Pages

मंगळवार, मार्च २३, २०१०

पक पक पकाक (pak pak pakak)

"चिखलू", हा आई वडिलांचे छत्र हरवलेला एक हुशार, बिनधास्त आणि व्रात्य मुलगा असतो. तो दिवसभर गावात सगळ्या लोकांच्या खोड्या काढत फिरत असतो. त्याच्याबरोबर गावातील सगळी मुलं पण दंग मस्ती करतो असतो. चिखलू त्याच्या आजी जवळ राहत असतो. आजीजवळ सगळे लोक तक्रारी करत असतात. त्यामुळे आजीला अगदी जीव नकोसा होतो. पण हिचा चिखलूवर खूप जीव असतो. गावात काहीही घडले कि लोक चिखलू वर आरोप करत असतात.गावातील लोक आपल्या मुलांना चिखलू पासून दूर राहा असे सांगतात. पण बऱ्याच मुलांचे चिखलूवर प्रेम असते. चिखलू शाळेत न जाता, मस्ती करत बसतो. जेव्हा तो शाळेत जातो, तेव्हा मास्तराच्या खोड्या काढतो. एकूण सगळ्या लोकांना चिखलू त्रास देतो.

गावाच्या शेजारी एक मोठे घनदाट जंगल असते. तिथे एक भूत राहते आणि ते भूत या गावातील लोकांना त्रास देत असा इथल्या लोकांचा विश्वास असतो. जंगलातील भुताला गावातील लोक, बळी वगेरे देतात, जेणेकरून भूत खुश राहील व लोकांना त्रास देणार नाही. गावातील सगळ्या लोकांचे आयुष्य या भूत्याभोवती फिरत असते. गावात कोणाची तब्येत बिघडली, किंवा कोणी मेले, तरीही भूत्यामुळे होते आहे असे सगळे म्हणतात. एकूण गावातील सगळ्या लोकांचे आयुष्य भूत्याभोवती फिरत असते.

एक दिवस शाळेत मास्तर रागारागात चिखलूला म्हणतात कि गावात सगळे लोक भूत्याला घाबरतात पण तूच एक असा आहेस जो भूत्याला घाबरणार नाहीस. तू का जात नाही जंगलात, त्याने गावातील लोक तुझ्या खोड्यांपासून तरी वाचतील. हे ऐकून चिखलू सगळ्या मित्रांना घेऊन जंगलात जायला निघतो, पण सगळी घाबरून परत फिरतात. हा एकटाच जंगलात जातो. तिथे गेल्यावर त्याला चित्र विचित्र आवाज येतात. तरी तो पुढे पुढे जात राहतो. तिथे एका पडक्या इमारती मध्ये जातो,तिथून खूप पक्षी येतात, त्या पक्ष्यांना घाबरून चिखलू पळत सुटतो आणि एका झाडाच्या फांदीला अडखळतो त्याच्या डोक्याला मार लागतो तो जेव्हा त्याला जाग येते, तेव्हा तो जंगलाबाहेर पडलेला असतो, व त्याच्या जखमेवर औषध लावलेले असते.

चिखलूवर खूप प्रेम करते गावातील एक मुलगी म्हणजे साळूताई. हिला लग्न करायचे नसते, पण हिचे आई वडील हिचे कोणाशी तर लग्न करून द्यायचे असा घाट घालत असतात. हिला मनाजोगता जोडीदार मिळाल्याशिवाय लग्न करणार नाही असे हिने ठरवलेले असते. चिखलू आणि साळू या दोघांची खूप मैत्री असते. चिखलूला समजून घेणारी त्याच्या आजी व्यतिरिक्त साळू हि एक मैत्रीण, ताई असते. साळू चीखालुला बरेचदा विचारते तो जंगलात का गेला, पण चिखलू काहीच सांगत नाही.

या प्रसंगानंतर चिखलूला वाटते कि भुत्या हा चांगला आहे. त्यामुळे चिखलू पुन्हा जंगलात जातो भूत्याचा शोध घ्यायला आणि एका अनपेक्षित क्षणी त्याची भूत्याशी भेट होते. शेवटी भुत्या हा नक्की कोण असतो, तो असा का वागतो हे बघायला मिळते पुढील सिनेमात. भुत्या आणि चिखलूची मैत्री, लोक कसे उगाचच कशाहीवर विश्वास ठेवतात हे बघा "पक पक पकाक"मध्ये.

चिखलू व भुत्याचे एकमेकांशी होणारी मैत्री, त्यांचे एकमेकांवरील प्रेम, चीखालुला भुत्या कसा नकळतपणे शिक्षण देतो, ते सगळे प्रसंग एकदम मस्त आहेत. नाना पाटेकर "भुत्या"च्या भूमिकेत खूपच मस्त. सक्षम कुलकर्णीचा चिखलू छान. फक्त त्याने जरा वजन कमी केले असते तर चांगले झाले असते, कारण गावात इतकी लठ्ठ मुले नसतात. सिनेमातील गाणी पण चांगली आहेत. सक्षम कुलकर्णीला या सिनेमासाठी AsianFestival of First Films (AFFF) चे बेस्ट अक्टर अवार्ड मिळाले आहे. लहान मुलांना घेऊन बघण्यासारखा सिनेमा आहे. सिनेमा छानच आहे. जरूर बघावा असा.

Pak Pak Pakak is a movie set in a small village. Chikahlu is a village boy, who has lost his parents at early age and is taken care by his grandmother. He is a very naughty kid, always playing mischiefs with all the villagers. He has lot of friends, but the parents of his friends are not allowing the kids to play with him, due to his reputation of naughty kid.

He has a good friend Salu. She is one of his neighbors, older than Chikhalu by few years. Her parents want her to get married, but she insists that she will marry only she finds a suitable man. Salu and Grandmother are the only two in village protecting Chikhalu, and who believe he is a good boy by heart but just a bit too naughty. Anything wrong in the village and the blame will be on Chikhalu.

Adjacent to the village s a forest. And all the villagers believe that there is a ghost in that village. People call it Bhutya. People have experienced strange things in the forest, which has led them to believe in Bhutya. Several people have tried unsuccessfully to find out about Bhutya. Finally they start worshiping Bhutya out of fear and belief that worshiping will protect them from the ghost.
One day, Chikhalu's teacher is irritated with his pranks and says why don't you visit Bhutya so that village will get rid from your pranks. This idea gets into fearless Chikhalu's head and he enters the forest with some of his friends. In few minutes, all the friends come out of the forest fearing Bhutya, and Chikhalu continues his adventure alone. But finally the silence and sound of different birds and animals induces fear in him. He starts to run back towards village but bumps on a low lying branch of a tree and gets unconscious. When he wakes up, he was just outside the forest with some herbal medicine applied to his wound.

Salu tries to get his reason for entering the forest and what happed with him, but Chikhalu wit fully avoids to answer. Salu is not convinced,but lets go for the time being. Chikhalu feels that Bhutya has helped him and decides to try to meet him again. He manages to enter the forest again and meets Bhutya. It will be spoiler to tell who Bhutya is and the story behind Bhutya's existence, how Chikhalu develops friendship with him.

Nana Patekar is really good in as Bhutya. Saksham Kulkarni has won awards for this role. He has acted really well throughout. Only things does not fit with the movie is his stout physique. Narayani Shastri is good as Salu. A must watch movie, specially if you want to watch with kids. Music is good too.


Cast
  • Nana Patekar नाना पाटेकर
  • Saksham Kulkarni सक्षम कुलकर्णी
  • Narayani Shashtri नारायणी शास्त्री
  • Usha Nadkarni उषा नाडकर्णी
  • Jyoti Subhash ज्योती सुभाष
  • Prachi Shah प्राची शहा

Direction
  • Gautam Joglekar गौतम जोगळेकर


Link to watch online

४ टिप्पण्या:

  1. लिहिलंय छान, पण सक्षमच्या सुधृढ असण्याबद्दल मात्र एकदम चुकिचं लिहिल आहे. वजन कमी करणं... ते पण फक्त भुमिकेसाठी? एखादा कलाकार ही एक स्वतंत्र व्यक्ती आहे, आणि बालपण तर या निर्मितीपेक्षा अधिक महत्वाचं आहे, असं नाही का वाटत?

    उत्तर द्याहटवा
  2. Awesome Act by Nana Patekar. Watch Full Movie Here Online : http://bit.ly/1DRayVD

    उत्तर द्याहटवा