Pages

बुधवार, सप्टेंबर २१, २०१६

मोड (Mod)

अरण्या महादेवन हिचे घड्याळ दुरुस्तीचे दुकान असते. त्याचप्रमाणे ती तिच्या आत्याकडे हॉटेल मध्ये काम करायला जात असते. वडील दारूच्या आहारी गेलेले असतात, आणि त्यांना किशोर कुमारच्या गाण्याच्या फार शौक असतो अरण्याने अजून लग्नाचा विचार केलेला नसतो. दक्षिण भारतात एका छोटाश्या गावात अरण्या राहत असते. एक दिवस तिच्या कडे एक तरुण घड्याळ दुरुस्त करायला येतो. त्याचे घड्याळ पाण्यात पडून खराब झालेले असते. पैसे देताना तो त्या नोटेचे एक ओरिगामी ची कला वापरून एक पक्षी करून देतो. तो बाकी काहीही बोलत नाही.

आता या तरुणाचा परिपाठ होतो, कि रोज तो पाण्यात पडलेले घड्याळ घेऊन यायचे आणि अरण्या कडे बसून ते घड्याळ दुरुस्त करायचे. रोज रोज हा तरुण येतो, त्यामुळे एक दिवस अरण्या ठरवते कि याच्याशी आज गप्पा मारून याची माहिती काढायची. तेव्हा तो तरुण सांगतो कि त्याचे नाव अन्डी आहे, आणि तो तिच्या शाळेत होता १०ब मध्ये तो शिकत होता. हे ऐकल्यावर अरण्या आठवून बघते, मग घरी असलेला शाळेतला फोटो शोधून काढते, त्यात अंड्य कोण होता ते शोधते. आता तिला खात्री वाटते कि हाच तो अंड्य आहे


आता अर्थातच अरण्याला अंड्य आवडू लागणे हे क्रमप्राप्त असतं. त्याप्रमाणे त्या दोघांचे भेटणे सुरु होते. कधी कधी रात्रभर अंड्य अरण्याच्या घराबाहेर झोपलेला आढळून येतो. अरण्याला हे वागणे काही समाजात नाही. पण प्रेमात पडलेल्या व्यक्तीला सगळेच गोड वाटते, त्याप्रमाणे अरण्या त्याकडे दुर्लक्ष करते. एका दिवस अंड्य बाजारात दिसतो, अरण्या त्याला खूप हाका मारते, पण अंड्य त्याकडे लक्षच देत नाही. जणू काही तो अरण्याला तो ओळखतच नाही अरण्य त्याचा पाठलाग करते आणि मग तिला दिसते कि अंड्य हा एका वेड्यांच्या इस्पितळात जातो आहे. आता तिला अंड्य च्या पूर्वायुष्याची नक्की काय भानगड आहे ते शोधून काढण्याची उत्सुकता लागते. ती घडलेल्या प्रसंगाबद्दल तिच्या आत्याशी बोलते. पण आत्या तिला समजावते. मग एक दिवस रात्री अंड्य अरण्याच्या घराबाहेर झोपलेला दिसतो. सकाळी उठल्यावर अरण्याला तो ओळखत नाही आणि त्याच्या दिशेने चालू लागतो. हे मात्र अरण्याला खूप अजब वाटते.

मग ती सहज म्हणून तिच्या शाळेत जाते तिथे गेल्यावर तिला शाळेतील शिक्षक भेटतात त्यांना ती अंड्य बद्दल विचारते. आणि ती जे ऐकते त्यानंतर तिला एक मोठाच धक्का बसतो. तिचे शिक्षक सांगतात कि अंडी हा १० वर्षापूर्वीच एका अपघातात मारण पावला आहे. मग मात्र अरण्या हा अंड्य नक्की कोण आहे याचा शोध घ्यायला निघते. तिला तिच्या शोधत नक्की काय सापडते हे बघा "मोड" या सिनेमात.

सिनेमा खूपच चांगला आहे. सुरवातीला हा सिनेमा खूपच हळू हळू पुढे सरकतो. पहिला तास इतका कंटाळा आला कि आता हा सिनेमा बंद करू आणि उरलेला उद्या बघू अशी चर्चा देखील केली. पण तो जो "मोड" अचानक आला सिनेमात त्याने मात्र संपूर्ण सिनेमा संपे पर्यंत आम्हाला एकाच जागी खिळवून ठेवू शकला. सिनेमातील गाणी पण चांगली आहेत. सगळ्यांची कामे पण खूप छान आहे. सिनेमा नक्की कुठे वळण घेतोय हे मात्र खूप उशिरा पर्यंत समाजात नाहि. अर्थात या सिनेमाला आयएमडीबी वर खूप जास्त स्टार्स नाहीत. पण सिनेमा बघावाच असा आहे.

Aranya Mahadevan is a busy young girl who runs a watch maintenance shop as well as working at a restaurant part time. Her father is alcoholic but a good singer and a big fan of Kishor Kumar. Aranya has not thought of marriage yet. She is staying in a small town. Her father also hangs out around, but is not allowed in the house. She has her morning coffee with her dad watching a morning train arrive every day.  

One day a young man comes to the shop with a watch which was wet. She repairs it and the guy gives a 100 rupee note folded in a origami swan. He does not speak much and leaves. After that day, this becomes a every day routine. He comes with the same watch soaked in water, get it cleaned and pays 100 rupee folded in origami swan. After few days Aranya decides to talk to him. The name of this person is Andy and he was her classmate in the school. Aranya takes out old schools class photo to verify the fact and finds Andy in that.

Andy continues his routine and slowly Aranya starts to look forward to his visit to the shop. His behavior is bit strange, but Aranya is trying to understand him. He takes her to a near by waterfall. But she was surely falling for him. One day she saw Andy in the market, she calls him out, but he does not even look back and just gets into a bus and leaves. Anranya follows the bus on her bike and she was surprised to see him enter a mental hospital. He certainly does not look like a patient there. Now she is intrigued to find more about him and his past life. She discuses this with her Aunt, but she convinces her that he might be visiting some friend. Once, one morning she finds him sleeping outside her house, but this time instead waking inside the house, he again just starts walking without even recognizing Aranya. This totally surprises Aranya.

Now she visits her old school and learns that Andy passed away in an accident 10 years back. This was certainly a shock of her life. She decides to find out what exactly happening with this person who claims to be Andy. Who is this person? What did she find out, watch in the Hindi movie "Mod".

We enjoyed the movie. It is really interesting, even though it is very slow in the beginning. At one point, we decided to stop it and watch it later, but the story line took a turn and and we got so engrossed in the movie, and we did not realize when the reminder half got over. Both, the acting and the songs are good. The story line it totally unpredictable. Even though Imdb rating does not seem to be high, we would really recommend this one.


Director

  • Nagesh Kukunoor नागेश कुकनूर 


Cast

  • Ayesha Takia  आयेशा टाकिया 
  • Rannvijay Singh रणविजय सिंग 
  • Raghuvir Yadav रघुवीर यादव 
  • Tanvi Azmi तन्वी आझमी 
  • Anant Mahadevan अनंत महादेवन 
  • Nikhil Ratnaparkhi निखिल रत्नपारखी 
  • Rushad Rana रषद राणा 
  • Prateeksha Lonkar प्रतीक्षा लोणकर 
  • Gulfam Khan गुलफाम खान 
  • Usha Bachani उषा बचानी 
  • Yashodhan Bal यशोधन बाळ 
  • Nakul Sahadev नकुल सहदेव