Pages

मंगळवार, एप्रिल १०, २०१२

द हेल्प (The Help )


१९५०-६० च्या दरम्यान जेव्हा अमेरिकेत काळे-गोरे यांच्यामध्ये भांडण सुरु होते त्याकाळातील हा सिनेमा आहे. त्यावेळी अमेरिकेतील काळ्या लोकांची परिस्थिती खूप वाईट होती हे सगळ्यांना माहितच आहे. सुरवातीला गुलाम असलेले काळे लोक, नंतर गोऱ्या लोकांकडे नोकर म्हणून काम करू लागले. पण बऱ्याच गोऱ्या लोकांना तरीही, काळ्या लोकांच्या बद्दलचा द्वेष कायम होता. असे म्हणतात, की अजूनही काही ठिकाणी तो कायम आहे. तर जेव्हा काळ्या लोकांना बरोबरीचे हक्क नव्हते तेव्हाचा हा सिनेमा आहे. बहुतेक काळ्या बायका गोऱ्या बायकांच्या घरी मेड (नोकर) म्हणून काम करीत असे. मुलांना सांभाळणे, घरातील केर-वारे, भांडी घासणे, सैपाक करणे अशी कामे त्या करीत असत.

या सिनेमातील गोष्ट आहे ॲबलीन क्लार्कची, तिने केलेल्या धाडसाची. तिला आलेले बरे-वाईट अनुभव सगळ्या लोकांसमोर मांडून काळ्यांची बाजू पण लोकांसमोर आणण्याची. अर्थात या साठी तिला एका गोऱ्या मुलीची मदत मिळते. अबिलीन क्लार्क ही १४ वर्षाची असल्यापासून मुलांना सांभाळण्याचे काम करत असते. तिचा एकुलता एक मुलगा काळ्या-गोऱ्यांच्या भांडणात मारला जातो. आता ती एकटी या जगात स्वत:च्या भावना दाबून जगत असते. हिला काळ्यालोकांवर होणाऱ्या अन्यायाबद्दल चीड असते पण त्यांच्या विरुद्ध आवाज उठवणे इतके सोपे नसल्याने हे गप्प असते. हिची मैत्रीण मिनी ही तशी फटकळ असते त्यामुळे ती तिला वाटणाऱ्या सगळ्या गोष्टींबद्दल तिच्या मालकांकडे तक्रार करते व त्यामुळे हिला सारखी नोकरी बदलावी लागत असते.

स्कीटर ही एका अतिश्रीमंत गोऱ्या बापाची मुलगी असते. हिच्या सगळ्या मैत्रिणींची लग्ने झालेली असतात शिवाय त्यांना मुले देखील असतात. स्कीटरला अजून कोणीच पसंत पडत नाही. हिला काहीतरी वेगळे करायचे असते. ही स्वत:चे करियर करण्याच्या मागे असते. तिला एका न्यूजपेपर मध्ये नोकरी मिळते. तिथे तिच्या लक्षात येते की काळ्या लोकांवर बराच अन्याय होतो आहे आणि ज्या काळ्या बायका नोकर म्हणून गोऱ्यांच्या घरी नोकऱ्या करत आहेत त्यांना सध्या बेसिक गोष्टींची देखील सुविधा मिळत नाही. ते बघून ती ठरवते की मिळतील तितक्या काळ्या स्त्रियांची मुलाखत घ्यायची. त्यासाठी ती ॲबलीनला भेटायचे ठरवते. सुरवातीला ॲबलीन बोलायला तयार होत नाही. पण मग खूप विचारान्ती तयार होते व तिला आलेले सगळे अनुभव कथन करते

स्कीटरची एक मैत्रीण हिली ही एक काळ्यांच्या विरुद्द लोकांच्या मनात विष कालवण्यासाठी प्रसिद्ध असते. आणि स्कीटरला हे अजिबात आवडत नाही. हिलीच्या नवऱ्याचा एक मित्र स्कीटरचा नवरा म्हणून योग्य आहे असे हिलीला वाटते आणि त्यादृष्टीने ती प्रयत्न करू लागते आणि त्यात तिला असे समजते कि स्कीटरचे काळ्या नोकर स्त्रियांबरोबर काही गुप्त काम सुरु आहे.

मग ते नक्की काय असते. काळ्या स्त्रिया नक्की काय गोष्टी सांगतात मिनी आणि ॲबलीनचे आयुष्य कसे असते याचे दर्शन या सिनेमात होते. सिनेमा एकदम छान आहे. सगळ्यांनी बघावा असा आहे. हा सिनेमा एका पुस्तकावर आधारित आहे. त्या पुस्तकाबद्दलची लिंक येथे दिली आहे. या सिनेमाला बरेच पुरस्कार देखील मिळालेले आहेत.

तुम्ही हा सिनेमा बघितला असल्यास किंवा तुम्ह्च्या अजून काही प्रतिक्रिया असतील तर अवश्य लिहा.


This movie plot is from 1950s when in United States, Black people were not treated equal and were restricted to certain jobs and professions. We are all aware of the the times, and how they were treated. Though they were not slaves, most of the black people were working as domestic servants. They always had a tension among the communities, which continues till date in certain places. Most of the black ladies used to work as maid servants and use to take care of all the household chores, taking care of the kids etc.

This is story of Aibileen Clark, a brave lady, who has expressed her thoughts and experiences to inform people the conditions of the time. This was made possible because she met a white girl, who was interested in know and bring things to light. Aibileen has been taking care of white kids for the families. She had one son, who was killed in a road fight involving black and white people. After that she has been surviving alone with the pain in her heart. She is really upset with the way black people were treated, but is aware that in the circumstances it is not easy even to express it openly. One of her close friend is Minny. She is free and frank person and can not always be politically correct, She talks out the things she is unhappy about to the employers, and due this habit, she has to change her job frequently.

Skeeter is a girl with rich parents. She is a free thinking journalist. Most of her classmates are now married and have children, but she is not even dating yet. She is ambitious and career oriented, and wants to work for a big publishing house. To start with she manages to get a job with the local newspaper. She is disturbed by the fact that black ladies working as domestic servents are suffering and at times treated very badly. The problem of lack of basic amenities for this ladies is her concern ans she decides to write something about it. While looking for ladies to interview and understand how their life is, she meets Aibileen and after lot of convincing, Aibileen is ready to share her story.

A good friend of Skeeter is Hilli. She is not only treating black ladies with discrimination, but also spreading misinformation about them among all her white friends. Skeeter is very disturbed at her friends attitude. Hilli helps her husband's friend meet skitter and they start dating. But through him, Hilli learn that Skeeter is doing to secret work with black ladies.

What exactly is Skitter doing ? How Aibileen and Minny are involved in that process ? The movies shows this very well and insights in the lives of Aibileen and Minny. This movie is based on a best seller book The Help. Both the book and the movie have received several awards and a must watch movie for all ages.


Cast

Direction

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा