Pages

मंगळवार, नोव्हेंबर ०९, २०१०

सावर रे (Savar re)

इंद्रायणी उर्फ इंदू, व मुक्ता ह्या दोघी बहिणी. एका छोट्याश्या गावात राहत आईबरोबर असतात. वडील लहानपणीच गेलेले, त्यामुळे आईने दोघींना सांभाळलेले असते. मुक्ताला शिकवायचे म्हणून लहानपणीच इंदू ने शिक्षण सोडून एका कारखान्यात नोकरी सुरु केलेली असते. इंदू खूप मेहनती, हुशार आणि समजूतदार असते. मुक्त देखील हुशार असते आता एका शहरात कॉलेज मध्ये शिकत असते व त्याचबरोबर नोकरी देखील करत असते. मुक्ता एकदम मजेत जीवन जगावे अश्या मताची असते, तिला कशाची चिंता वगेरे नसते. आयुष्य कसे वेगात आणि भरभरून जगावे असे हीच मत असते. मुक्ताचा कॉलेज मधील मित्र सलील, याच्या वर हिचे प्रेम असते. पण अजून हिने घरी याबद्दल कोणाला सांगितलेले नसते.



तसेच इंदूचे पण शिबू नावाच्या मुलावर प्रेम असते. घरी सगळ्यांना माहिती असते. आणि इंदूची आई लग्नाला तयार देखील असते.शिबू अन इंदू लग्न करायचे ठरवतात. लग्नासाठी मुक्ता गावात येते. हळद लागण्याचा कार्यक्रम असतो, सगळे आनंदात असतात. हळद लागण्याच्या कार्यक्रमात, मुक्ताला एकदम आठवते, की लग्नासाठी मेंदी आणायला विसरलो आहोत. घरातील सगळे जण तिला जाऊ नको असे म्हणतात, पण मुक्ता कसला ऐकतेय. ती इंदूची सायकल घेऊन वेगाने निघते मेंदीचे कोन आणायला. सायकलवरून रस्ता क्रॉस करत असताना, तिला एका गाडीचा धक्का लागतो आणि मुक्ता रक्ताच्या थारोळ्यात पडते. सगळे लोक धावत येतात, तिला हॉस्पिटल मध्ये घेऊन जातात. हिच्या मेंदूला जबर मार लागलेला असतो. डॉक्टर प्रयत्नांची पराकाष्ट करून हिला वाचवतात. ऑपरेशन साठी लागणारा पैसा इंदू तिचे लग्नाचे दागिने विकून उभा करते.



ऑपरेशन झाल्यावर मुक्ता बरी होईल असे सगळ्यांना वाटते, पण दैवाच्या मनात काहीतरी वेगळेच असते. मुक्ता काहीच ओळख देत नाही. तिचा मेंदू काम करेनासा होतो. ती एकदमच परावलंबी होऊन जाते. इंदूला मुक्ताच्या तब्येतीपुढे काहीच सुचत नाही. इंदू मुक्ताला बर करण्याचा ध्यास घेते. स्वताचे लग्न मोडून टाकते, शिबू काहीच बोलत नाही. उलट काही दिवसाने शिबुचे एका मुलीशी लग्न ठरते. इंदू सगळे सगळे सहन करते, इंदूची आई इंदूला म्हणते की तू मुक्ताच्या मागे तुझे आयुष्य व्यर्थ घालवू नकोस, आपण मुक्ताला पंढरपूरला पाठवून देऊ वेड्यांच्या इस्पितळात. पण इंदू अजिबात बधत नाही. उलट मुक्ताला बरे करायचे व तिची अशी अवस्था ज्याने केली त्याला शोधायचे असे फक्त २ उद्देश असतात.



मुक्ताची अशी स्थिती ज्या अपघाताने झालेली असते, त्याला कारण एक डॉक्टर असतो. डॉक्टर आनंद हा एक खूप प्रसिध्ध न्यूरोसर्जन असतो. याची बायको संध्या आणि आनंद या दोघांचे एक स्वप्न असते की खूप मोठे हॉस्पिटल बांधायचे. एकूण खूप पैसे कमावत असतात दोघेही, आनंदचे वडील अप्पांना त्यांच्या या वेगाची भीती वाटते. ते सारखे म्हणतात की तुम्ही इतके कमावत आहात पण त्याचा उपभोग घ्यायला तुम्हाला मागे वळून बघायला वेळच नाही. पण या दोघांना त्यांचे म्हणणे पटत नाही. ते आपले हॉस्पिटल बांधण्याचे स्वप्न पूर्ण करण्याच्या प्रयत्नात असतात. त्यासाठी त्यांना जमिनीच्या मोठ्या तुकड्याची गरज असते. संध्या खूप प्रयत्न करून एका मंत्राकडून जमिनीचा तुकडा मिळवायचा प्रयत्न करते, आणि त्याच संबधात आनंदची मिटिंग असते. मिटिंग खूप चांगली होते आणि त्याच्याच आनंदात, आनंद, एकीकडे मोबाईल वर बोलत, दुसरीकडे लपटोप वर काम करत गाडी चालवत असतो. मुक्ता रस्ता क्रॉस करत असताना या गोंधळात याची तिला ठोस लागते.



अपघात झाल्यावर मात्र डॉक्टर आनंद पूर्णपणे हतबल होतो. त्याचे हात ऑपरेशन करताना थरथरू लागतात. ज्या वेगाने तो पुढे जात असतो, तो वेग एकदमच कमी होतो. अपराधीपणाची भावना त्याला खात राहते. प्रायश्चित्त करायचे म्हणून तो मुक्ताचा हॉस्पिटलचा खर्च देतो. पण तरीही मन स्वस्थ होत नाही.

शेवटी, इंदू, आनंद यांच्या वाट कुठे भिडते, इंदूला तिच्या बहिणीचे जीवन उध्वस्त करणारा सापडतो का ? डॉक्टर आनंद इंदूला सांगू शकतो का की मुक्ताचा अपराधी तोच आहे.. हे सगळे बघा "सावर रे" मध्ये .



सिनेमा चांगला आहे. जरा वेगळ्या विषयावर आहे. रवींद्र मंकणीने डॉक्टर आनंदची होणारी तगमग खूपच छान दाखवली आहे. देविका दफ्तरदारची, इंदूची भूमिका छान आहे. फक्त तिचा वेश आणि भाषा यांचा काही ताळमेळ जुळत नाही असा वाटत. सिनेमातील गाणी अर्थपूर्ण आहेत. शिबू वर ओव्हर पॉवर करणारी इंदू, शेवटी, शिबूने तिला काहीतरी म्हणायला हवे होते असे म्हणते तेव्हा तिच्यातील स्त्री सुलभ भावना, शिबुला कळल्याच नाहीत असे वाटते.

सिनेमा जरा भावनापूर्ण आहे. सगळ्या कुटुंबाबरोबर बघता येईल असा निश्चित आहे. तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा.



Indrayani aka Indu and Mukta are two sisters. They are staying with their mother in a small village. They have lost their farther a while ago, and their mother has brought them up. Indu quit her education and took a job in a factory, so that Mukta can continue her education. Indu is very hardworking, bright and responsible girl. Mukta is studying in the college and working part time. She is doing well in her studies and other activities too. She is carefree but responsible by nature and likes to live life with vigor. MUkta is in love with one of her classmates Salil. She has not mentioned this to her sister and mother yet.



Indu is engaged with Shibu and they were planning to get married. Finally they find a good "Muhurt" and the wedding ceremony is planned. All the guests have arrived and Mukta is also back form college for the function. They were busy with the Haladi tradition, before the wedding. Allare very happy and having fun. Mukta remembers that they have forgotten Mehendi, so she takes out bicycle and rushes to buy it. Everyone was just telling her not to go and someone will go and buy, but Mukta is very athletic and fast, and wanted to go herself. Unfortunately she is hit b acar when she just merges on the main road and fells down. The car just vanishes without stopping. Fortuntelt because it is small village,people nitice this and take Mukta to Hospital. Doctors just manage to save Mukta's life,but she still has her brain injury to deal with. Indu sells all her wedding ornaments for the operation.



All were hoping that Mukta will be back to normal soon, but that is not the destiny. Mukta has lost her memory and interest in life, she is not recognising anyone. She has become totally dependent on others and Indu is very much disturbed. She devotes all her free time outside job to Mukta, and she wants Mukta to get back to normal. She breaks up relationship with Shibu and Shibu too silently accepts it.In a few days Shibu decides to marry some other girl. Indu just silently accepts everything and keeps working on Mukta's improvement. Her mother tries c to convince her that there is no hope with Mukta now, and they should send her to some clinic, but Indu does not agree. She continues to devote her time for Mukta, and also starts looking for the person responsible for this incidence.


A famous doctor is responsible for this accident. He is renowned neurosurgeon named Anand. Anand has a big dream of building a big hospital along with his wife Sandhya for the needy people. His father Appa is always telling him to slow down and let things take its own time. He always tell them to enjoy life and everything they do rather then just rush. Sandhya has worked her way very hard in getting a sizable land granted form the government. Anand is just returning from his meeting with the Minister where he is granted that land.So he is very happy and driving in a hurry, while talking on phone with Sandhya and also doing something on Laptop. That was the time Mukta is crossing the road and he has hit her.



He just runs away from the location, but his conscious not letting him settle.He is totally disturbed and is not able to concentrate on anything. He is literally lost sleep and was not able perform surgery. His life was asif someone was applying break to it. He decides to pay Mukta's hospital expenses, but still he does not get satisfaction.

As destiny has it, Indu and Anand have to cross roads somewhere. How do they meet, does Indu know that Anand is responcible for all the turmoil in her life, is Anand able to accept the responcibility. Watch Marathi movie "Sawar Re"

The movie is really good and family movie. Ravindra Mankani has depicted very well Doctor's emotional turmoil after the accident. Devika Daftardar is good as Indu. The songs in the movie are good too with powerful lyrics. One of the very good scenes was with Indu, who is always dominating Shibu, has some emotional needs, she wants Shibu to open up and say something, which Shibu fails to understand.

In short a very good movie and do write your comments about Movie and review.



Cast
  • Devika Daftardar देविका दफ्तरदार
  • Mukta Barve मुक्ता बर्वे
  • Ravindra Mankani रवींद्र मंकणी
  • Madhu Kambikar मधु कांबीकर
  • Vandana Gupte वंदना गुप्ते
  • Sudhir Moghe सुधीर मोघेSearch Amazon.com for savar re
Direction
  • Gajendra Ahire गजेंद्र अहिरे


Link to watch online

Savar Re song

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा