Pages

रविवार, मार्च १५, २००९

सनई चौघडे (Sanai Choughade)


सई, (आपली हेरोइन), अनाथ होते. जाताना तिची आई सईकडून वचन घेते की तू लग्न कर आणि मागचे सगळे विसरून जा. सईच्या मावस बहिणीला पण, सांगते की सईचे लग्न करून दया. मग उर्मी आणि श्री दोघेही सईच्या लग्नासाठी मुले बघायला सुरवात करतात. आणि मग त्यांना कळते की "Arrange Marriage" इतके सोपे नाही. उर्मी आणि श्री दोघेही यातून गेलेले नसतात त्यामुळे त्यांना, सईसाठी मुले शोधणे अजुनच कठीण जात. शेवटी ते विवाहसंस्थेचा आधार घेतात. एका नविन कंसेप्ट (Old wine in new bottle!!) वर आधारित असलेली संस्था असते "कांदेपोहे". तिथे सईचे लग्न जुळवण्याचा प्रयत्न सुरु होतो.


सईची इच्छा असते की ती ज्याच्याशी लग्न करेल त्याला ती तिचा भूतकाळ नक्कीच सांगेल. आणि तो तिला जर तिच्या भूतकाळासकट स्वीकार करायला तयार असेल तरच ती लग्न करेल. आणि तिला तसा जोडीदार सापडतो (आदित्य ), जो तिच्या प्रेमात पडतो आणि तिला स्विकारायला तयार असतो. (या क्षणापर्यंत आपल्याला तिचा भूतकाळ अर्धवटच माहिती असतो.) आणि जेव्हा संपूर्ण भूतकाळ समोर येतो, तेव्हा आदित्यची खुप धांदल उड़ते. आणि तो गडबडतो. राहुल बोरगावकरने सई चे लग्न करायचे असे ठाण मांडले असते त्यामुळे, शेवटी शेवटी आपल्याला देखिल राहुल बोरगावकरच्या "strategy" बद्दल शंका यायला लागते. .. शेवटी सई आदित्यशी लग्न करते की ती लग्न न करण्याचे ठरवते, हे बघण्यासाठी बघा "सनई चौघडे"




सिनेमा चांगला आहे. पण त्यांनी खरच काही सामाजिक प्रश्नाला हात घातला आहे का आणि खरच तो प्रश्न आहे का अशी शंका मनात येते. काही काही वाक्य "virginity means extra baggage" माझ्यासारख्या व्यक्तीला चाट करून जातात. आपण खरोखरच अमेरिकन स्टाइल होत आहोत का अशी शंका यायला लागते .



श्री आणि उर्मीचा उडालेला गोंधळ अगदी उत्तम मांडला आहे. श्रीचा प्रश्न, "दाखवण्याच्या कार्यक्रमात आपण "कांदेपोहे" का देतो?" मनाला विचार करायला लावून जातो .

अवधुतचे "आयुष्य हे चुलिवरल्या कढईतले कांदेपोहे" खुपच श्राव्य आहे. आणि सुनिधि चौहानने खुपच छान म्हटले आहे. सिनेमा संपल्यावर देखिल हे गाणे ओठावर घोळत राहते.



Direction 
Cast 





आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा.

३ टिप्पण्या:

  1. मराठी मधे चांगला चित्रपट बरेच दिवसात आलेला नाही. तुमचे विश्लेषण उत्तम आहे..शेवटी तारांकन ( किती स्टार्स ते रेटींग) केल्यास चित्रपट पहायचा की नाही ते ठरवता येइल.

    उत्तर द्याहटवा
  2. विश्लेषण एकदम झकास.
    मला स्वत:ला हा सिनेमा concept म्हणुन छान वाटला. पण सिनेमा म्हणुन तद्दन filmi.

    उत्तर द्याहटवा
  3. Sanai Chaughade is a good film with detailed research on clichés used for marriages, mixture of actors who were justified for their roles and a powerful script which keeps the audience glued to their seats towards the end.Watch this Awesome Movie here Online : http://bit.ly/1MOpCuy

    उत्तर द्याहटवा