Pages

शुक्रवार, ऑगस्ट २१, २००९

शेवरी (Shevari)


विद्या आणि माया दोघीजणी एका खोलीत राहत असतात. माया एकदम आधुनिक तर विद्या एकदम घरगुती मध्यमवर्गीय मध्यमवयीन स्त्री. विद्याला नवऱ्याने सोडून दिलेले असते. त्यामुळे ती होस्टेल मध्ये राहत असते. माया आणि विद्याचे असे ठरलेले असते कि दर शनिवारी रात्री विद्याने दुसरीकडे राहायचे कारण मायाचे मित्र येत असतात.

एक दिवस विद्या ऑफिसमधून घरी येते आणि अचानक, तिला माया सांगते कि आज काहीहि कर पण प्लीज घरात राहू नकोस. रागारागात विद्या बाहेर पडते तिला वाटते कि आत्याकडे जावे, पण तिची आत्या नवऱ्याने सोडून दिले याबद्दल इतके बोलते कि विद्याला तिथे राहणे नकोसे होते ती तिथून परत फिरते. आणि मग रस्त्यावरून फिरताना तिला तिच्या जीवनात घडलेल्या सगळ्या घटना डोळ्यापुढे येतात. नवरा सुधीर, मला तुझा कंटाळा आला आहे असे सांगून सोडून देतो. मुलाला आईकडे नाशिकला ठेवले असते. त्यामुळे दर शनिवारी विद्या नाशिकला जाते. वहिनी आणि भावाला तिचे दर शनिवारी येणे आवडत नाही. पण ते तिला तसे स्पष्टपणे सांगू शकत नाहीत. वयात येणारा मुलगा आईचे अति जास्त प्रेम सहन करू शकत नाही. तसे विद्याला एका प्रसंगातून जाणवते आणि ती अगदीच कोलमडून पडते.

ऑफिसमध्ये तिचा बॉस तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतो. एक आधार म्हणजे शिंदे. तो तिचा ऑफिसमधील सहकारी असतो. लग्न झालेला, पण तरीही त्याला विद्या आवडत असते. तो देखील त्याच्या जीवनाला कंटाळलेला असतो, आणि तो विद्या मध्ये एका मैत्रिणीचे रूप बघत असतो. या दोघांची मैत्री आणि विद्याचे शिंदे बद्दलचे मत, एकदम मस्त, बघण्यासारखे आहे.

सिनेमा चांगला आहे. नवऱ्याने टाकून दिल्याने अगतिक झालेली विद्या, परिस्थितीने गांजलेली विद्या, आधुनिक व्हावे कि आपल्या जुन्याच संस्कारामध्ये गुंतून पडावे या मध्ये गोंधळलेली विद्या अश्या अनेक भावछटा दाखवणारी विद्या खूपच सुंदर. नीना कुलकर्णीचे काम खूपच सुंदर. दिलीप प्रभावळकर शिंदेच्या भूमिकेत खूपच मस्त. रवींद्र मंकणी सुधीरच्या भूमिकेत मस्त. उत्तर बावकरने विद्याच्या आईचे काम छान केले आहे. सिनेमा एकदा बघावा इतका चांगला नक्कीच आहे. संपूर्ण सिनेमा फ्लँशबँक मध्ये आहे. पण फ्लँशबँकचा खूपच सुंदर उपयोग केला आहे.
Vidya and Maya are roommates in mumbai. Arrangement between them is that Vidya will not stay in room on Saturdays, as Maya's boyfriends visit her. One day unexpectedly Maya tells her to stay outside for a night. Vidya is unhappy with the situation, leaves the house and walks on the streets.

While walking she sees different things, meets few people and remembers her life story as a flashback. Vidya's husband Sudheer has left her without giving any reason. They have a teenage boy, Ashish, who is upset because of his parents separation. Vidya leaves her husband house, leaves Ashish with her mother in Nasik.

Her boss in office, tries to seduce her. She has a colleague Shinde, who helps her in many situations. She is unclear about his motive, goes to his house one day. And is surprised by the conservation and the situation she was in.

A very good movie. A fustrated, irritated and helpless Vidya, is acted very well by Nina Kulkarni. Character "Shinde" is played by Dilip Praphavalkar. All the character and their acting are very good. This movie has won the award for the innovative and intelligent cinema technique of flashback.
Cast
  • Nina Kulkarni नीना कुलकर्णी
  • Ravindra Mankani रवींद्र मंकणी
  • Dilip Prabhavalkar दिलीप प्रभावळकर
  • Mohan Agashe मोहन आगाशे
  • Meeta Vasishta मीता वसिष्ट
  • Uttara Bavkar उत्तरा बावकर
  • Shiwaji Satam शिवाजी साटम

Director
  • Gajendra Ahire गजेंद्र अहिरे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा