Pages

मंगळवार, जून २८, २०११

ट्युसडे विथ मॉरी (Tuesdays with Morrie)




मीच हा एक पत्रकार असतो. हा स्पोर्ट्स बद्दल एका मोठ्या वर्तमानपत्रात एक कॉलम लिहित असतो आणि हा कॉलम खूप लोकप्रिय असतो. रोज एक कॉलम लिहियचा म्हणजे कामाचे प्रेशर हे असतेच. शिवाय आधी मुलाखत घ्यायची किंवा गेम बघायचा मग कॉलम लिहायचा म्हणजे त्याला इतर काही करायला काहीच वेळ नसतो. याचे एक जेनीन नावाच्या गायीकेवर प्रेम असते. हे दोघे ७ ते ८ वर्षापासून प्रेमात पडलेले असतात, पण लग्न काही केलेले नसते. जेनीनला वाटत असते कि आता लग्न करून संसार करावा, असं नुसतंच किती दिवस घालवायचे, पण मीच हा लग्नाला होकार देण्यात खूप चालढकल करत असतो. शेवटी जेनीन खूप वैतागते आणि ती म्हणते कि नक्की काय प्रोब्लेम आहे तो सांग म्हणजे तिला काय तो निर्णय घेता येईल. मीच म्हणतो की मला तू खूप आवडतेस पण लग्न मला करायचे नाही. आणि माझे दुसऱ्या कोणाबरोबर प्रेम देखील नाही.
थोडक्यात या दोघांचे संबध लग्न या विषयावरून जरा ताणले जातात.

मीच हा पत्रकार असल्याने त्याला सतत, टीवी बघणे, फोनवर बोलणे, किंवा कॉम्पुटरवर लिहित राहणे या शिवाय काहीच करायला फुरसत नसते. तो असाच टीवी चॅनेल बदलत असताना त्याला त्याच्या एका प्रोफेसरची मुलाखत लागलेली दिसते. ती ऐकून तो एकदम स्तब्ध होतो. कारण त्याच्या प्रोफेसरला एक असाध्य रोग झालेला असतो. त्या रोगाचे नाव  ALS "Lou Gehrig's disease". या रोगामध्ये एक एक अवयव लुळे पडत जातात आणि मग शेवटी माणूस मरतो. प्रोफेसर मॉरी, हा सोशॅलॉजीचा प्रोफेसर असतो. खूप चांगला शिक्षक असतो. मीच हा त्याचा लाडका विद्यार्थी असतो. जेव्हा मीच ग्रॅजुएट होतो तेव्हा मीचने त्याला वचन दिलेले असते कि काही झाले तरी तो मॉरीच्या इमेल, फोन किंवा पत्र या रूपाने सतत संबधात राहील. पण गेल्या १६ वर्षात मीच त्याच्या कामाच्या व्यापात इतका बुडून गेलेला असतो कि मीचला याला एक पत्र पाठवायला देखील वेळ मिळालेला नसतो.

आता तर मॉरी मरणाच्या दारात आहेत असे मीचला कळते. मीच खूप गोंधळतो, त्याला स्वत:ची खूप लाज वाटते. पण शेवटी जेनीनच्या सांगण्यावरून मीच मॉरीच्या घरी जातो. मॉरी हा बोस्टनला राहत असतो, तर मीच हा डेट्रॉइटला. त्यामुळे मॉरी आणि मीचचे गाव तसे जवळ नसते. तिथे गेल्यावर मॉरी, मीचला लगेच ओळखतो. मीचला समजते की जरी मॉरी मरणाच्या दारात आहे तरीही त्याचा उत्साह कमी झालेला नाही. एकदा मॉरीला भेटून परत येऊ अशा विचारात आलेला मीच मॉरीला भेटल्यावर पुन्हा त्याला भेटायला यायचे असे ठरवतो.

इकडे त्याचे आणि जेनीनचे संबध तुटायला येतात, मॉरीशी बोलल्यावर आयुष्य किती महत्वाचे आहे हे त्याला कळते. मॉरी जेव्हा शिकवत असतो तेव्हा त्याचे ऑफिस अवर्स हे मंगळवारी असतात. त्यानुसार मॉरी त्याला सांगतो कि तू मला दर मंगळवारी भेटत जा. प्रत्येक भेटीत मॉरीचे आयुष्य मीच समोर उलगडत जाते. मॉरी बरोबर राहून मीचला इतके काही शिकायला मिळते, ते बघून मीचच्या मनात एक कल्पना येते कि मॉरी गेल्यावर देखील मॉरीने सांगितलेल्या गोष्टी ऐकता याव्या म्हणून तो मॉरी जे काही बोलेले ते रेकॉर्ड करून घेतो. मीच विषयाची यादी बनवतो आणि मग या प्रत्येक गोष्टीवर मॉरी त्याची मत सांगतो. सिनेमाचा शेवट अर्थातच मॉरीचे मरण इथे होतो. पण मॉरीच्या जवळ आल्यावर मीच चे आयुष्य कसे बदलते, जेनीन आणि मीचचे संबध सुधारतात का? मॉरी चे तत्वज्ञान नक्की काय सांगते हे बघा "ट्युसडे विथ मॉरी" मध्ये.

सिनेमा खऱ्या गोष्टीवर आधारित आहे. १९९४ मध्ये मॉरीला हा रोग झाला आणि त्यानंतर जवळपास एक वर्ष ते या रोगात हळूहळू जळत गेले. मीच अल्बोम याने खरच सगळ्या गोष्टी रेकॉर्ड करून घेतल्या आणि त्यावर नंतर मग एक पुस्तक लिहिले. त्या पुस्तकानंतर त्याचे सिनेमात रुपांतर झाले. शिवाय याच पुस्तकावर आधारित एक नाटक देखील आहे. सिनेमा खूप म्हणजे खूप सुंदर आहे. सगळ्यांनी जरूर बघावा असा. या सिनेमाचा शोध आम्हाला लागला तो असा, आम्ही रोबिन शर्मा ने लिहिलेले "हु विल क्राय व्हेन यु डाय" हे पुस्तक वाचले त्या पुस्तकात या सिनेमाचा उल्लेख आहे. तो उल्लेख बघून सहज ट्युसडे विथ मॉरीचे ऑडीयो
बुक आणले आणि ते ऐकल्यावर वाटले कि सिनेमा पण बघायलाच हवा. सिनेमा बघून खरच खूप छान वाटले. एकदम वेगळ्या विषयावरील सुंदर सिनेमा आहे, जरूर बघावा असा. सगळ्या कुटुंबाबरोबर बघण्यास हरकत नाही.

तुम्ही हा सिनेमा बघितला असल्यास, किंवा पुस्तक वाचले असल्यास जरूर प्रतिक्रिया लिहा अर्थात माझ्या लिखाणावर तुमच्या प्रतिक्रियांचे स्वागतच आहे.

Mitch is a famous Sports reporter. His Sports column for a leading newspaper is really famous. But columnists are constantly under pressure, since they have to cover so many events. It also involves a lot of travel and watching games. His life is so much occupied by this that he hardly gets time for himself. He has been enjoying it. But he is in love with Janine. Janine is a budding singer. They have been seeing each other for 7-8 years, and are at a stage of deciding to get married and settle. Janine is getting impatient about it and Mitch is intersted but is not getting time to go through all this. At one point Janine directly probes Mitch on this issue. She kind of issues him an ultimatum, to either explain the problems so she is free to decide for herself or commit the marriage. Mitch explains that he loves only her and there is no one in his life, but he is not ready for marriage. This puts some more tension between the two.

Mitch being in journalism profession has to spend a long time watching games on TV, talk on phone and write notes in his computer. While browsing through the TV channels he stops at one channel which is showing a interview with a Professor. He is shocked to hear this, since the person being interviewed is his own mentor when he was in University. Now he is suffering with ALS or Lou Gehrig's disease. In this disease, one by one the body organs stop functioning, and ultimately the person dies. Professor Morrie Schwartz is a very popular sociology professor and Mitch is one of his pet students. At the time of graduation Mitch promises him that he will always keep in touch with him. But Mitch has not at all kept his promise and not contacted him even once in the last sixteen years since he graduated from university. 

On the sad news about Professor Morrie illness shakes Mirch. He is utterly confused and ashamed of him for not contacting Morri even once. Finally in consultation with Janine, Mitch decides to see Morrie once. Mitch is based in Detroit and Morrie is in Boston, but still Mitch makes a trip to Boston to see him. When he goes to see Morri his plan was to see him once before he dies, bit when he sees Morrie, his thoughts change. First thing Morrie recognize Mitch in first sight. Though he is on his death bed, his enthusiasm has not died and his will to teach is very much alive. Mitch decides to see him once again in a weeks time.

Mitch and Janine are almost on verge of a break up, but while talking to Morrie Mirch realities the importance of human relations and how one should maintain the relations. When Mitch was his student, they had office hours togetehr on Tuesdays so they decide to meet every Tuesday. Mitch takes a break form his job and follows up Morrie with regular visits. They start discussing on different things in life and Mitch start to learn a lot of things for Morrie about his life and life in general. Mitch decides to record the conversations so that they will continue to teach and enthuse people in their lifes. Morrie makes a list of topics to be covered and covers each one in every weekly meeting. What was covered in thes meetings ? What happens to the relationsdhip between Mirch and Jane ? we need to watch in the movie Tuesday's with Morrie.

The movie is based on real life story. Prof. Morrie actually suffered the illness in 1994 and died after a year. And Mitch Albom, one of his journalist student recorded his experiences and converted into a best seller book with the same title. THis was later converted into the movie. This is a must watch movie. We learned about this through Robin Sharma's bestseller book "Who will cry when you die" This book has recomemned "Tuesday's with Morrie" as one of the must read books. This is a really good family movie and do not miss it.


Cast
  • Jack Lemmon जॅक लेमन
  • Hank Azaria हॅन्क अझारीया
  • Wendy Moniz वेन्डी मॉनिझ
  • Caroline Aaron कॅरोलीन अॅरॉन
  • Bonnie Bartlett बॉनी बार्टलेट
  • John Carrol Lynch जॉन कॅरोल लिन्च

Director
  • Mick Jackson मीक जॅकसन
Wikipedia Link

Book                            Movie DVD

1 टिप्पणी:

  1. SIR, ROBIN SHARMA SIR KA WHO WILL CRY WHEN YOU DIE ? YE BOOK PADH RAHA THA USME IS BOOK KA NAM AAYA HAI ISLIYE AAPKA WEB SITE OPEN KIYA... ACHHA LAGA... ME JARUR O MOVIE DEKHUNGA... THANK SIR....

    उत्तर द्याहटवा