Pages

मंगळवार, ऑगस्ट २४, २०१०

नवरा माझा नवसाचा (Navra maza navsacha)




भक्ती आणि वक्रतुंड यांचे एकमेकांवर खूप प्रेम असते. वक्रतुंड चांगला कलाकार असतो. भक्ती आणि वक्रतुंड यांचे एकमेकांवर खूप प्रेम असते. वक्रतुंड चांगला पेंटर / कलाकार असतो. भक्ती टेलिफोन ऑपरेटर असते. या दोघांचे लग्न भक्तीच्या आई वडिलांच्या इच्छेविरुध्ध झालेले असते. वक्रतुण्डाचे आई-वडिलांचे छात्र त्याच्या लहानपणीच हरवलेले असते. वक्रतुंड उर्फ वॅकी जरी खुप चांगला आर्टीस्ट असला, तरी त्याला म्हणावे तसे यश मिळालेले नसते, त्यामुळे घरात पैश्यांची तशी चणचणच असते. लग्न होऊन १० वर्ष झालेली असून देखील ह्यांना मुल झालेले नसते. आणि जोवर सेटल होत नाही तोवर मुल होऊ द्यायचे नाही असे वाकीने ठरवलेले असते.

भक्ती, नावाप्रमाणेच देवावर भक्ती करणारी असते. खूप देवभोळी असते, त्यामुळे ती सारखी देवळात जाऊन नवस बोलत असते. पण तिचा कुठलाही नवस पूर्ण होतच नाही. असेच एक दिवस भक्ती देवळातून दर्शन घेऊन परत येताना तिला वक्रतुंडाची आत्या भेटते. आत्याला घरी घेऊन येते आणि मग तिला समजते, कि वकी हा नवसाने झालेला मुलगा आहे. वॅकीच्या वडिलांनी, मुल जगात नाहीत म्हणून गणपतीपुळ्याच्या गणपतीला नवस बोलला असतो, कि जर हे मुल जगले तर त्याला "नागडा" करून तुझे दर्शन घेईन. त्यातून दुर्दैव असे कि नवस फेडण्याआधीच आई-वडील स्वर्गवासी झालेले असतात. त्यामुळे फेडल्या न गेल्याने वकीला म्हणावे तसे यश मिळत नाहीये. पण हा नवस फेडणे जरा कठीण असते, कारण नवसच तसा कठीण असतो. बर आता हा नवस कसा फेडावा याच्या विचारात भक्ती असते. ती वॅकीला सांगते कि तुला हा नवस फेडावा लागेल तरच तुला यश मिळेल. पण असा विचित्र नवस फेडणार तरी कसा, वॅकी त्याला सरळ नकार देतो.



आता नवस फेडता येणार नसल्याने, भक्ती उदास व त्याचबरोबर वॅकी वर चिडलेली असते. वॅकीला त्याचा खूप जवळचा मित्र किशोर भेटतो. तो त्याला सल्ला देतो कि आपण एका बाबाकडे जाऊ, तो तुला यावर उपाय सांगेल. आणि हा साधू बाबा किशोरचा एक मित्र असतो, जो वेश बदलून साधू बाबा बनतो. या ढोंगी साधुबाबाच्या सल्ल्यानुसार एक पुतळा करून देवळात न्यायचा आणि त्याचे कपडे काढायचे म्हणजे नवस पूर्ण होईल. हा पुतळा गुप्ततेने न्यायला हरकत नाही. पण फक्त चारचौघातून न नेता सगळ्या लोकांसामोरून, गुप्ततेने न्यायचा अशी अट घालतो.



आता हा पुतळा कसा नेणार, असा प्रश्न या दोघांना पडतो. त्यात किशोर असे सुचवतो, कि पुतळा आदल्या दिवशीच गणपतीपुळ्याच्या गाडीत नेवून ठेवायचा आणि मग दुसऱ्या दिवशी तीच बस पकडून पुढे जायचे. आता यांचे असे दुर्दैव असते, कि नेमकी तीच बस दुरुस्ती साठी जाते, आणि त्या बस च्या बदल्यात दुसरी बस पाठवण्याचे ठरते. पण दुसरी बस येण्याच्या आधीच हि बस दुरुस्त होऊन येते व या दोघांचा जीव भांड्यात पडतो. आणि मग भक्ती आणि वॅकीचा गणपतीपुळ्याचा प्रवास सुरु होतो. त्याच प्रवासाबरोबर सुरु होते मस्त धमाल. हि धमाल तुम्ही सिनेमा बघून अनुभवण्यासारखी आहे. शेवटी वॅकी नवस फेडू शकतो का ? तो खरच विवस्त्र होतो कि पुतळ्याला विवस्त्र करून नवस फेडल्या जातो.. हे बघा "नवरा माझा नवसाचा" मध्ये.



सिनेमा खूपच धमाल विनोदी आहे. निर्मिती सावंत अगदी थोड्या मिनिटासाठी येते, पण खूप छान विनोद करून जाते. अशोक सराफचा लालू तर मस्तच. बस मधील सगळी लोक, त्यांच्यातील विनोद सगळे सगळे उत्तम. सचिन आणि सुप्रिया हे दोघेही मस्तच आहेत. दोघांच्या भूमिका, त्यांचे एकमेकांबरोबर असलेले ट्युनिंग खूपच छान आहे. अगदी "नवस फेडणे" हा जरी वादाचा किंवा श्रद्धेचा मुद्दा असला तरी, मनापासून, खळखळुन हसायचे असेल तर सिनेमा जरून बघा. अगदी लहानथोर सगळ्यांनी एकत्र बघण्यासारखा सिनेमा नक्कीच आहे.

सिनेमात सोनू निगम व त्याचे गाणे जरी उगीचच घातले आहे असे वाटत असले, तरी गाणं श्रवणीय असल्याने, हे गाणं उगीच आहे याकडे दुर्लक्ष करू शकतो. तुमच्या प्रतिक्रिया जरून लिहा.



Bhakti and Vaky (Vakratunda) are a very happy couple. They love each other very much. Vaky is a good artist, and Bhakti works as a telephone operator. They have married against the wish of Bhakti's parents and so parents have snapped ties with Bhakti. Vaky's has lost his parents in the childhood itself. Though Vaky is a good artist, he is still not established himself. Since the home is run by Bhakti alone, they are always short of money. Vaky is clear in his mind that they are not ready to raise children, till he establishes himself.



Bhakti is very much devotee of gods. She is always committing Navas to different gods, but none of her wishes are coming true. Once by chance while returning from a temple she meets Vaky's aunt, and she narrates the story behind Vaky's birth and why he got his name. None of Vaky's siblings were surviving, so his dad commits a Navas that he will get his child naked to the temple if it survives, and unfortunately after Vaky's birth, before his father could take him to temple, he passed away. The Navas is not fulfilled. Bhakti decided to fulfill this Navas and tried convincing Vaky to do all that is required. Hearing this strange requirement, Vaky flatly refuses it.


Bhakti is sad thinking till Navas is fulfilled, their life is not going to be happy and Vaky is angry over the request. Vaky's friend Kishore suggests a way out. They decide to make one of Kishor's friend a "Baba" and convince Bhakti. So finally they convince her that the way out of this situation is to carry a real size statue to the temple and remove its cloths there. It should be carried with public transport, though it might be hidden somewhere.


They get the statue made and hide it in the bus which is supposed to go to Ganpatipule the next day. There are some tense moments like the bus does not start the next morning and is sent to garage, a replacement bus is sent, but before the replacement bus could start the journey, the original bus comes. Most interesting part of the movie is the travel to Ganpatipule with the hidden statue and the interesting co passengers they have with them. The climax of whether the Navas is fulfilled or not needs to be watched in the movie "Navara maza Navasacha".


Ashok Saraf is bus conductor named Lalu and the Driver is called Prasad. Nirmiti Saswant is good as guest artist. Sachin and Supriya and very good as always. Short appearance of Sonu Nigam and song is pleasant surprise in Marathi movie. A must watch and with whole family.

Do share your thought and comments on movie and this review.



Cast


Direction


Link to watch online


 

Marathi DVD

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा