Pages

मंगळवार, मार्च ०८, २०११

सायलेंट वॉटर (Silent Waters)



ही गोष्ट १९७९ सालची पाकिस्तानातील चरखी नावाच्या ठिकाणाची. जेव्हा १९४७ साली फाळणी झाली तेव्हा येथील शीख लोक सगळे भारतात पळून आले. तेथील मुसलमानांनी हिंदू स्त्रियांवर अत्याचार केले. बऱ्याच स्त्रियांनी अब्रू वाचवण्यासाठी आत्म्याहत्या केली. काही मुलींना आणि स्त्रियांना त्यांच्या कुटुंबीयांनी आत्महत्या करायला भाग पडले त्या पार्श्वभूमीवर बेतलेला हा सिनेमा आहे.

तर सलीम आणि त्याची आई आयेशा हे दोघे या छोट्याश्या गावात राहत असतात. या गावातील सगळे लोक मुसलमान असतात. पण ते कट्टर मुस्लीम नसतात. त्यांच्या मते धर्माचे पालन करायला पाहिजे, पण त्याधीही माणुसकीचे पालन जास्त महत्वाचे. अश्या विचारसारणीचे हे गाव असते. आयेशाचा नवरा अफसान हा आता हयात नसतो. अफसानच्या मिळणाऱ्या पेन्शन वर आयेशा घर चालवत असते. सलीम आता वयात आलेला मुलगा असतो. त्याचे शिक्षण झालेले असते आणि तो पुढे काय करायचे हे अजून ठरवत असतो. तिथेच राहणारे भट्टी सहबांनी त्याला गुरुद्वाराच्या जवळच्या दुकानात नोकरी दिलेली असते पण ती त्याला करायची नसते. सलीमचे तेथील शाळेत जाणाऱ्या झुबेदा या मुलीवर प्रेम असते. झुबेदा आयेशाला आवडत असते. त्यामुळे तसा या दोघांच्या लग्नात काहीच प्रोब्लेम नसतो.

पण गावात असे काही प्रसंग घडतात, ज्यामुळे सलीम आणि आयेशाच्या जीवनात उलथापालथ होते. त्याच दरम्यान पाकिस्तानातील राजकीय परिस्थितीत भुट्टोला जनरल झिया उल हकने फाशीवर दिलेले असते आणि पाकिस्तानवर आता मुसलमानी पगडा घट्ट रोवला जातो. झिया उल हकच्या विचारांचे पगडे असलेले २ तरुण (रशीद आणि त्याचा मित्र) त्यांच्या गावात येतात. ते गावातील सगळ्या लोकांच्या मनावर आपण मुसलमान आहोत आणि भारतीयांबरोबर चांगला व्यवहार करायला नको अशी शिकवण पसरवतात. सुरवातीला काही लोक त्यांच्या या विचारधारेला नाकारतात. पण शेवटी सगळ्या मुसलमानांवर अगदी लहानपणापासून होत असलेल्या संस्काराप्रमाणे धर्म सगळ्यात मोठा असतो. काही लोक म्हणजे त्या गावात असलेला नाव्ही मेहबूब हा या दोघांचा बराच विरोध करतो. तसेच अमीन नावाचा शिपाई देखील या सगळ्या प्रकाराने दुखी होतो. रशीद आणि त्याचा मित्र,  सलीम आणि त्याचा मित्र-मंडळींना त्यांच्या ग्रुप मध्ये सामील करून घेतात.

आयेशा कधीच विहिरीवर पाणी आणायला जात नाही. त्यामुळे सगळीकडे चर्चिले जाणारे विषय तिला फार लवकर समजत नाहीत. म्हणून आयेशाला या सगळ्या प्रकारची माहिती नसते. तिच्या घरी पाणी आणून द्यायला अल्लाबी आणि तिची मुलगी शन्नो येत असतात. आयेशा सगळ्या लहान मुलींना कुराण समजावून सांगत असते. पण तिचे कुराण समजावणे म्हणजे अल्ला हा एकटाच देव नसून, हा एक प्रकारचा देव आहे, दुसर्या देवाची प्रार्थना केली तरी तुम्हाला मुक्ती मिळू शकेल अश्या प्रकारची शिकवण देते. हे बोलणे रशीद आणि त्याचा मित्र ऐकतो. आयेशाची हि असली शिकवण ऐकून रशीद व मंडळी तिच्या घरी येणाऱ्या सगळ्या मुलींवर बंदी घालतात. त्याच दरम्यान भारत आणि पाकिस्तानात करार होतो त्यानुसार त्यांच्या गावात असलेल्या गुरुद्वारात दर्शन घेण्यासाठी भारतातून काही शीख मंडळी येतात. या लोकांच्या भेटीने गावातील एकूण गोष्टींना वेगळेच स्वरूप मिळते. ते नक्की काय असते, आयेशाचा भूतकाळ नक्की काय असतो, झुबेदा आणि सालिमचे पुढे काय होते हे बघा "सायलेंट वाटर" मध्ये.

