mental stress on little Cole. Malcolm's preliminary analysis about the reason of Cole's situation is divorce of his parents. Initially Cole is not ready to interact with Malcolm at all. While Malcolm is waiting with Cole's mother for Cole to return form school, Cole simply ignores him.


Malcolm strikes a conversation with him. He tells Cole that he is there to help him and requests him to play a game with him. He tells Cole that he can tell what is going on in people's minds and if guesses Cole's mind right, Cole with step one step towards him, else he can put a step back. After a lot of perseverance Cole gets interested bit and starts talking to Malcolm.


As days pass, Cole opens up with Malcolm and starts improving slowly. One of those days, Cole attends a party with his mother. Some naughty kids in the party lock him up in a closet. In the darkness of the closet he sees some ghosts again and in the hysteria, he injures himself and needs to be taken to the hospital in unconscious state. That was the time Malcolm visits Cole, and he really opens up his real secret fear. This was the time he believes that Malcolm is really going to help him and describes how he sees dead people and how they talk to him. Malcolm is really confused now, he starts recalling the conversations he had with a old patient of him, the one who fired a gun on him at one point. He goes back and listens to the recordings he has with the old patient and discovers that there were some other voices recorded in that, which he had failed to hear that time.


Malcolm really get involved in the case now and starts digging dipper and dipper in to it. He advises Cole to listen to the dead and try to understand what they are trying to tell. He gives Cole a positive perspective. He suggests Cole that may be they are approaching him for help and if he does that, they will stop bothering him. Slowly Cole gathers courage and started observing the dead he sees and starts interacting him. With help of Malcolm he meets some of the relatives of the dead and talks to them. This helps Cole to come out of the mental stress. How finally Malcolm handles the case needs to be watched in the movie.

The climax of the movie is really different. This is a must watch movie, but be careful if you are scared of horror movies.All the scenes and decent, only are at times shocking and scare the audience. Much much better than most of the horror movies I have seen, The movie is produced in Hollywood but by an person of Indian origin Night Shymalan. Bruce Willis as Malcolm and Haley Osment as Cole are really good. This movie received six Oscar nominations.


Do write your comments about the movie if you have seen it, if not your comments on this review.

Cast

Direction

२ टिप्पण्या: