Pages

गुरुवार, नोव्हेंबर १२, २००९

गोष्ट छोटी डोंगराएवढी (Goshta chhoti dongaraevadhi)



राजाराम शेतीचे शिक्षण घेऊन नोकरीच्या शोधात असतो, त्यात त्याला एका आमदाराला ३ लाख दिल्यास नोकरी मिळेल असे कळते व तो आपली जमीन विकून पैसे देण्याचा विचार करतो. पण त्याची आई त्याला तसे करू देत नाही, त्यामुळे तो गावी येऊन शेती करायची असे ठरवतो. त्याचा लंगोटीयार "नंदा" इथेच गावात असतो, एक मुलगा, घरी आई व लग्नाला आलेली बहिण असा मोठा संसार घेऊन, शेती करत असतो. कोरडवाहू जमीन असल्याने कापूसची लागवड केलीली असते, कापसाचे पैसे सरकारकडे अडकलेले असतात. विहीर खणायला देखील कर्ज काढावे लागते, आणि मग खत, बियाण्याला तर काढावेच लागते. त्यामुळे नंदा अगदीच कर्जबाजारी झालेला असतो. इकडे राजाराम स्वत शेती करायला घेतो तो पण कर्ज काढतो, पण नंदा पेक्षा त्याची परिस्थिती जरा बरी असते. कर्ज काढायला गेले, किंवा खत, बियाणे विकत घ्यायला गेले, तरी सगळीकडे भ्रष्ट्राचार बघून दोघेही खचून जातात. इकडे गावात एका NGO मधून वैदेही नावाची एक मुलगी गावातील प्रश्न आणि त्यावरील उत्तर शोधण्याचा प्रयत्न करून एक अहवाल लिहिणार असते. त्यामुळे राजाराम आणि वैदेही यांच्यामध्ये बरीच वैचारिक चर्चा होत असते. इतक्यात अतिशय कर्जबाजारी झाल्याने नंदाला काही सुचेनासे होते आणि नंदा कीटकनाशक खाऊन आत्म्यहत्या करतो. त्यानंतर गावात २-३ शेतकरी आत्म्यहत्या करतात. या सगळ्या प्रकाराने राजाराम खूप विचार करू लागतो आणि त्याला एक युक्ती सुचते. त्या प्रमाणे तो ठरवतो कि शेतकऱ्याच्या प्रश्नाला सरकार जबाबदार आहे आणि त्यासाठी सरकारला शिक्षा झालीच पाहिजे. तो शिक्षा कशी करतो आणि त्याचे पुढे काय परिणाम होतात हे बघा "गोष्ट छोटी डोंगराएवढी" मध्ये.


सिनेमामध्ये राजाराम आणि नंदा हे दोन शेतकऱ्यांचे प्रतिनिधी, त्यांचे संवाद खूप विचार करण्याजोगे आहेत. सगळीकडे जो भ्रष्टाचार माजला आहे ते बघून मनाला खरच त्रास होतो. पण त्यांनी जे दाखवले आहे ते खुपच अतिशोयक्तिचे आहे असे वाटले. शेताकर्यांचा प्रश्न खरच आहे, पण त्यात शेतकर्यांची काहीच चुक नाहीये हे मनाला पटत नाही. सरकार भ्रष्ट झाले आहे हा खरा प्रश्न आहे. मुळातून आपल्या सगळ्याच लोकांची वृत्ती भ्रष्ट झाली आहे आणि कोणालाच ती स्वत बदलायची नाहीये तर दुसरे कोणीतरी त्याला कारण आहे असे सगळ्यांना वाटते तिथेच चूक आहे असे मला वाटते.

सिनेमाचा शेवट माझ्या मते खूपच फिल्मी झाला आहे. शहरातून गावात येणारी वैदेही सिनेमामध्ये कशाला आहे असा प्रश्न पडतो. मला तरी वाटत होते कि या सिनेमात खरच काही उत्तरे दिली असतील पण तसे माझ्या मते झाले नाहीये.

एकतर्फी का होईना शेतकऱ्यांचा प्रश्न इथे मांडला आहे त्यामुळे सिनेमा जरूर बघण्यासारखा आहे. विचार करण्याजोगा आहे.

तुम्ही हा सिनेमा बघितला असल्यास किंवा बघणार असल्यास तुमच्या प्रतिक्रिया जरून लिहा.


Another good movie on Farmers problems in Marathi. Rajaram is a educated youth, looking for job. He plans to sell his farmland and pay bribe to get a job. His mother prevents him from doing that for good, as he later learns that he might get job for some time and then will be removed.

He decides to get back to farming. His fast friend Nanda is farming in the village. His family consists of old Mother, Sister, Wife and a Son. He is dreaming of marrying his sister off soon. He is waiting for his payment for cotton harvest for the government federation. The payment is always delayed.



The corruption on all levels is depicted in the movie. Nanda and Rajaram wanted to dig wells in the farm. Rajaram gets loan, since he has not taken any loan, but Nanda is rejected since his previous loan is not cleared. He is not able to pay back the loan, since his money is stuck with cotton federation. Rajaram gets loan in his hands, after a "cut" by bank officers. Once the well was ready, he needs to pay bribe for electricity connection, for which he is not left with money, since the bribe amount is unreasonably high.

Due to increasing burden of loan, Nanda commits suicide by consuming pesticides. The whole family is broken due to this incidence. The police demands bribe for even postmortem and handing over the body of dead man to the family. Few more incidences of suicides happen in the village and Rajaram decides to do something about it.

He tries working with NGO in his villages, but finally decides to take the matter in his own hands. After a lot of brainstorming, he decides to punish government for this. Interesting to see how he does it. The end of the movie is "masala". But still the movie is worth watching.


Cast

Director



Wikipedia link

Link to Watch online

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा