Pages

रविवार, नोव्हेंबर ०८, २०१५

घनचक्कर (Ghanchakkar)


नीतू आणि संजय हे दोघे नवरा बायको, एका चांगल्या घरात राहत असतात. आता हे सगळे कमावलेले पैसे मात्र मेहनतीच्या कमाईचे नसतात. नीतूला खूप फँशनेबल राहण्याची आवड असते. आणि तिची फँशन जरा विचित्र पद्धतीची असते. संजयला तिचे असे कपडे आवडत नसतात, पण संजयचे ती काही ऐकत नसते. आता पुढील  आयुष्यात वाईट काम करणे सोडून द्यायचे असे ह्या दोघांनी ठरवलेले असते.

पण अचानक संजयला एका पंडित नावाच्या माणसाचा फोन येतो. पंडित त्याला म्हणतो की त्याच्या कडून एक महत्वाचे काम करून घ्यायचे आहे. ते काम काय आहे ते ऐकण्यासाठी एका ट्रेनमध्ये बोलवतो. संजयला हे काम करायचे नसते, पण नीतूच्या आग्रहाखातर हा पंडितला भेटायला तयार होतो. पंडित आणि इद्रिस असे दोघे, संजयला बँक लुटण्याबद्दल सांगतात आणि बँकेची ३५ करोडची लुट तिघात समान वाटून घ्यायचे असे पण सांगतात. इतकी मोठी रक्कम बघून, संजय नितूच्या आग्रहाखातर तयार होतो. तिघे मिळून शिताफीने बँक लुटतात. .

संजय म्हणतो कि आता हे पैसे आपण तिघे वाटून घेउ. पण त्याला पंडित आणि इद्रिस तयार होत नाहीत. ते म्हणतात कि आपण लगेच पैसे वापरले तर चोरी पकडली जाइल. त्यामुळे थोडे दिवस हे पैसे लपवून ठेवू आणि ते पैसे संजयच्या घरीच निट राहू शकतील. त्यामुळे संजय सगळे पैसे लपवायला घॆउन जातो. .

थोड्या दिवसाने इद्रिस आणि पंडित, संजयला गाठतात आणि पैसे मागतात. पण संजय म्हणतो की मी तुम्हाला दोघांना ओळखत नाही, व मी काही पैसे घेतलेले नाहीत. पण पंडित आणि इद्रिसला ते खरे वाटत नाही. मग संजय त्यांना डॉक्टरकडे घेऊन जातो आणि मग डॉक्टर पण तेच सांगतात की संजयला अपघात झाला होता आणि मेंदूला मार लागला होता त्यामुळे त्याच्या स्मृतीला काही प्रोब्लेम आहे. आता पंडित आणि इद्रिस ठरवतात कि काहीही करून याच्या कडून पैसे काढून घ्यायचेच. त्यामुळे मग ते त्याला धमक्या द्यायला लागतात. त्रास देतात. आणि मग एक दिवस नीतूचे अपहरण करतात. नीतूला पळवल्यानंतर मात्र संजयला स्वत:ला ते पैसे कुठे आहेत हे शोधावेसे वाटू लागते. त्याला वाटते की नितूला माहिती आहे, पैसे कुठे आहेत. पण ती सांगत नाहिये. नंतर त्याला असे वाटते कि त्याचा एक मित्र आणि नीतू या दोघांचे काहीतरी सुरु आहे, आणि हे पैसे नितूने त्या मित्राला दिले आणि आता नीतू, संजयला सोडून जाणार. शेवटी संजय ठरवतो कि आता जीवाच्या आकांताने तो पैसे शोधायला लगतो आणि इद्रिस व पंडित हे दोघे पण संजयला निरनिराळ्या डेडलाइन्स देत असतत. .

शेवटी पैसे कोणाकडे असतात, ते पैसे सापडतात का हे बघा "घनचक्कर" मधे. सिनेमातील विद्या बालन चे कपडे मजेशीर आहेत. पण तिचे काम मात्र छान आहे. सिनेमाचा शेवट गेस करू शकत नाही, एकदम वेगळा शेवट आहे. विनोदी थ्रिलर या वर्गात हा सिनेमा आहे. सिनेमा बघावाच आहे असे माझे मत नाही, पण बघितला तर पश्चाताप नक्कीच होणार नाहि. .


Neetu and Sanjay are a couple staying in a nice home. Snajay has a criminal background and his income has been from illegal means. Neetu has a weird sense of fashion and is always in some fashionable attire. Sanjay does not like her dressing sense but Neetu does not care a damn about it. At one point Sanjay decides to quit all criminal life and lead a life on a gentleman.

Sanjay receives a phone call form a guy called Pandit. He offers him a one time criminal  job, that could make him enough rich, so that he can quit all these things. Sanjay was not interested but Neetu convinces him to get the details of the offer and decide. Sanjay meets Pandit and Idris in a train and they explain him a plan to rob a bank. The expected sum is more that enough for Sanjay to retire and live happily thereafter. Neetu convinces Sanjay, he joins the two and rob the bank with ease.

Sanjay offers to share the loot, with Pandit and Idris immediately, but both of them are worried that if they split the sum immediately, they may get caught, so decide to hide the money for some time till the robbery matters settle down a bit. They entrust Sanjay with hiding the money in his house.


After six months, Pandit and Idris contact Sanjay and ask for the share of money. Sanjay plainly refuses them saying he does not even know them and he does not have any money. They try hard, but it appears that Sanjay really does not remember anything. Finally they take him to a doctor and doctor says Sanjay has met with some accident and had forgotten better part of his life. Now both Pandit and Idris start using all possible ways to pressurize Sanjay to get the money. They threaten him, for life, but nothing works. Then they abduct Neetu and at that point Sanjay feels the need to seriously search for the money. He tries very hard, but fails to remember, then he develops a feeling that Neetu knows where the money is, and not telling him. He also suspects that Neetu is having affair with one of their friends and they have plan to dump Sanjay and escape with the money. Pandit and Idris are always on back of Sanjay for money with new deadlines every time.

Finally do they find the money, who has the money and who gets them watch in the movie Ganchakkar. Vidya Balan has a different role with weird clothing options. The climax is totally unexpected and beyond any guess. The movie may be classified as Comedy Thrillar. This is not a must watch movie, but you may not regret if you watch it.



Direction
  • Raj Kumar Gupta राज कुमार गुप्ता 

Cast
  • Emraan Hashmi इम्रान हाश्मी 
  • Vidya Balan विद्या बालन 
  • Rajesh Sharma राजेश शर्मा 
  • Parvin Dabas प्रवीण दाबास 
  • Namit Das नमीत दास 
  • Frank M. Ahearn फ्रांक अहीर्न 
  • Shashank Shende शशांक शेंडे 
  • Mahabanoo Mody-Kotwal महाबानो मोडी-कोतवाल 
  • Tarun Dudeja तरुण डूडेजा 
  • Rajkumar Gupta राज कुमार गुप्ता
  • Amar Kaushik अमर कौशिक