Pages

बुधवार, मे ०५, २०१०

पिकनिक (Picnic)

अनुराग, तन्मय, ईशा आणि अनिकेत हे चौघे मित्र. ईशा, अनुराग आणि तन्मय हे लहानपणापासूनचे मित्र, तर अनिकेत यांचा काँलेजमधला मित्र. ईशा एकदम टाँमबाँय आणि अधिकार वाणीने बोलणारी. तसाच अनुराग पण खूप अहंकारी आणि ईशावर टोकाचे प्रेम करणारा. तन्मय हा नेहमी अनुराग आणि ईशा मधील भांडणे सोडवत असतो, अनुराग आणि ईशाला समजावून एकत्र ठेवण्याचे काम तन्मय करत असतो. अनुरागला ईशा खूप आवडत असते, पण ईशाला अनुराग हा फक्त मित्र म्हणून ठीक वाटतो, त्याच्या पलीकडे काही नाही. अनिकेत भेटल्यावर ईशाला अनिकेत आवडू लागतो ते दोघे लग्न करण्याचा निर्णय घेतात. या दोघांचा साखरपुडा देखील झालेला असतो. अनुरागला याचा खूप राग येतो, पण तन्मय या दोघांचे भांडण पुन्हा सोडवतो, अनुरागला समजावतो. आता अनुराग असे ठरवतो, कि ईशाचे लग्न ठरलंय, आता आपले इथे काहीच नाही, तर भारत सोडून कायमचे नायजेरिया मध्ये वडिलांकडे जावे. पण जाण्यापूर्वी सगळ्या मित्रांना एकदा मस्त पार्टी द्यावी असे याच्या मनात येते, त्यासाठी सगळ्यांना एका मस्त सरप्राइस पिकनिकला न्यायचे ठरवतो.
पिकनिकची जागा फक्त तन्मयने खूप पूर्वी बघितलेली असते. अगदी एकाट जागी अनुरागच्या वडिलांनी एक मोठे घर बांधले असते. तिथे अनुराग या सगळ्यांना नेतो. सगळ्यांनी दारू प्यायची असे ठरवून दारू प्यायला बसतात, नाच करतात, आणि अनुराग दारू पिता ती इतरांच्या नकळत फेकून देत असतो. शेवटी, तो तन्मयला खूप दारू पाजून, त्यात काही औषध घालून बेशुध्ध करतो. आणि अनिकेतला हाँकी स्टीकने डोक्यावर मारतो. मग ईशाला लक्षात येते कि अनुरागने त्यांना इथे का आणले आहे. पण ईशा घाबरेल अशी मुलगी नसते. ती खूप हिमतीने या प्रसंगाला तोंड देते. पण शेवटी हे दोघे बेश्शुध, आणि ईशा एकटी, तिचा अनुराग पुढे कसा निभाव लागणार. शेवटी नक्की काय होते, अनुराग या तिघांना मारतो का ? अनुराग चा बदला सफल होतो का बघा "पिकनिक" मध्ये.
सिनेमात फक्त कलाकार आहेत. त्यातील पाचवा कलाकार तर अगदी - मिनिट असतो. आणि त्याला तसे म्हटले तर काहीच रोल नाहीये. सिनेमा या कलाकारांभोवती फिरतो. सुरवातीला मिनिट तर सिनेमात फक्त हे लोक कसे पिकनिकला जात आहेत हेच दाखवले आहे. नुसता रस्ता आणि यांची बाईक. बर त्यात तरी वेगवेगळे शॉट दाखवावे ,पण नाही.. तोच शॉट परत परत दाखवून सिनेमा कसा असेल याची जाणीव दिग्दर्शक आपल्याला आधीच देतो. पण तरीही या जाणिवेकडे दुर्लक्ष करून मी हा सिनेमा बघितला. सुरवातीला तर काही वेळ हा सिनेमा मराठी आहे का हिंदी अशीच शंका येते. कारण सगळ्यांचे संवाद हिंदीत शिवाय गाणं पण हिंदी मध्ये. या सिनेमात नक्की काय दाखवण्याचा प्रयत्न होता याचा विचार करून डोक्याचा भुगा झाला. सिनेमा "मजेशीर थरारपट" म्हणावा लागेल. इतका वाईट सिनेमा मी अजून तरी पर्यंत बघितला नाही. सिनेमा अजिबात बघू नये. एकाद्या सिनेमाची स्टोरी कशी लिहू नये हे बघायचे असेल तर सिनेमा जरूर बघावा. सिनेमा लहानमुलांना बरोबर घेऊन बघण्यासारखा निश्चित नाही.

हे परीक्षण वाचून जर तुम्ही सिनेमा बघितला, तर इथे तुमच्या प्रतिक्रिया जरूर लिहा.
Picnic as the name suggests is a story of a picnic of four friends Anurag, Tanmay, Ishaa and Aniket. Out of these Anurag, Tanmay and Ishaa are friends from school days, and Aniket joins them in college. Anurag is macho and strong headed. With that he is also commanding and possessive. Isha is bold and frank. She has an independent character, kind of self sufficient. Tanmay is a mild guy, who always plays a middleman to solve the conflicts between Ishaa and Anurag. Aniket is also nice guy.

Anurag loves Ishaa very much, but as per his nature, he is over possessive about her. Ishaa prefers Aniket because he is not as commanding and possessive as Anurag and Ishaa enjoys the freedom she needs.

Anurag decides to go to Nigeria to join his dad’s business on completing college. In the meantime Aniket and Ishaa are formally engaged. Aunrag wants to throw in a farewell party before he leaves, since he is not sure how soon he will be back. They decide to go to Anurag’s farm house which is at a remote location. Several kilometers off a highway, there are hardly any vehicles seen and is totally secluded. They stop by a small roadside shop and enjoy some tea. There the shopkeeper mentions Anurag’s trip just the previous week for couple of days. Tanmay points out that Anurag told him that he is going to Chennai and came to farmhouse. But Anurag shrugs it off and changes the topic.

On reaching the farm house, Anurag gets some very good liquor and they all start dancing to the music and enjoying. He mentions that the champagne is non alcoholic so Ishaa can enjoy it too. Tanmay is a avid fan of liquors and starts getting drunk very soon. Anurag is tactfully avoiding drinking. As soon as he is sure that Tanmay is drunk, he hits Aniket with hockey stick on his head and he gets unconscious. At that point Ishaa realizes that Anurag has plotted an revenge on them all for her deciding to marry Aniket.

It needs to be watched if brave Ishaa manages to escape, who helps her and the remaining part of the story. In general the movie does not stand the expectations. It appears a very low budget movie, with very short story being tried to stretch to a movie length. Initially too much of Hindi including a song, makes one think, what language movie is it. Santosh Juwekar, Rahul Mehendale and Sai Tamhankar have played decent roles, but the direction is not up to the mark of recent Marathi cinemas. So watch it on your own risk if you are hard core fan of thriller movies and have high level of tolerance.


Cast
  • Santosh Juvekar संतोष जुवेकर
  • Sushant Shelar सुशांत शेलार
  • Sai Tamhankar सई ताम्हणकर
  • Rahul Mehendale राहुल मेहंदळे
  • Ajay Tamhane अजय ताम्हणे

Direction
  • Girish Mohite गिरीश मोहिते

Link to watch online

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा