Pages

शुक्रवार, एप्रिल १७, २००९

एक डाव धोबी-पछाड़ (Ek Dav Dhobi Pachhad)



दादा दांडगे एक "दादा", शहरातील बहुतेक काळे धंदे हेच चालवतात. त्यांना आता एक नविन दारू व जुगाराचा अड्डा काढायचा आहे. पण त्यांच्या मनातील जागा शाळेसाठी राखीव आहे व कोणी एक बाई त्यांची डाळ शिजू देत नाहिये. दादा स्वता: या कामात लक्ष घालायचे ठरवतात. शाळेच्या जागेवर पोचल्यावर दादा ना कळते की ती बाई त्यांची पुर्वायुष्यातली प्रेयसी आहे जी अचानक त्यांना सोडून गेली होती.

या घटनेनंतर दादा बदलतात. ते स्वतःला बदलायचे ठरवतात. पहिली पायरी म्हणजे सर्व काळे धंदे ते आपल्या साथीदारांना वाटुन देतात. त्यांच्या बरोबर फक्त दोन जिवाभावाचे सोबती ठेवतात भगवान आणि बाबुराव. आता त्यांना त्यांची भाषा सुधारणे व थोडी प्रतिष्टा कमावणे अशी ध्येय असतात. त्यासाठी ते एक मराठी चे प्राध्यापक ठेवतात व एका शिक्षण संस्थेचे पदाधिकारी होण्याचे ठरवतात.

यापुढे सुरु होते सगळी धमाल. दादांना या कामात कश्या अडचणी येतात. दादाच्या मुलीचे प्रेमप्रकरण, पिशव्यांचे घोटाळे, दादांच्या हीतशत्रुंचा परिस्थितीचा फायदा घेण्याचा प्रयत्न इत्यादि ...

चित्रपटात खुप नावाजलेले कलावंत आहेत परंतू सर्वांना म्हणावा तेवढा वाव मिळालेला नाही. संजय मोने आणि सुकन्या कुलकर्णीने खुपच लहान भूमिका केली आहे आणि ती पण फारशी छाप पाडत नाही.

एकुणात मात्र विनोदी चित्रपट आवडत असल्यास पाहण्यासारखा आहे.


Dada Dandge is a gangster. Accidentally he meets his long lost love, while trying to vacate a piece of land to start a bar. The brief talk with her proves a turning point for his life.

He decides to become a gentleman and win back his love. So he divides all his illegal business among his gang and tries to become a good person. He wants to get his daughter married to decent person. He also wants to get on management board of an educational trust.

The story complicates with his accountant, his Marathi teacher and daughter's love triangle. The whole movie is full of comedy and can be watch as very good stress reliever.

Must watch for Ashok Saraf comedy fans.

Cast:
Director
Eak Dav Dhobi Pachhad on Marathi Tube

२ टिप्पण्या:

  1. हा सिनेमा ’ऑस्कर’ नावाच्या सिनेमावर बेतलेला आहे, ते मायबोलीवर कळाले.
    असो पण सिनेमा छान विनोदी आहे, कंटाळा येत नाही...

    उत्तर द्याहटवा
  2. एक उत्कृष्ठ मराठी सिनेमा. वेगवान मांडणी, उत्कृष्ट दिग्दर्शन,नेटके संवाद,बेस्ट पटकथा आणि प्रत्येकाचा उत्कृष्ट अभिनय ह्या जमेच्या बाजू होतं. मुक्ता बर्वेचा नाम उल्लेख कुठेच नसल्याचे मात्रा नक्कीच खटकते. तिचा रोल सुध्धा खरे तर तितकाच मस्त नि महत्वाचा आहे. अशोक सरफांची प्रथम निर्मिती त्यांच्या अभिनायाप्रमाणेच खूपच दर्जेदार असल्याचा प्रत्यय आला.

    उत्तर द्याहटवा