Pages

शुक्रवार, मे ०१, २००९

कास्ट आवे (Cast Away)

एक मोठा, अमेरिकन Executive "चक नोलैंड". हा एक घडयाळाच्या काट्यावर धावणारा मनुष्य असतो. त्याची प्रेयसी PhD विद्यार्थिनी असते. गतिमान जीवन चालू असते. जगभर प्रवास घडत असतो. आणि अशाच एका विमान प्रवासात त्याचे मालवाहक विमान एका वादळात सापडून समुद्रात पड़ते. या विमानातील हा एकटाच अपघातात वाचतो.


जवळच्या एक निर्मनुष्य बेटावर पोचतो. या बेटावर एकलकोंडा कित्येक महीने कसा काढतो याचे फारच सुन्दर चित्रण केले आहे. त्याचे अन्न मिळवणे अणि नवनवीन गोष्टी शिकणे फारच रंजक आहे. एक चेंडुवर स्वतःच्या रक्ताने रंगवून केलेला सोबती व त्याच्याशी संभाषण मन हेलाउन टाकते. शेवटी कंटाळून सुटकेचा प्रयत्न, त्यासाठीची तयारी पाहण्यासारखी आहे.


शेवटी सुटका झाल्यावर लोकांच्या प्रतिक्रिया पण पाहण्यासारख्या आहेत. अनपेक्षित शेवटाने मजा येते. अपघातापुर्विचा हीरो आणि ४ वर्ष एकटाच बेटावर राहील्यानंतरचा हीरो, यात विलक्षण फरक दिसून येतो. टॉम हैंक्स ने त्याच्या शरीरयष्टीत खरोखरच प्रयत्नपूर्वक बदल केला आहे असे दिसून येते. बेटावर पडल्यावर थोड्या वेळाने Fedex ची खोकी येऊ लागतात. तो सगळी खोकी अगदी प्रामाणिकपणे कशी जपून ठेवतो हे देखिल बघण्यासारखे आहे.

या चित्रपटासाठी टॉम हैंक्स ला "Best Actor in Leading Role" चे Nomination 73rd Academy Awards मिळाले होते.


मी स्वतः हा चित्रपट २ दा बघितला आहे, तरीही अजूनही TV वर लागलेला असला तर बघत बसते. २००० सालचा म्हणजे तसा जुना असलेला हा चित्रपट पाहिला नसल्यास जरुर पहावा असा नक्कीच आहे. आणि पाहिला असल्यास प्रतिक्रिया जरून लिहा.


Chuck Noland is a high flying executive, bound to the clock for everything. While flying in a cargo flight, a storm hits and he is the only survivor on an Island. Only exotic things he has are some boxes from the same plane. Alien to the natural world, his survival is a big question mark.

His attempts to get help, his loneliness, struggle for survival are very well portrayed by Tom Hanks. Mind well this movie has one of the most unexpected end you will see.

According to me a 5 star rating, must watch movie.



Cast:
  • Tom Hanks as Chuck Norad टॉम हैंक्स
Director:
  • Robert Zemeckis



 Movie DVD

1 टिप्पणी:

  1. यावर काय लिहिणार, नितांत सुंदर सिनेमा आहे, टॉम हॅंक्स जगलाय ती भुमिका...

    उत्तर द्याहटवा