बुधवार, जानेवारी २७, २०१०

दिवसें दिवस (divasen divas)


सतीश आणि ज्योती हे दोघे एकाच कॉलेज मध्ये असतात व दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. ज्योतीचे वडील डेप्युटी कलेक्टर म्हणून नोकरी करत असतात. ज्योतीच्या वडिलांना हे लग्न मान्य नसते. ज्योती पळून जाऊन लग्न करते. या दोघांना जीवाला जीव देणारे काही मित्र देखील असतात. सतीशचे खूप मोठे होण्याचे स्वप्न असते. त्याप्रमाणे तो एक मोठा कारखाना काढण्याच्या गडबडीत असतो.

लग्न झाल्यावर ज्योती आणि सतीश मुंबईला राहायला येतात. तेथे एक घर भाड्याने घेतात. घरमालक खूपच चांगले असतात. सतीशची कारखान्याची धडपड सुरु असते, त्यामुळे संसाराला हातभार लागावा म्हणून ज्योती नोकरी करू लागते. त्यानंतर दोघांच्या वेळा अगदीच जुळत नाहीत त्यामुळे जेव्हा ज्योती ऑफिसला जाणार, तेव्हा सतीश झोपलेला, तर सतीश घरी येणार तेव्हा ज्योती झोपलेली असे चित्र दिसू लागते.


जसे जसे सतीशला कर्ज मिळू लागते, तसा तो घरातील बहुतेक वस्तू क्रेडीट कार्डावर विकत घेतो. ज्योतीला या सगळ्या गोष्टीची भीती वाटत असते. तिचे म्हणणे असते, कि या घरात आपले स्वताचे असे काहीच नाहीये, सगळे उधारीवर आहे आणि हे चांगले नाही. सतीशच्या मते हळूहळू सगळे पैसे फिटणार आहेत त्यामुळे काळजीचे कारण नाही. त्यातच सतीशला खूप मोठी ऑर्डर मिळते. सतीशला सगळ्या गोष्टी वेगाने करायच्या असतात, आणि याच गोष्टीला ज्योतीचा विरोध असतो. हे सगळे मतभेद होत असतानाच, अचानक सतीशला मिळालेली मोठी ऑर्डर, सगळा माल बनवून झाल्यावर कॅन्सल होते. त्यामुळे सतीशने घेतलेले सगळे कर्ज त्याच्या डोक्यावर पडते. सतीशला काय करावे ते समाजत नाही. सतीश प्रयत्नाची शिकस्त करतो. तरी त्याला सगळी कडूनच अपयश येते. या सगळ्या तणावामुळे, ज्योती आणि सतीश यांच्या मधील संवादाचे धागे देखील कच्चे होऊ लागतात. शेवटी सतीश त्याच्या कर्जातून बाहेर पडतो का, ज्यो या सगळ्या गोष्टीबद्दल काय निर्णय घेते हे बघा "दिवसेंदिवस" मध्ये.


सिनेमा एक गोष्ट म्हणून बघायचा असेल तर चांगला आहे. पण या सिनेमामध्ये त्यांना नक्की काय सांगायचे आहे हे नीटसे समजले नाही. कुठली गोष्ट करताना फार घाई न करता, हळूहळू करा असा सल्ला द्यायचा आहे का हे समजत नाही. अरुण नलावडेचे कॅरेक्टर मस्त आहे. सगळ्यात जवळचे वाटते. मोहन जोशी नेहमीप्रमाणेच छान. अदिती सारंगधर व सुनील बर्वे दोघेही आपापली भूमिका उत्तम रित्या पार पाडतात. सिनेमात एकाच गाणं आहे पण ते खूप छान आहे. सिनेमा बघावाच असे काही नाही, दुसरे काही करण्यासारखे नसले, तर बघावा. फार वेळ वाया गेला असे वाटणार नाही.


Satish and Jyotsna (Jo) are college friends in Pune. They have a close group of friends too. Jo's father is a government officer. When Jo introduces Satish to her father, he is not happy with Satish as a prospective son-in-law. Satish and Jo get married with help of their friends and decide to settle in Mumbai. Satish is very ambitious and hard working. But he is in a hurry to settle in Business and get rich. He is always thinking about business, loans, finances etc.

As days proceed, Satish is getting established in business. Jo is enjoying her job and though Satish want's her to be at home, want to continue her job. SHe is worried about Satish's speed. He gets credit cards and gets lot of household items on loan. He also buys a car on loan. His business is doing well, and he bags a major order from a big company to supply spare parts for their manufacturing facility.



At the time of delivery of the large order, that gets canceled due to cancellation of the order for the big manufacturer. Satish is broke, and decides to contest a court case to get his money from the big company. In the meantime, his loan installments are not paid on time and one by one banks are approaching for recovery. When unable to pay, he has to do away with the items including the car. To save his company from bankruptcy, he tries to bribe a bank officer and get caught in an ugly crime in the process.

Loosing faith in him, Jo decides to go back to her father, and the drama in the story begins. The divorce case filed by Jo's father and Satish's own company court case. Few unexpected twists and turns added to the story to make in a movie.



In general the movis has a weak message about credit handling and is in the category of may watch but not a must type. Lead roles by Sunil Barve and Aditi Sarangdhar are good. Supporting actors like Mohan Joshi and Arun Nalavade are good too.



Direction


Cast

Link to watch online

सोमवार, जानेवारी १८, २०१०

काल रात्री १२ वाजता (Kaal ratri 12 wajata)



गौतम हा एका शहरात प्रोफेसर म्हणून काम करत असतो. त्याला २ मुले असतात. अचानक त्याच्या बायकोची तब्येत बिघडते म्हणून त्याला गावी जावे लागते. पण काहीच वाहन न मिळाल्याने तो शेवटी सायकल विकत घेऊन त्याने गावी जाऊ लागतो. अचानक जंगलातून जाताना खूप जोरात पाउस पडू लागतो व त्याला सायकल चालवणे अशक्य होते. म्हणून तो समोर दिसणाऱ्या एका मोठ्या हवेलीमध्ये आसरा घेतो.


तिथे त्याला एक इनामदार, त्याची बायको लक्ष्मी, आणि घरी ठेवलेली एक नाचीण "बिजली" भेटते. आणि या सगळ्याच्या एक एक नवीन स्टोरी आपल्या समोर दिसते. तिथेच एक मोती नावाचा शास्त्रज्ञ भेटतो. त्याला पिशाच्च योनीतील लोकांना कायम स्वरूपी देह कसे देता येतील यावर शोध घ्यायचा असतो. हे सगळे बघून गौतम जरा चक्रावून जातो. बिजलीला गौतम म्हणजे "मोहन" वाटत असतो. ती त्याला सारखे म्हणते असते कि तू मला मिठीत घे मी तुझी किती दिवसापासून वाट बघते आहे. शेवटी या सगळ्यांचा एकमेकांशी काय संबंध असतो, व गौतम शेवटी या चक्रातून बाहेर पडू शकतो का हे बघा "काल रात्री १२ वाजता".



अर्थात हा सिनेमा खूपच कंटाळवाणा आहे. नावावरून हा सिनेमा रहस्यमय असावा असा वाटत, पण तसा काहीही नाहीये. उलट यातील संवाद आणि इतर एकूण अभिनय बघून हा सिनेमा विनोदी आहे कि काय असं वाटू लागतो. सिनेमा लवकर पुढे सरकतच नाही. सिनेमातील गाणी तर, अगदीच कंटाळवाणी आहेत. त्यातून प्रत्येक गाण्याची लांबी ७-८ मिनिटाची आहे. अत्यंत कंटाळवाणा सिनेमा आहे. याच्या नावावर अजिबात जाऊ नका. आणि तुम्हाला अत्यंत वाईट सिनेमा कसा असावा हे समजून घ्यायचे असेल तर हा सिनेमा जरूर बघा. हे परीक्षण वाचून जर तुम्ही हा सिनेमा बघण्याची हिम्मत केलीच, तर प्रतिक्रिया जरूर लिहा.



Gautam is a professor, he is traveling to his village to see his wife and two children. He misses the evening bus and could not get any conveyance. Finally he hires a bicycle and starts his way. Halfway through his bicycle tire is punctured, and the rain starts poring. Fortunately he sees a mansion near bye, and he runs in for shelter.


On knocking the door few times, an old servant opens the door. This is a mansion of Inamdar a big shot in the village. There are several people inside. Inamdar is always with a double barrel gun in hand. His wife Laxmi, is mentally ill and keeps laughing out loudly every now and then. She is also violent. Bijali is a dancer, who is forcefully captures and kept in the house. There is another wired scientist Moti, who is researching on Ghosts and if they can take human forms. The movie revels stories for the characters through flashbacks.



Till 12 in the night the stories take twists and turns, so the title. The movie is fully loaded with dialogues full of philosophy of life. Though the movies is supposed to be Mystery at times it sounds funny. In general a movie not worth spending the time unless you are into Philosophy.

Do write your comments.

Cast
  • Pramod Shinde प्रमोद शिंदे,
  • Usha Naik उषा नाईक,
  • Ashok Shinde अशोक शिंदे,
  • Alka Kubal अलका कुबल,
  • Nandu Patil नंदू पाटील,
  • Suhas Kulkarni सुहास कुलकर्णी

Director
  • Bhaskar भास्कर





Wikipedia Link
Link to watch online

सोमवार, जानेवारी ०४, २०१०

आम्ही असू लाडके (Amhi asu ladke)



शालिनी बुध्धिसागर या एका मोठ्या कॉलेज मधील प्रिंसिपल असतात. त्यांचा मुलगा अभिजित हा अगदीच सामान्य बुध्धिचा असतो. म्हणजे त्याला खुप जास्त मार्क वगेरे मिळत नसतात. तर शालिनी बुध्धिसागर यांच्या मते जी मूल हुशार असतात त्यांच्यावरच मेहनत घ्यायला हवी.



आपण बुद्धीत कमी असल्याचे, सारखे डोक्यावर ओझे असल्याने एक दिवस अभिजित आत्महत्येचा प्रयत्न करतो. हे बघून शालिनी बुध्धीसागर खूप वैतागते. तिचा भाऊ रघुनंदन याला फोन करून बोलावून घेते व अभिजीतला थोडे दिवस मामाकडे पाठवण्याचा निर्णय घेतला जातो. अभिजित आत्महत्येच्या धक्क्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करत असतो, तेव्हा अर्चना नावाची एक मुलगी रघुनंदनमामाला भेटायला येते. ती दोघांना शाळेत चित्रकला स्पर्धेचे आमंत्रण देते. अभिजितला खरतर तिथे जायचे नसते, पण दोघांच्या आग्रहाखातर तो तिथे जातो. तिथली शाळा बघून त्याच्या आश्चर्याला पारावर उरत नाही. मतीमंद मुले आनंदाने व निरागसपणे चित्र काढत असतात.



त्यांचे एकदम वेगळे जीवन बघून अभिजित विचार करू लागतो.बऱ्याच दिवसाने हातात ब्रश आणि स्केत्चींग पेपर घेऊन एक सुंदर चित्र काढतो. हे चित्र बघून अर्चना त्याला शाळेत चित्रकला शिकवण्याची विनंती करते. अभिजित देखील त्या शाळेत जाऊन शिकवण्याचा प्रयत्न करतो. सुरवातीला त्याला जमत नाही, पण हळू हळू त्याला तिथे खूप आवडू लागते. येथील जीवन बघून त्याला आयुष्यात दुख म्हणजे काय याची चांगलीच जाणीव होते. अभिजित इथे रमतो, त्याला मतीमंद मुलांसाठीच काम करावे असे वाटू लागते, पण शालिनी बुध्धीसागरच्या मनात अभिजितसाठी दुसरेच प्लान असतात. तिला अभिजीतला हॉलंडला शिक्षणासाठी पाठवायचे असते.


शेवटी अभिजित काय करतो, मतीमंद मुलांचे काय प्रश्न असतात, समाज मतीमंद मुलांकडे कसे बघतो, त्याचप्रमाणे, त्यांचे आई वडिलांचा मुलांकडे बघण्याचा दृष्टीकोन कसा असतो हे बघा "आम्ही असू लाडके" मध्ये.

सिनेमा अत्यंत सुंदर आहे. सुबोध भावे मस्तच. मतीमंद मुलांचे प्रश्न खूप वास्तविकपणे आपल्यासमोर मांडले आहेत. प्रत्येक नात्याचे कसे विविध कंगोरे असतात याचा प्रत्यय देण्याचा खूपच चांगला प्रयत्न केला आहे. गिरीश ओकने एका मतीमंद मुलाच्या बापाचे काम केले आहे, त्याचे विक्रम गोखले, अप्रत्क्षपण॓ जे डोळे उघडतो ते बघण्यासारखे आहे. सगळेच सानावाद अगदी मनाला भिडतात. अभिजीतचे व एका आजीचे संवाद खूपच सुंदर. मतीमंद मुलांचा अभिनय पण खूप सुरेख. या मुलांना कसे काय हे काम करायला जमले, हा प्रश्न मनात आल्याशिवाय राहत नाही. सिनेमा बघताना, डोळे पाणावल्याशिवाय राहत नाहीत. या सिनेमाने तरी समाजाचा मतीमंद मुलांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल असा विश्वास वाटतो. सिनेमा जरूर बघा. तुमच्या प्रतिक्रिया अवश्यलिहा.




Shalini Budhhisagar is Principal of an Engineering College. Her son Abhijit is not doing well in education. Shalini is an ambitious lady and working hard for success. But she feels that world if for bright students, and bellow average students are not worth the attention.




Abhijit is frustrated with the competition and attempts suicide, but is saved. Raghunandan, Shalini's brother offers to take Abhijit to Kolhapur to take care of him till he recovers form the setback. For few months Abhijit is inactive. Once while visiting a school for mentally retarded children, his interest in art is awakened. He starts drawing sketches again.



When Abhijit and Raghunandan visit school to present one of his sketch to the school, they come to know that the Art teacher is getting married and quitting the school. Abhijit was requested to visit the school for few days and teach art to children. Initially reluctant, he agrees.



His initial days were difficult to deal with the mentally retarded children. But slowly he started enjoying it and get involved with the school. While Shalini, his mother keep insisting that he should go for further education, he keep avoiding and ignoring it. All his mind is in the progress of the school and the problems the school is facing. What happens to Shalini's plans for Abhijit needs to be watched in the movie.

Some of the dialogues are really nice like Raghunandan tells Abhjit, "The sorrows you feel are sorrows, and small problems in your day to day life, you have yet to see the real sorrows." Overall a really nice movie and I would like to say all parents should watch it.





Cast


Director

Link to watch online