Pages

मंगळवार, जून ३०, २००९

ख़बरदार (Khabardar)



"खबरदार" नावाच्या एका वृत्तपत्रात "भरत एक महत्वाचा पत्रकार म्हणून नोकरी करत असतो. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे सगळ्या बातम्यांची खबर त्याला इतर लोकांच्या आधीच मिळते कारण त्याचे खबरे सगळीकडे पसरलेले असतात. गौरी शारन्गपुरे ही खबरदारची मालकीण असते, तिला भरत बद्दल पूर्णपणे खात्री असते. पण उगाच मालकीण असल्याचा तोरा दाखवायचा म्हणून ती उगाचच भारतवर डाफरत असते. याचा भरतला कंटाळा येतो आणि तो गौरी शारन्गपुरे ला धडा शिकवायचा म्हणून नोकरीवरून राजीनामा देतो.

त्याच गावात अण्णा चीमोरे म्हणून एक प्रख्यात गुंड असतो. अचानक भारतला त्याच्या पळून जाण्याच्या प्लानबद्दल खबर मिळते. या सनसनाटी खबरेबद्दल खबरदारला कळते आणि मग सुरु होते धमाल. भरतचा, मारुती कांबळे नावाचा एक मित्र असतो तो कसा या अण्णा चीमोरे च्या बातमीत गोवला जातो, त्याला भरत कशी मदत करतो, गौरी कशी या सगळ्या बातमीचा आपल्या वृत्तपत्राला फायदा होईल याची चिंता करते आणि त्यासाठी कसे वाटेल ते प्रयत्न करते हे बघा "खबरदार" मध्ये.

सिनेमा एकदमच रेफ्रेशिंग आहे. मजेशीर सिनेमा आहे. त्यातील विनोद निखळ आनंद देऊन जातात. मकरंद अनासपुरे एका राजकारण्याच्या भूमिकेत आहे, त्याच्या भूमिकेतील विनोद पण बघण्यासारखा आहे. निर्मिती सावंत तर अफलातून. ती सगळ्याच भूमिकेचे चीज करते. विनोदी सिनेमा आवडत असल्यास अगदी जरून बघा.



Bharat (Bharat Jadhav)is a key journalist with the daily "Khabardar", which is always super-fast newspaper to publish most of the news, specially thrilling ones. Gauri Shrungarpure (Nirmiti Sawant), the owner of the daily is very proud of her newspaper and wants to maintain its status. Bharat is aware of his key position and expects a respect for this. He has ability to get almost any news before anyone else with his managerial skills, his daredevil nature and public relations.

Anna Chimbori (Vinay Apte) is a underworld Don. He is caught by police and Bharat manages to get secret news of his plan of absconding. By accident he meets Maruti Kamble (Sanjay Narvekar), who is a straight forward god fearing truck driver.

Makarand Anaspure is a corrupt politician who is suppurating Anna, and hides him is his farm house. Maruti Kambale reaches the farm house to transport stuff and sees Anna there. Remaining storyline needs to be watched to enjoy it.

Very nice comedy of recent times with Bharat, Sanjay, Nirmiti, Makarand together. If you like comedies, a must watch movie.


Cast
  • Bharat Jadhav भारत जाधव
  • Nirmiti Sawant निर्मिती सावंत
  • Sanjay Narvekar संजय नार्वेकर
  • Makarand Anaspure मकरंद अनासपुरे
  • Vinay Apte विनय आपटे

Director
  • Mahesh Kothare महेश कोठारे

 
Marathi DVD 

1 टिप्पणी:

  1. Another Mahesh Kothare movie.Though it was successful,we want more genius work from Mahesh because he himself has proven it before & after and being his fan of particularly,his production & Direction,we know "his" touch very well.

    उत्तर द्याहटवा