Pages

मंगळवार, जानेवारी २४, २०१२

द नेमसेक (The Namesake)



अशोक गांगुलीला कलकत्त्याला लहानाचा मोठा झालेला आणि आता अमेरिकेत एका युनिवर्सिटी मध्ये पीएचडी करत असतो. तो लग्न करायला म्हणून भारतात येतो. जुन्या रीतिरिवाजाप्रमाणे मुलगी बघून लग्न ठरवले जाते. मुलगी असते असीमा. असीमाला खरतर शास्त्रीय संगीताची खूप आवड असते. ती शिकत देखील असते. पण आई-वडील लग्न ठरवतात आणि त्या दोघांना पण काही प्रोब्लेम नसतो. त्यामुळे ती दोघे लग्न करून अमेरिकेत येतात. अशोक गांगुली खूपच चांगला असतो. आशिमाची चांगली काळजी घेतो. त्यांना लवकरच एक मुलगा होतो. मुलाचे नाव काय ठेवायचे असा प्रश्न असतो, पण भारतात सांगितल्यावर ते पत्रिका बघणार, मग जन्माक्षर येणार आणि मग नाव ठरणार याला खूप दिवस लागत असल्याने, व अमेरिकेत नाव ठेवल्याशिवाय घरी जाता येणे शक्य नसल्याने मुलाचे नाव गोगोल ठेवण्यात येते. गोगोलचे नाव निखील असेही ठेवण्यात येते, पण गोगोल हेच नाव प्रचलित होते. थोडे दिवसाने दुसरी मुलगी होते, तिचे नाव सोनिया ठेवण्यात येते.

शाळेत नाव घालायला जेव्हा आई-वडील जातात, तेव्हा गोगोलचे नाव निखील असे सांगण्यात येते, पण गोगोल म्हणतो की त्याला निखील आवडत नाही व शाळेत गोगोल हेच नाव ठेवायचे. सुरवातीला त्याला त्याच्या नावा बद्दल काहीच प्रोब्लेम नसतो. जेव्हा तो ६-७ जातो तेव्हा शाळेतील मुले त्याला त्याच्या नावावरून चिडवतात. ते बघून त्याला खूप वाईट वाटते व तो आई-वडिलांना म्हणतो की तुम्हाला दुसरे कुठले नाव सुचले नाही का? इतके वाईट नाव का ठेवले? पण आई-वडील काही सांगत नाही. थोडक्यात गोगोलला त्याच्या नावाचा तिटकारा असतो. तो जेव्हा हायस्कूल मध्ये जातो तेव्हा त्याला कळते की निकोलाई गोगोल नावाचा एक कोणीतरी रशियन लेखक होता. त्याच्या वडिलांना तो लेखक खूप आवडत असल्याने त्याचे नाव गोगोल ठेवण्यात आले आहे. गोगोल हा लेखक जरी खूप हुशार असतो, तरी तो थोडा विचित्र असतो. आणि सगळी मुले गोगोल उर्फ निखीलला, लेखकाच्या या विचित्र कॅरेक्टर मुळे चिडवत असतात. आता शाळा संपवून दुसऱ्या गावात युनिवर्सिटी मध्ये जाणार असतो. तो तिथे त्याचे नाव निक असे सांगतो, तिथे आता नवीन आयुष्य सुरु होते. त्याला तिथे एक मॅक्सीन नावाची एक गर्लफ्रेंड मिळते. तिचे आई-वडील खूप श्रीमंत असतात. निक आता घरी आई-वडिलांना टाळू लागतो. आईचा कधीही फोन आला तरी हा घरीच नसतो. तो घरी कधीही आपणहून फोन करत नाही. आशिमाला याचे खूप दुख होते. पण ती ते फार दाखवत नाही.

आता अशोक ओहायो युनिवर्सिटी मध्ये ६ महिने शिकवायला जाणार असतो. सोनिया पण आता कॉलेज मध्ये असते, त्यामुळे आशिमा एकटीच घरी राहत असते. आशिमाला वाटते की गोगोलने अशोक जाण्यापूर्वी एकदातरी त्यांना भेटायला यावे. हो- नाही करता करता तो येतो आणि त्याचा गर्लफ्रेंडला घेऊन येतो. आशिमाला सगळेच आवडत नाही पण तरी ते सगळे निमुटपणे सहन करते. गोगोल एक दिवस राहून जातो, अशोकला विमानतळावर पोचवायला आशिमा जाते, आणि तीच काय अशोकची शेवटची भेट ठरते. पोटात दुखतंय असा अशोकचा फोन येतो, तो सांगतो की काळजीचे काही कारण मी हॉस्पिटलमधूनच बोलत आहे. डॉक्टर माझ्यावर आता उपचार करतीलच. पण हा फोन शेवटचा ठरतो. अशोकचे तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने निधन होते. वडील गेल्यावर मात्र गोगोलला खूप दुख होते आणि तो त्यांना काहीच सुख देऊ शकला नाही याबद्दल तीव्र पश्चाताप करतो. त्याचा गर्लफ्रेंडला सोडून देतो.

थोड्या दिवसाने त्याला मौसमी नावाची एक बंगाली मुलगी भेटते. तिच्याबरोबर तो लग्न करतो. सोनियाने पण एका अमेरिकन मुलाबरोबर लग्न करायचे ठरवले असते. अशीमाला काही प्रोब्लेम नसतो. ती म्हणते की जर मुलं खुश आहेत तर मला काही प्रोब्लेम नाही. पुढे गोगोल-मौसामिचे आयुष्य कसे जाते, गोगोलला त्याच्या नावाचे रहस्य कळते का हे बघा "नेमसेक" मध्ये.

सिनेमा ठीक आहे. एक अमेरिकेत आलेल्या भारतीय कुटुंबियांचे जगणे दाखवले आहेत. भारतीय मूल्य सोडता येत नाही, आणि अमेरिकी मूल्य नीट धरता येत नाहीत असे थोडेसे या सिनेमातून दाखवण्याचा दुबळा प्रयत्न केला आहे. सिनेमा एकूण गोष्ट म्हणून चांगला आहे. पण नक्की कश्यासाठी हा सिनेमा काढला हे नीटसे कळले नाही. मीरा नायरने दिग्दर्शित केलेला सिनेमा असल्याने सिनेमा खूप चांगला असेल असे वाटले, पण प्रत्यक्षात सिनेमा ठीक या वर्गात मोडेल.


Ashok Ganguli is born and brought up in Kolkata. Now he is doing his PhD in an American university. He visits India and his parents suggest him to get married. Acording to Indian customs he visits a girl's house meets Asima and marries her. Asima has deep interest in Indian classical music and she is pursuing it as serious hobby. Since her parents decide her marriage she happily marries Ashok. They move back to US. Asok is very caring husband and he takes care of her very well. Very soon they have their first boy child. The hospital staff asks for a name immediately. They are not really ready for this. They were planning to make the horoscope of the boy and get the first letter of the name form it and then decide on the name. But in the hospital they will not get discharge till they decide the name, so Ashok just suggests a name Gogol. Soon they get a girl and this time they are ready with name, so she is named Sonia. Later on they name Gogol as Nikhil but that is not changed in the papers, so Gogol remains his name.

At the time of school enrollment Asima tells his name as Nikhil but young Gogol insists that it should be Gogol itself. So again in the school the same name sticks him. Initially he is happy with the name but as he grows old and enters middle school he starts feeling uncomfortable for two reasons, first it is bit unusual and another is other kids tease him on that. He asks his parents why they named him like that, but his parents do not have a real reason to him. By the time he enters high school, he starts hating his own name. His parents tell him that they tried to keep his name Nikhil at the time of school enrollment but how he insisted on Gogol that time. He learns in the high school about a renowned Russian author Nicolai Gogol and since his father liked the author that name came to his mind at the time in the hospital. Gogol was renowned author but he is also know for his whimsical character. So his classmates continue to tease him.

He finishes high school and goes a University in different city. He takes this opportunity and changes his name to Nikhil aka Nick. His life changes and he gets reed of his past and the name stuck to him for years. He gets a girlfriend called Maxim and starts to enjoy life. Slowly he starts to avoid his family. He spends more time with Maxim's parents. He is never at home with Asima calls and never calls her up. Asima is disturbed and unhappy but never shows that.

Around this time Ashok gets an opportunity to teach in Ohio university for a semester as sabbatical. Since Asima has her job as librarian she decides to stay back and only Ashok is supposed to go there. Sonali is already married to a American guy and not with her. Asima wishes that Gogol should come and spend some time with her and Ashok before he leaves for Ohio. Finally Gogol visits them along with his girl friend. She is not really happy with this kind of relationships, but she accepts it all without resentment. Gogol spend some time with them and leaves even before Ashok is supposed to leave. Asima alone has to see Ashok off at the airport. That happens to be their last time spent together. In a few days Ashok calls her form Ohio and tells her that he has some pain in the stomach and is in the hospital. He dies with heart attack within few hours. The phone conservation between Ashok and Asima was the last one they had. At this point Gogol is shocked
and really sad. He feels he could not make his dad happy at all. He leaves his girlfriend and spends some time with his mother.

He reconnects his childhood friend Mausami. She has changed a lot over years. Gogol marries Mausami and since Sonali is already married and leading a good life and Gogol is into a decent job, Asima decides to come back to India. What happens next in the lives of Gogol and Asima needs to be watched in the movie Namesake. It also opens up the secret behind the name Gogol.

The movie is good. A non resident Indian family's life in US. The emotional stress. Their attempt to balance between the Indian morals & values and the American lifestyle and culture. The storyline and the plot seems good, but does not take complete grip over audience. Not as good as most of the Meera Nair movies. Not a must watch but can watch category. This movie is based on the novel by Jhumpa Lahiri

Cast


Direction

1 टिप्पणी: