Pages

मंगळवार, मार्च १५, २०११

आयडियाची कल्पना (Ideachi Kalpana)

 
जयराम गंगावणे हा एक कलाकार असतो. तो एका रिअलिटी शो मध्ये भाग घेतो. याची बहिण जयवंती एक जोतिषी असते. हिचा नवरा मनोहर बारशिंगे हा एक वकील असतो. हा वकील कधीच कुठलीच केस कोर्टात लढत नाही. तो सगळ्या केसेस आउट ऑफ कोर्ट सेटल करत असतो. जयवंती स्पर्धेला जायचे म्हणून तयार होऊन मनोहरची वाट बघत बसते. पण मनोहर नेहरूनगर झोपडपट्टीतील लोकांच्या मागण्या घेऊन पोलीस कमिशनर च्या ऑफिस मध्ये मोर्चा घेऊन गेलेला असतो. तिथे त्याची आणि कमिशनर महेश ठाकूर याची थोडी बाचाबाची होते. इकडे जयरामच्या शोची वेळ होते त्यामुळे तो आपल्या बहिणीला फोन करतो पण बहिण मनोहरची वाट बघत तयार होऊन बसते. त्याच शो मध्ये महेश ठाकूरची बहिण प्रीती ठाकूर पण भाग घेणार असते. तिचा पण कमिशनरला फोन येतो. पण कामाच्या व्यापात कमिशनर कार्यक्रमाला जाऊ शकत नाही. मनोहर आणि त्याची बायको जयवंती दोघे स्पर्धेला जातात पण तोवर स्पर्धा संपलेली असते. जयराम बाहेर येतो तर त्याला त्याची ताई दिसते. तो तिला हाक मारून तिकडे जातो, तर त्याला एका गाडीचा धक्का लागतो. ती गाडी नेमकी पोलीस कमिशनरांची असते.

प्रीती घरी येऊन तिच्या भावाला सांगते कि ती स्पर्धेत पहिली जरी आली असली तरी आता मात्र तिने एक खूप मोठा घोळ केला आहे. ती त्याची गाडी घेऊन स्पर्धेहून घरी परत येताना तिच्या गाडीचा एका माणसाला धक्का लागला आणि तो खाली पडला. ते ऐकल्यावर महेश ठाकूर ठरवतो कि हि केस रजीस्टर होऊ द्यायची नाही.

तर इकडे मनोहर ठरवतो कि हि केस करायची आणि त्या माणसाकडून खूप पैसे उकळायचे. त्याप्रमाणे तो केस पेपर्स तयार करत असताना, तो त्याच्या बायकोचे पुटपुटणे ऐकतो. त्यानुसार जयराम एकदा झाडावरून खाली पडला त्यानंतर त्याच्या पाठीच्या कण्याला दुखापत झाली आहे. त्याचा तिसरा मणका जरा दबलेला आहे. त्याला कॉम्प्रेसड व्हर्टीब्रा झालेला आहे. हे ऐकल्यावर मनोहर खूप खुश होतो. तो म्हणतो की आता तर ५० लाखाचा दावा लावता येईल.

मनोहर, जयरामला येऊन बघतो तर जयराम एकदम टुणटुणीत असतो. मनोहर त्याला पटवतो की तू आता कमरेखालील सगळ्या अंगाला स्पर्शज्ञान नाही असे सगळ्या डॉक्टरला सांग. तुझ्या लहानपणी तुला झालेल्या अपघातात मणक्याला लागलेल्या धक्क्याचा आपण आताच्या अपघातात उपयोग करून घेऊ. जयरामला हे खूप पटत नाही. पण पैश्याच्या लोभात तो मनोहरला साथ देण्याचे काबुल करतो. प्रीतीला जेव्हा कळते कि तिच्या गाडीने लागलेला धक्का हा जयरामला लागला आहे तेव्हा त्याला दवाखान्यात भेटायला येते. प्रीती तिच्या सगळ्या मैत्रिणींना घेऊन येते आणि ओळख करून देते कि हा अगदी सचिन सारखा दिसतो व तशीच त्याला अक्टिंग करण्याची इच्छा आहे. एकूण काय तर जयराम प्रीतीच्या प्रेमात पडतो आणि प्रीती हि कमिशनरची बहिण आहे असे कळल्यावर तो मनोहरच्या  प्लॅनमधून पडण्याचा प्रयत्न करतो. पण तो जितका जितका प्रयत्न करतो तितका तो अजून फसत जातो. मनोहर मग अजूनच जाळे विणत जातो. शेवटी जयराम आणि प्रीती हे प्रेमी युगुल त्यातून काय मार्ग शोधून काढतात, कमिशनर मनोहरच्या जाळ्यातून सुटतो का, पैश्याच्या मागे लागलेला मनोहर शेवटी काय करतो हे बघा "आयडियाची कल्पना" या सिनेमात.

सचिन आणि अशोक सराफ सिनेमात आहेत असे म्हटल्यावर, हा विनोदी सिनेमा आहे हे सांगण्याची गरज नाही. या सिनेमात देखील सचिनचे डबलच काय ट्रिपल रोल आहेत. सचिन आणि अशोक सराफचे विनोदाचे टायमिंग अफलातून असतेच तसे आहेच. पण त्यांचे विनोद आता कंटाळवाणे झाले आहेत असे जाणवले. सचिन त्याच्या कल्पनाशक्तीत कमी पडला असे वाटले. त्याचा सिनेमात काहीच वेगळेपणा जाणवला नाही. ही आयडियाची कल्पना त्याला निश्चितच नीट जमली नाही असे मात्र वाटले. एकूण सिनेमात काहीच नवीन नाही आहे. सिनेमातील गाणी देखील खूप प्रभाव पाडू शकली आहेत असे वाटले नाही. सिनेमातील पहिली लावणी त्यामानाने चांगली आहे, कारण त्यात भार्गवीचा नाच खरच छान आहे. शेवटच्या गाण्यात मधूनच सुप्रिया पिळगावकर कशी आणि का येते हे मात्र आम्हा सगळ्यांना पडलेले कोडे आहे.
एकूण हा सिनेमा तुम्हाला सचिन आणि अशोक सराफ खूपच आवडत असेल तर बघा नाहीतर वेळ वाया गेला असे निश्चित वाटेल.

माझ्या लिखाणावर किंवा तुम्ही हा सिनेमा बघितला असल्यास इथे अभिप्राय जरूर द्या.


Jayram Gangavane is and stage artist and is participating in a talent show. His sister Jaywanti is a astrologer and her husband is lawyer names Manohar Barshinge. Maniohar is famous for settling all the cases out of court rather than by hearings in the court.
 Manohar is leading a group of Neherunagar Slum Residents to Police station and he meets the commissioner Mahesh Thakur there. They get into a heated argument. Right in the middle of arguments, both Manohar and Mahesh receive phone calls one after another on their mobiles.  Initially Priti, Mahesh's sister calls him to visit her performance and then Jayram calls Manohar for the same reason. Mahesh could not make it for the program. Manohar reaches with Jayvanti to the function venue, but by that time the show is over. Jayram, while coming out notices that his sister is coming and he rushes to meet her, but he is dashed by an backing car and he fells down. Priti who is driving her brothers car that time gets scared and runs away with he car.

Scared Priti narrates the story to her brother who is Mahesh the Police commissioner. She is very excited because she won in the competition but in the process she has committed this blunder. Since she has fled from the scene, this is treated as hit and run case. Mahesh decided that he will not let the case register in the Police station.

Manohar plans to take up this hit and run case and get a good compensation for the driver of the vehicle. While preparing his case he learns from Jayavanti that Jayram fell down from terrace and has one of his vertebra compressed. Manohar is very happy learning this and takes the amount of the court case to 5 million rupees.

Manohar comes to see Jayram, and finds him fit, but then he convinces him that he should pretend that he does not have any sensation bellow his hip so that they can make a good case and earn a lot of money from the person who was responsible for careless driving. Jayram is not really convinced with it, but agrees to act so that he can make lot of money. When Priti learns that it was Jayram who was victim of her careless driving, she comes to see him in the hospital. They become good friends in a short while and she brings in her friends to meet him, and all agree that he looks like the famous actor Sachin. In short, Jayram and Priti are fallen for each other and Priti is none other than Police Commissioner Mahesh's sister. At this point Jayram decided to abandon the plan, but the situations are such that as much he tries to come out of it, more he is tangled in the same. Manohar continues to tighten his net around Mahesh to earn the desired money. Watch the movie "Ideayechi Kalpana" to see if the lovers succeed in untangling the complications, is Police commissioner relived from the case, what level does Manohar reach to earn his money at stake.

Being a movie of Sachin and Ashok Saraf, it is a real comedy. Sachin plays a triple role in this movie and he has a amazing timing for cracking jokes with Ashok Saraf. It is a typical Sachin - Ashok Saraf movie, at times it gets a typical brand of movies. So nothing new or spectacular in this one. The song sequences are not too good or catchy, except the dance performed by Bhagyashri Chrimule is good.

Do write your comments about the movie if you have seen it and your comments on our review.


Cast
  • Sachin Pilgaokar सचिन पिळगावकर
  • Ashok Saraf अशोक सराफ
  • Mahesh Kothare महेश कोठारे
  • Bhargavi Chirmule भार्गवी चिरमुले
  • Nirmiti Sawant निर्मिती सावंत
  • Bhagyashri Rane भाग्यश्री राणे
  • Kshitij Zarapkar क्षितीज झारापकर
  • Rajesh Chitnis राजेश चिटणीस
  • Deepak Joshi दीपक जोशी
  • Madhav Moghe माधव मोघे
  • Vinod Kulkarni विनोद कुलकर्णी
  • Nayan Jadhav नयन जाधव
  • Ganesh Thete गणेश थेटे
  • Lal Deshmukh लाल देशमुख
  • Kedar Shirsekar केदार शिर्सेकर
  • Ashok Chafe अशोक चाफे
  • Anita Chandrakant अनिता चंद्रकांत
  • Chetana चेतना
  • Kartiki Seema कार्तिकी सीमा
  • Chatur चतुर
  • Ajay Tillu अजय टिल्लू

पाहुणे कलाकार

Director


Link to watch online

२ टिप्पण्या: