Pages

बुधवार, मार्च १७, २०१०

अकीला अँड द बी (Akeelah and the bee)


अकिला हे ११ वर्ष्याची मुलगी थोडी एकलकोंडी असते. तिला फक्त एकच मैत्रीण असते. शाळेतील बाकीची मुलं तिला आवडत नसतात. तिला तिच्या शाळेबद्दल देखील काहीच प्रेम नसते. आई जबरदस्ती करून शाळेत पाठवते त्यामुळे हि शाळेत जाते. अकिलाचे वडील थोड्या दिवसापूर्वीच स्वर्गवासी झालेले असतात. हिचा आपल्या वडिलांवर खूप जीव असतो. हिचा मोठा भाऊ एयर फोर्स मध्ये पायलट म्हणून शिक्षण घेत असतो, तर मधला भाऊ उडानटप्पूपणा करत असतो.

अकिला शाळेत चांगले मार्क मिळवत असते. हिला विशेषता प्रत्येक शब्दाचे स्पेलिंग करण्याची विशेष आवड असते. तिला खूप मोठे मोठे शब्द व्यवस्थित अर्थासकट व स्पेलिंग सकट पाठ असतात. तर स्पेलिंग करण्याची एक स्पर्धा असते, त्यात जर अकिलाच्या शाळेतून कोणी ५ नंबरच्या आत आले तर शाळेला खूप पैसे मिळणार असतात. या पैश्याची शाळेला खूपच मदत होणार असते. त्यामुळे शाळेचे मुख्याधापक अकिलाला या स्पर्धेत भाग घ्यायला सांगतात. पण अकिलाची अजिबात इच्छा नसते. कारण हि हुशार आहे असे सगळी मुलं तिला चिडवत असतात, आणि त्याचा तिला खूप त्रास होत असतो.

पण दबावाखाली येऊन ती स्पर्धेत भाग घ्यायला होकार देते. हिला शिकवण्यासाठी म्हणून प्रिन्सिपल डॉ. लाराबी नावाच्या एका स्पेलिंग एक्स्पर्टला नेमतात. पण अकिला आणि लाराबी यांच्या मध्ये काही मतभेद होतात आणि त्यामुळे अकीला त्यांच्याकडे जाण्याचे टाळते. ती स्वतच अभ्यास करून स्पर्धेत ५ च्या आत नंबर मिळवते. पण ती स्पर्धा बघितल्यावर तिला कळते कि कोचिंगची गरज आहे. कारण हि जी ५ मुलं असतात ती यापुढे संपूर्ण अमेरिकेत होणार्या स्पर्धेत भाग घेणार असतात. त्यामुळे ती लाराबी कडे जाते व शिकवण्याची विनंती करते. शेवटी अकीलाला लाराबी शिकवतात का, ती स्पर्धेत किती पुढे जाते, तिला कोण कोण भेटतात, घरी तिच्या स्पर्धेतील सहभागाबद्दल काय मत असते, हे बघा "अकीला अंड द बी" मध्ये.

सिनेमा चुकवू नये असाच आहे. स्पेलिंग बी च्या माहितीसाठी इथे क्लिक करा


Akeelah is young school going girl of 11 years. She is studying in small school in suburban Los Angles. She is from a poor family. Her father has passed away few years back. She has a Older brother who is a US mariner. Elder sister is single mother and is staying with her. She has one more older brother who is not studying and spends time with a gang. Her mother is working as a Nurse in an hospital to manage the family of five.

Akeelah is not very happy with her school. She is doing alright in the school, but needs to take up summer school to catch up. She has a very good knack of memorizing spellings, and is invited to participate in the school level Spelling Bee competition. If she wins in the school competition and then gets top places in regional Spelling Bee, the school with get some grants and the teacher promised her that she will be relived from the summer school business. With all this in mind, she decides to give it a shot, and easily wins the school competition.

Dr. Larabee who just visits the school while the competition is on, tests her abilities and is impressed with her. He offers to help her prepare for the next level. Dr. Larabee is a strict professor and Akeelah is not able to understand his systems. Finally she quits the coaching and decides to give it shot on her own. She manages to sneak through to the top five in the regional but realizes, if she has to compete further she needs some good training. In the competition she also makes a friend Javier. He has taken part in the competition the previous year and gives her a lot of information about the competition ahead.

Does Akeelah goes back to Dr. Larabee, is she able to make it to next lever and national championship ? Does her mother support her ? needs to be seen in the movie.

This is one of those must watch kind of motivational movie and specially children would really enjoy it.

Movie details on IMDB

Details about Spelling bee, is here

Cast:
Director:

  •  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा