Pages

मंगळवार, सप्टेंबर २१, २०१०

फॉरेनची पाटलीण (Forenchi Patlin)

तात्या उर्फ बळवंतराव पाटील हे तांदुळवाडी नावाच्या एका छोट्याश्या मागासलेल्या खेड्यातील एक सरपंच. भारतात असलेल्या सगळ्याच खेड्यासारखे हे एक गाव, जिथे, बस येते पण रस्ते खराब, गावात पोस्त मास्तर येतो पण पोस्त ऑफिस दुसऱ्या गावात. अश्या या गावातील तात्या मात्र खूप पुरोगामी विचाराचे. ह्यांनी आपल्या मुलाला शिकायला इंग्लंड मध्ये पाठवलेले असते. यांची बायको गोदाक्का खूप कर्तबगार, आणि कष्टाळू. या जोडप्याला तीन मुले. राम, प्रकाश आणि पुष्पा. पुष्पा कॉलेज मध्ये जाणारी, राम इंग्लंड मध्ये, प्रकाश गावातच शिकत असतो. गोदाक्काला प्रत्येक वाक्यागणिक सारख्या म्हणी म्हणण्याची सवय असते आणि गोदाक्का सारखीच बडबड करीत असते.



गोदाक्काचे एक स्वप्न असते, की राम शिकून परत आल्यावर त्याचे लग्न करून द्यायचे आणि अशी सून घरात करून आणायची जी घरातील सगळी कामे करील. म्हणजे गोदाक्काला आराम करता येईल आणि चांगलीच सासुगिरी करता येईल. त्यासाठी गोदाक्काने एक मुलगी पण पसंत केलेली असते. पण नियतीच्या मनात काही वेगळेच असते. राम इंग्लंड परत येताना, पसंत केलेली जेनिफर नावाची एक इंग्लिश मुलगी घेऊन येतो. गोदाक्का अगदीच हादरून जाते, तिला जेनिफर अजिबात पसंत नसते, पण तात्या आणि पक्या दोघे जण गोदाक्काची समजूत काढतात आणि गोदाक्का रामला जेनिफरशी लग्न करायला परवानगी देते. अश्या तर्हेने जेनिफरची जानकी पाटील होते.



जानकी लग्न झाल्यावर इथल्या सगळ्या चालीरीती शिकण्याचा खूप मनोमन प्रयत्न करते. तिला इथल्या बऱ्याच गोष्टी जमत नाहीत, पण तरीही तिला त्या सगळ्या गोष्टी खूप छान वाटतात. तिला इथल्या सगळ्या गोष्टी समजावून सांगायला पक्याची खूप मदत. पक्या तिला सगळे गाव, तेथील वेगवेगळ्या जागा, पद्धती दाखवतो, बऱ्याच गोष्टी समजावून सांगतो. पक्याला मराठी येत असते व मोडके तोडके इंग्लिश. जानकीला अजिबातच मराठी येत नसते, पक्याच्या मदतीने जानकी मराठी देखील शिकते.

पण गोदाक्काच्या मनात असतात तशी कामे जानकीला जमत नाहीत आणि गोदाक्काला खूप मदत होत नाही असे गोदाक्काला वाटू लागते आधीच मनाविरुध्ध सून म्हणून घरात आली आणि आता हिला इथल्या पद्धतीने काही नीट जमत नाही असे बघून गोदाक्का हिचा द्वेष करू लागते.



काही कामानिमित्त्य घरातील सगळे लोक गावाला जातात. याच संधीचा फायदा घेऊन जानकी-राम घरातील सगळ्या गोष्टी बदलते, घरात फ्रीज, टीव्ही आणते. घरात काम करायला एक रोबोट पण तयार करते. घरात खूप सुखसोयी करते. गोदाक्काला हे सगळे बघून मनातून छान तर वाटते, पण ती मान्य करीत नाही. थोड्या दिवसाने सगळ्या लोकांना या सुखसोयींची सवय होते आणि सगळे जानकीला शाबासकी देतात. हे काही गोदाक्काला बघवत नाही. काहीतरी कारण काढून गोदाक्का, जानकीला घराबाहेर काढते.



जानकी पण खूप हिम्मतवान असते, त्यात रामची तिला साथ असते. त्यामुळे हे दोघे घर सोडून बाहेर पडतात. तात्या पाटलांना हे काही आवडत नाही, पण बायकोपुढे त्यांचे काही चालत नाही. जानकी घराबाहेर पडल्यावर गावात सुधारणा करण्याचे मनावर घेते. जानकी तिच्या मनसुब्यात यशस्वी होते का , गोदाक्काच्या मनातील जानकीबद्दलचा राग जातो का बघा "फॉरेनची पाटलीन" मध्ये.



सिनेमा विनोदी आहे. पक्या आणि जानकी मधील संवाद खूप मजेशीर आहेत, एकुणातच संवाद चांगले लिहिले आहेत. सिनेमाचे कथानक जरी अगदीच साधे किंवा सामान्य असले, तरी विनोदाच्या जोरावर हा सिनेमा चांगला वाटतो. सिनेमा बघताना उगाच बघितला असे अजिबात वाटत नाही. सगळ्या कुटुंबाला घेऊन बघावा असा सिनेमा आहे. सगळ्यात प्रथम बिलियाना रेडोनीच हि मराठी सिनेमातील पहिली विदेशी नायिका ठरली आहे. काही काही ठिकाणी खूपच शुद्ध मराठी बोलतात आणि कुठे कुठे उगाचच अशुद्ध, ते फक्त खटकले. जानकीने घेतलेला उखाणा खूप मजेशीर आहे. "इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचे कव्हर, रामरावांचे नाव घेते, मी त्यांची लव्हर".

तुम्ही हा सिनेमा बघितला असल्यास, तुमच्या प्रतिक्रिया जरूर लिहा.



Tatya alias Balwantrao Patil is Patil of a small village called Tandulwadi. Whole village respects him well. His wife is Godavari, but everyone calls her Godakka. They have three children, Ram, Prakash and Pushpa. Tatya is a very progressive farmer and sends his son Ram to Europe for further studies.

Godakka dreams of spending time leisurely, once Ram returns and she finds a good bride for him. She is shocked when Ram returns from England with Jenifer and tells them his intentions of marrying her. Godakka is really upset with this plan and scolds and shouts. Tatya manages to control her and finally all agree for the marriage. Very soon Jenifer becomes "Janaki Patil".



Jenifer is trying to learn the culture and customs. She is finding most of the things in the Indian village challenging but interesting. Prakash or Pakya is helping her learn things and takes her around the village to sight seeing. She is fascinated and excited about most of the things. But not used to the chores a daughter in law is supposed perform in such village house. Godakka is unhappy that her dreams of sitting at leisure are not coming true on the other hand Janaki is enjoying life and Godakka had to still slog. Slowly Godakka started hating her, tries to show her inferior.



Taking advantage of the situation that all except Ram of are out of station for a couple of days, Janaki makes improvements in the house. She modifies the interiors, get television and refrigerator. She also makes up and robot to help in household jobs. Gets a milking machine too. Godakka like all these from within, but she just shows off her discomfort. Very soon, all get used to all the new gadgets and facilities and started enjoying it and relying on it. Janaki get all the praise for this, and this upsets Godakka more. Finally Godakka manages a pick a reason and makes sure Janaki and Ram are thrown out of the house and sent to farm house to stay on their own.



Janaki is relay brave lady and with Ram's support she starts staying in the farm house. Both work really hard to make each other happy. Tatya Patil is unhappy with all these but he has to keep quite in front of his wife Godakka. Janaki starts helping voillagaers and does lot of social work. FInally is she able to win he mother in law's heart and gets back to her home or not needs to watched in the movie "Foreighchi Patlin"



This is a very good comedy. Specially some of the dialogues between Pakya and Janaki are too good. The storyline does not really have anything so special, but the movie in general is great entertainment. This is complete family entertainment. Biljana Radonic from Croatia has acted well and it was for the first time that a western actress, was casted in the lead role in Marathi cinema.

Do write your comments on this review and the movie in comments section.



Cast
  • Vinay Aapte विनय आपटे
  • Surekha Kudachi - Udale सुरेखा कुडची - उदाळे
  • Biliana Radonich बिलियाना राडोनीच
  • Girish Pardeshi गिरीश परदेशी
  • Tejswini Pandit तेजस्विनी पंडित
  • Sanjay Mohite संजय मोहिते
  • Dr. Sharad Bhutadiya डॉ. शरद भुताडिया

Director
  • Pradip Ghonasikar प्रदीप घोनसिकर


Link to watch online 

Marathi DVD 

५ टिप्पण्या:

  1. झी सिनेमावर बऱ्याच वेळा दाखविला जातो,सिनेमा तसा चांगला होता पण त्याची हाताळणी बऱ्याच प्रसंगात फारच बाळबोध झाली आहे असे मात्र राहून राहून वाटत रहाते आणि शहरी प्रेक्षकाला त्या मुळे थोडे अस्वस्थ व्हायला होते.विनय आपटे ह्यांनी त्यांच्या परीने ग्रामीण बाप उभा करायचा खूप चांगला प्रयत्न केला आहे पण शहरी प्रेक्षकांना त्यांच्या 'आपटे'असण्याची आठवण मात्र प्रयत्न पूर्वक विसरावी लागते.सुरेखा कुडची ह्यांना चित्रपटात असलेले नि दिले गेलेले महत्व पाहता "फॉरेनच्या पाटलीणीची सासू " हे नाव सुद्धा द्यायला काहीच हरकत नव्हती.

    उत्तर द्याहटवा
  2. तुमचे म्हणणे अगदी पटतंय. बऱ्याच ठिकाणी सिनेमा खटकतो. आणि नावाबद्दल म्हणाल तर शंभर टक्के खरे आहे. पण परदेशी कलाकार नायिका म्हणून प्रथम घेतल्याने त्यांनी नावात ते दाखवण्याचा प्रयत्न केला आहे असे वाटते. किंवा "पाटलीणीची फॉरेनची सून" हे नाव देखील चालले असते.

    उत्तर द्याहटवा
  3. नारायणी बर्वेजी,
    आपले परीक्षण मी नियमित आपले ब्लॉगला भेट देऊन वाचत असतो.आपल्या परीक्षणाचा मी चाहता असावयाचे कारण म्हणजे ते परीक्षका ऐवजी "प्रेक्षकाच्या" नजरेतून असते,त्यात निखळ प्रामाणिक पणा असतो ते मनाला जास्त भावते.
    सिनेमाचे दुसरे नाव मात्र छान आहे.
    धन्यवाद.

    उत्तर द्याहटवा
  4. तसं पाहीलं तर सिनेमा निश्चितच चांगला झालाय.बिलीयाना परदेशी असुन सुद्धा मराठी सिनेमात झकास काम केले आहे.

    उत्तर द्याहटवा