Pages

रविवार, मे १०, २००९

अर्थ मायनस झिरो (Earth Minus Zero)

एक प्राणी पृथ्वी वर येतो. त्याला दोन माणसांना परग्रहावर प्राणीसंग्रहालयात ठेवण्यासाठी आणण्याच्या मोहिईमेवर पाठवलेले असते. अत्यंत प्रगत ग्रहावरुन आलेला असल्यामुळे त्याच्याकडे अद्यावत सामुग्री असते. एका घरात पिझा देणार्या माणसाच्या वेशात प्रवेश मिळवून तो घरातील स्त्री व पुरुष दोघांनाही अतिशय लहान बनवतो. परंतु त्यांची ३-४ वर्षांची मुलगी तेथे येते आणि अपघाताने तो परग्रहावरील प्राणी पण लहान बनतो. मुलीला ते Nintendo खेळणे वाटते. 

थोड्या वेळानी तिच्या मोठ्या भावाच्या लक्षात हा सर्व प्रकार येतो. परंतु त्यालाही नक्की काय करावे ते सुचत नाही. ते त्यांच्या एका शिक्षकांची मदत घ्यायचे ठरवतात. परंतु अपघाताने शिक्षक ही लहान होऊन जातात. आणि मग ती दोनही मुले आपल्या आई वडिलांची कशी सुटका करतात या विषयावरील हे कथानक आहे. स्टार ट्रेक, हानी आय श्रंक द किडस व जुरासिक पार्क अशा चित्रपटातील अनेक कल्पना वापरून हा बनवलेला आहे. लहान मुलांना हा चित्रपट आवडेल असा आहे, लहान मुलांना जरूर दाखवावा.

आपल्या प्रतिक्रिया जरून लिहा.


Parents in a family have been shrunken to the size of ants by a powerful alian, who is on a mission to abduct them for a zoo in on his plannet. The kids try to take their teachers help, but accidently he too gets miniature. 

Now it is upto the kids to save their parents and drive back the Alian back to his plannet.

A sci-fi movie, with borrowed ideas from Start Trek, Honey I Shrunk the Kids, Jurassic Park etc. 


Please write your comments about the movie, the review and the blog.



Cast :
  • Pat Morita
  • Martia Strassman
  • Brock Pierce
Director :
  • Joey Travolta
Movie DVD

    २ टिप्पण्या: