Pages

मंगळवार, फेब्रुवारी ०९, २०१०

मी नाही हो त्यातला (Mi nahi ho tyatla)

राघव आणि प्रसाद हे अगदी भिन्न स्वभावाचे दोघे मित्र एका बँकेत मध्ये नोकरी करत असतात. राघव अगदी मनापासून काम करणारा नाकासमोर बघून चालणारा साधा सरळ मनुष्य तर प्रसाद दारू, बायका, नाच गाणी यात रमलेला. प्रसादच्या आई वडिलांनी मृत्युपत्रात असे लिहिलेले असते, कि जोवर प्रसाद लग्न करणार नाही तोवर त्याला सगळी मालमत्ता मिळणार नाही. काही ठराविक रक्कम दर महिन्याला वापरायला मिळेल. आता बँकेचा पगार, त्यात वडिलोपार्जित संपत्ती एकटा सडा फटिंग यामुळे प्रसादकडे बायकांवर उडवायला भरपूर पैसे असतात.



राघवचे लग्न झालेले असते, त्याला काही मुलबाळ नसते. अनु, राघवची बायको, खूपच चांगली असते. दोघांचे एकमेकांवर प्रेम विश्वास असतो. नवनवीन तरुणी राघवच्या घरी पाठवून प्रसाद त्याच्या फिरक्या घेत असतो. अनुच्या काकूंची तब्येत अचानक बिघडते, त्यामुळे अनु गावी जाते. राघव एकटाच आहे हे बघून प्रसाद त्याची फिरकी घ्यायला एका मुलीला राघवच्या घरी पाठवतो.



राघव कसाबसा त्या मुलीपासून सुटका करून घेतो, सैपाकघरात जाऊन काही खायला घेऊन येतो असे म्हणून आत जातो बाहेर येऊन बघतो तर ती मुलगी मेलेली असते. राघव चक्रावून जातो आणि घाबरून प्रसादला फोन करतो. प्रसादला जेव्हा हे कळते तेव्हा तो पण घाबरतो. दोघे असे ठरवतात कि आता या प्रेताला फेकून द्यायचे म्हणजे पोलिसांना कळणार नाही. पण हा आनंद काही फार वेळ टिकत नाही.



पोलीस राघवच्या घरात येतात आणि पोलिसांच्या चौकशीत असे आढळते कि राघवनेच खून केलेला आहे. राघव खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो, कि मी आजवर एक झुरळ देखील मारले नाहीये, तर मी कसा एका जिवंत मुलीला मारू. पण तरी पोलीस म्हणतात कि तू पुरावा दे. आणि सगळे पुरावे राघवच्या विरुद्ध असतात. शेवटी सिनेमात नक्की काय होते, राघव खुनाच्या आरोपातून मुक्त होतो का, त्याच्यापुढे नक्की काय पर्याय असतात, आणि शेवटी खरा खुनी सापडतो का हे बघा "मी नाही हो त्यातला" मध्ये.



सिनेमा बघावाच असा अजिबात नाहीये. सुरवातीला विनोदी वाटणारा सिनेमा एकदम "Serious" वळण घेतो. इन्स्पेक्टरचे काम करणारा अभिनेता अगदीच तद्दन काम करतो. एकूण त्याची वेशभूषा वगेरे अजिबात जमलेली नाहीये. सिनेमातील गाणी एकदमच कंटाळवाणी आहेत. एकूण सिनेमा कंटाळवाणा आहे. अशोक सराफ त्यातला त्यात सुसह्य भूमिका करतो. प्रसाद ओक त्याच्या भूमिकेत ठीक आहे. हा सिनेमा तुम्हाला अशोक सराफ आवडत असेल तरच बघा, नाहीतर उगीचच तास वाया गेले असे वाटेल.




This movie is comedy in the first half and a thriller in the second. A story of two very close friends Raghav and Prasad. They are both of opposite nature, bur true friends. Raghav is typical God fearing, happily married through gentleman and Prasad is a bachelor with interests like Drinking, Night clubs, affairs a typical playboy. Both are working in a bank. Prasad always manages to impress boss and pass on most of the work to Raghav and freak out with girls. On the other hand, Raghav is very good at work, sincere and of helping nature. Prasad's parents have mentioned in there Will, he will get only a monthly stipend from their property till he is batchlor and would get all the money on his marriage.



With Bank salary and the stipend, for a single person, he always has lot of money to spend in Night Clubs. But still he is short of money because of his spending nature. He always tries to convince Raghav to join him in the clubs, but Raghav never agrees. Once Raghav's wife Anu gets a call that her Aunt is hospitalized, so she rushes to her town. Prasad hires a girl to go and tease Raghav that night. Raghav manages to make her wait in the hall, on a pretext of gettiong something to eat for her fro kitchen. When he returns from kitches, the girl is lying dead on his sofa.



Getting terribly scared, he calls Prasad for help. On arrival, Prasad suggests that they should dispose the body immediately by dropping it off a cliff. With a lot of caution they manage to do that and Prasad returns home. Early next morning police raid Raghav's house to arrest him for the girl's murder. They have found his address in the pocket of the girl. Raghav agrees that he tried disposing the body but denies the charge of murder. Lot of interesting twists and turns in the movie plot.




In general the movie is moderate, definitely not a must watch. I would say you dare to watch, only if you are Ashok Saraf fan. Some of the characters are too week in the movie except the main three Raghav, Prasad and Raghav's wife. One positive is plot is bit different and not run of the mill.



Cast
  • Ashok Saraf अशोक सराफ
  • Prasad Oak प्रसाद ओंक
  • Kalpana Sathe कल्पना साठे
  • Sachin Suvarna सचिन सुवर्णा
  • Priyal Patil प्रियल पाटील
  • Prasad Pandit प्रसाद पंडित
  • Sanjay Belose संजय बेलोसे
  • Dhananjay Mandrekar धनंजय मांद्रेकर
  • Jayant Ghate जयंत घाटे
  • Narayan Jadhav नारायण जाधव
  • Sandeep Ingale संदीप इंगळे
  • Aparna Prabhu अपर्णा प्रभू
  • Resham Merchant रेषम मर्चंट


Director
  • Jay Pujari जय पुजारी






Link to watch online

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा