Pages

मंगळवार, फेब्रुवारी १५, २०११

यु हॅव गॉट मेल (You've Got mail)

 कॅथलीन केली नावाची एक सुंदर आकर्षक, हुशार, स्वतंत्र मुलगी एक लहान मुलांचे पुस्तकाचे दुकान चालवत असते. हे दुकान तिच्या आईने सुरु केलेले असते. हे दुकान मुख्य म्हणजे वस्तीत अगदी कोपऱ्यावर असते. त्यामुळे हे दुकान खूप प्रसिद्ध असते. हि ६ वर्षाची असल्यापासून दुकानात आईला मदत करायला येत असते. त्यामुळे हिचे आयुष्य हा पुस्तकाच्या दुकानाशी निगडीत असते. या दुकानाशिवाय तिला दुसरे काहीच सुचत नाही. दुकानात आता अजून ३ लोक काम करत असतात. त्यात एक बर्डी नावाची म्हातारी स्त्री, जी कॅथलीनच्या आईच्या वेळेपासून दुकानात असते, जॉर्ज, आणि अजून एक मुलगी असे तिघे हे दुकान सांभाळत असतात. कॅथलीनने खूप पुस्तक वाचलेली असतात.

तर ह्या दुकानाच्या समोरच एक मोठा उद्योगपती ज्यो फॉक्स हा एक असेच पुस्तकांचे दुकान काढण्याचा प्रयत्न करतो. याचे दुकान खूप मोठे, सगळ्या सुखसोयी, कॉफी, खायला काही गोष्टी, शिवाय ३०% डिस्काउंट देणार असते. थोडक्यात हिचे दुकान बंद होणार अशी चिन्ह असतात.


अमेरिकन पद्धतीप्रमाणे हिचा एक बॉयफ्रेंड असतो. ते दोघे एकाच घरात राहत असतात. तो एक लेखक असतो. दोघं चांगले मित्र असतात. पण तरीही एकदा कॅथलीन इंटरनेट वर ३०+ च्या चाट रूम मध्ये जाते आणि तिची एका व्यक्तीशी ओळख होते. ते दोघे एकमेकांना इमेल करतात. त्यांचे असे ठरलेले असते, कि काही प्रायव्हेट प्रश्न विचारायचे नाहीत. पण एकूण तुमच्या मनातील प्रश्न एकमेकांबरोबर शेअर करायचे, म्हणजे हितगुज करायचे. आणि एकमेकांना भेटायला पण बोलावयाचे नाही. कथालीन shopgirl नावाने लॉगइन करत असल्याने हिचे खरे नाव कळत नाही तसेच हिचा इंटरनेट वरील मित्र NY152 या नावाने लॉगइन करत असल्याने हिलाही त्याचे नाव कळत नाही. दोघे जण एकमेकांच्या इमेलची अगदी आतुरतेने वाट बघत असतात. रोज एकमेकांना त्यांच्या जीवनातील घडामोडी सांगत असतात. काय वाचले, त्यातील काय आवडले, काय आवडले नाही, अश्या बऱ्याच गोष्टी सांगत असतात.

फॉक्स स्टोर मुळे कॅथलीन केलीच्या पुस्तकाच्या दुकानाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होतो, त्यामुळे चिंतीत कॅथलीन NY152 ला भेटायचे ठरवते. एका रेस्टॉरँट मध्ये वाट बघत बसते, पण NY152 काही येत नाही. त्याच्या ऐवजी ज्यो फॉक्स येतो आणि त्या दोघांची दुकानावरून बाचाबाची होते. ही बराच वेळ वाट बघून घरी परत जाते, आणि त्याला इमेल करते. शेवटी हा इमेल करणारा नक्की कोण असतो? कॅथलीनच्या दुकानाचे काय होते हे बघा "यु गॉट मेल" मध्ये.

हा सिनेमा जेव्हा डायल अप कनेक्शन होते तेव्हाचा आहे. त्यामुळे चाट, इमेल हे सगळे नवीन होते. इंटरनेट कनेक्ट करताना होणारा मॉडेमचा आवाज सगळे कसे पुरातन वाटते. पण सिनेमा चांगला आहे. टॉम हॅन्क्सचे बहुतेक सगळेच सिनेमे वेगळ्या धाटणीचे असतात. तसाच हा आहे. कॅथलीनची भूमिका करणर्या मेग रायनने पण काम खूप चांगले केले आहे. टोम हन्क्स जेव्हा त्याच्या बरोबर आलेल्या लहान मुलांची ओळख आन्ट आणि अंकल अशी करून देतो तेव्हा मज्जा वाटते. त्यावर त्याचे "वी आर अमेरिकन फमिली" हे वाक्य खूप समर्पक वाटले.

सिनेमा जरूर बघावा असा आहे. तुमच्या प्रतिक्रिया जरूर लिहा.


Cathaleen Kelly is a good looking, independent and lovable lady. She is running a small bookstore called the Corner Shop in New York. This was started by her mother, but now after her mother, she is running it. It is very popular shop specially among the kids. Cathaleen has been coming to she shop with her mother since she was six years old. In a way the book store is her life, and she always keeps thinking about her shop. There are three employed in the shop, an old accountant Birdie who has been from from her mother time, a funky guy George and a girl who is studying in the college and working in the shop to earn. Cathy has read so many books and has a very good knowledge about the books and authors.

A big shop is being built very near her shop, and it turned out to be a book shop by a big industrialist Fox. Now this new book store is modern one with Coffee and Fast food shop within, big discounts on books etc. In short Cathy's bookstore is in trouble due to this new competition.

Being an American, Cathy has a boyfriend, who is a journalist and author. They are living together and happy. But once while on internet 30+ chat room, she meets a person and they start sending emails to each other. They have an understanding that they will just remain friends like this, and would not get into details of personal life. Rather will discuss issues anonymously and keep friends. Cathy has a chat name Shopgirl and this friend of hers is NY152. But due to some reason, both of them are eagerly waiting for each others emails. And keep discussing things happenings without reveling much details of their lives.

As this Fox store actually opens and Cathy starts feeling the real threat. After few weeks she actually starts comparing sales figures with the previous years and start getting worried. Over email she learns from NY152 that he is a business expert, she decides to meet him in person and discuss her problems. While waiting for NY152, Joe Fox, owner of Fox stores turns up there, and they have a verbal fight there. Finally exhausted by the fight she waits for NY152 and returns home. She emails NY152 her displeasure and frustration. Who is the person emailing her ? Does Cathy able to save her shop? What problems does Joe Fox create ? Watch this in "You got mail".

This movie was made when there still dial-up modems, and email, chat were uncommon things. In the current times it gives a vintage feel. The movie is good, like most movies of Tom Hanks. Meg Ryan as Cathy is too good. In one of the scenes when Tom Hanks introduces two small kids with him as his Aunt and Brother, it is hilarous and on top of it he says "We are a American family".

If you have not watched it, it is a must watch movie and if you have watched it, do write your comments.

Cast
  • Tom Hanks टॉम हॅन्क्स
  • Hallee Hirsh हॅली हर्ष
  • Michael Palin मायकेल पालीन
  • Meg Ryan मेग रायन
  • Parker Posey पार्कर पोसे
  • Greg Kinnear ग्रेग किनिअर
  • Jean Stapleton जीन स्टॅपलटन

Direction
  • Nora Ephron नोरा एफ्रोन


Movie DVD

२ टिप्पण्या:

  1. अहो, परीक्षण लिहिताय चित्रपटाचे तर निदान त्याचे नाव तरी नीट लिहा.
    बाकी परीक्षण तर पांचटच आहे. गणेश मतकरी सारख्याचे जरा पाय धरा. काहीतरी शिकून घ्या.

    उत्तर द्याहटवा
  2. सुबृतो, तुम्ही चूक दाखवून दिली त्याबद्दल धन्यवाद. हा ब्लोग मी माझ्यासाठी लिहिते आहे. कोणाबरोबर स्पर्धा म्हणून नाही. त्यामुळे गणेश मतकरी त्यांच्या जागेवर थोर आहेत. मला त्यांची जागा घ्यायची नाहीये. कुठलेही शब्द वापरण्यापूर्वी त्याचे अर्थ नीट समजावून घ्या. नंतर वापरा. धन्यवाद.

    उत्तर द्याहटवा