हे सिनेमा कुठल्या भाषेत आहे हे समजले नाही. उर्दू किंवा पंजाबी भाषेत असावा असे वाटले. सिनेमा तसा छोटा आहे. त्यातील पाकिस्तानातील परिस्थिती, तेथील गाव, एकूण जीवन खूप चांगले उभारले आहे. सिनेमा चांगला आहे. एकूण राजकारणी लोकांमुळे  देशातील लोकांच्या मनात एक कटुता आली आहे असे दाखवण्याचा चांगला प्रयत्न आहे.

माझ्या लिखाणावर किंवा तुम्ही हा सिनेमा बघितला असल्यास इथे अभिप्राय जरूर द्या.

This is story from 1979, from a town called Charakhi in Pakistan. At the time of Partition between India and Pakistan, most Sikhs migrated to India from the town. There were lot of unpleasant incidences and several ladies committed suicide to save themselves from being raped. In several families, family members helped or forced women to commit suicides. This story is base these circumstances.

Salim and his mother Ayesha are residents of this small town. Almost all the population of the town is Muslim, but they are not hardliners and they believe in religion as well as humanity. Afsan, is Ayesha's late husband, and Ayesha is running the family on his pension. Salim is a young man, who is just finished his education and is trying to settle himself in life. Salim is offered a good job in a shop near the local Gurudwara but Salim does not want to work there. Salim is in love with Zubeda who is just finishing her school education. Zubeda is a nice girl and Ayesha is also happy with her.

Salim and Ayesha's life is in turmoil now, with some of the incidences in the town. During this time, General Zia Ul Haq has come to power and he has hanged the prime minister Zulfikar Ali Bhutto, and hardliner Muslim thoughts are becoming more mainstream in Pakistan. A young man, Rashid and his friends who are followers of Zia Ul Haq come to their town. They start convincing people that they are hardliners and need to keep the Indians away. Initially people who have been together with people form all streams did not pay attention, but slowly people start thinking on their lines. Some people like Mehboob a barber and Amin a soldier oppose them, and are sad due to these new developments, which they feel are unhealthy for the society.

Ayesha is not aware of all these happenings in the town. She always have Allabi and Shanno to help her with fetching water, so she hardly gets chance to mingle with other ladies to get these gossips and stories. She teaches Kuran to several girls of the neighborhood. Her school of thought is more liberal than the hardliners and she preaches that there are several ways towards finale solace and Allah is on of them. Once Rashid and his friends get to hear her preaching and they immediately decide to involve Salim in their group. Very soon they stop Ayesh's preaching with help of Salim. During this time there was treaty signed between India and Pakistan, which allows Indian Sikhs to visit their town Gurudwara to offer prayers. This again changes the whole atmosphere of the town. This brings Ayesha's unknown history in front of people. To know what it was, what happens to Salim and Zubeda's relationship, and the future of the town watch "Silent Water" or Khamosh Pani.

The movie is in a mixture of Punjabi and Urdu. It is small movie, beautifully showing the small village and its life in Pakistan's Punjab. The movie is good and powerfully shown how at times politics spoils otherwise good and peaceful human relations between neighbors.

Do comment on the movie if you have seen it and the review.


Cast
  • Kirron Kher
  • Aamir Malik
  • Arshad Mahmud
  • Salman Shahid
  • Shilpa Shukla
  • Sarfaraz Ansari
  • Shazim Ashraf
  • Navtej Johar
  • Fariha Jabeen
  • Adnan Shah
  • Rehan Sheikh

Direction, Story
  • Sabiha Kumar


Movie DVD

२ टिप्पण्या:

  1. hi,
    mi pahilay ha cinema..
    khup bharee ahe..
    post barobar ya movie chi torrent link dilit tar bara hoil..

    -Avani

    उत्तर द्याहटवा
  2. या सिनेमाचं परिक्षण खामोश पानी या नावाने लोकसत्तामधे आलं होतं, तेव्हा वाचलं होतं पण नंतर नाव विस्मरणात गेलं. तुमच्यामुळे कळलं. आता नाव लिहून ठेवते आणि चित्रपट पहाते. धन्यवाद.

    उत्तर द्याहटवा