मंगळवार, डिसेंबर २९, २००९

नॉट ओन्ली मिसेस राऊत (Not Only Mrs. Raut)


विद्या - आनंद त्यांची मुलगी स्नेहा यांचा त्रिकोणी संसार खूप सुखी असतो. अचानक आनंदला कावीळ होते आणि आनंद या दोघींना सोडून निघून जातो. विद्या नोकरी करतच असते. स्नेह वडील गेल्याचे दुख हळू हळू विसरते. स्नेहा वडील सतत आपल्या बरोबर आहेत अशी एक मनाची समजूत करून आयुष्य सुरु करते. विद्याच्या बॉसचे नाव कारखानीस असते. विद्याला ५०००० रुपये द्यायचे असतात तेव्हा कारखानीस तिला मदत करतात. त्या दोघांची मैत्री वाढते.

पण तरीही विद्या त्याचा खून करते. तिचे वकील पत्र घ्यायला म्हणून स्वाती दांडेकर खूप उत्सुक असते. स्वाती दांडेकर हिचा नवरा आणि मोठे दीर दोघेही खूप नामवंत वकील असतात. ती या दोघांच्या हाताखाली वकिली शिकते, पण जेव्हा ती विद्या राउत ची केस हातात घेते, हे ह्या दोघांना पण मान्य नसते, पण तरीही हट्टाला पेटून ती हि केस लढवायची तयारी करते. पण जेव्हा ती विद्याशी बोलायला जाते, तेव्हा विद्या तिच्याशी बोलायलाच तयार होत नाही. विद्याचे म्हणणे असते कि तिने खून केला आहे आणि तिला तो मान्य आहे. तिला केस लढवायची नाही. शेवटी वकील गरुड स्वातीच्या मदतीस येतो. मग स्वाती विद्याने कारखानिसचा खून का केला याचा शोध घेते. शेवटी स्वातीला काय सापडते, ती घरातील वकिलांशी कशी लढते, आणि विद्याला खरच न्याय मिळतो का बघा "नॉट ओन्ली मिसेस राऊत" मध्ये.

सिनेमा अत्यंत सुंदर आहे. जरूर बघावा असा. मधुरा वेलणकर आणि वंदना गुप्ते यांच्या मधील - मिनिटाचे संवाद खूप विचारणीय आहेत. सिनेमात खूपच नामवंत कलाकार आहेत आणि सगळ्यांनी खूपच मस्त अभिनय केला आहे. सिनेमा आपल्यासमोर असा हळुवार उलगडत जातो. सिनेमाची सुरवातच खुनाने होते आणि पण हिने खरच का खून केलाय असा विचार करत असतानाच कथा मस्त उलगडत जाते. सिनेमाचा शेवट देखील आशादायी केला आहे. जरूर बघाच आणि तुमच्या प्रतिक्रिया पण लिहा.

Anand, Vidya and Sneha is a happy Raut family based in Mumbai. Anand is in a small business, and Vidya working as secretary in a firm. Anand dies due to Hepatetis. Sneha is school going, and manages to collect herself saying her dad is always around her. For Sneha's education Vidya decides to stay in Mumbai rather than going back to Goa with her mother.

Vidya has to pay back fifty thousand, Anand had borrowed from a money lender. Vidya takes this money on loan from her boss Mr. Karkhanis. They get friendly and Mr Karkhanis likes to spend time with her.

In turn of some incidences Vidya kills Mr. Karkhanis and reports to the police station the murder she has committed. She refuses to accept a lawyer, but Swati Dandekar a upcoming lawyer insists to take up the case. Her husband and Brother in law are very renowned lawyers in the city. They did now want Swati to take this case, but she insists and take it up. Vidya Raut is not willing to cooperate at all in the begining. Another lawyer Garud helps Swati. Garud was Vidya's lawyer in earlier case. Finally they get Vidya talking and they have to fight one of the toughest case. Swati also has hurdles from her family members in the case. What kind of struggle Swati has to undergo and if she is able to help Vidya to get justice need to be seen in the movie.

The movie opens with the murder scene, and then slowly takes us through the background in flashback. Several renowned actors have given justice to their roles and overall a really good product. A must watch if you like this kind of movies with court scenes. One more feather in Gajendra Ahire's cap I would say.

Do leave comments if you have seen the movie.


Cast

  • Aditi Deshpande अदिती देशपांडे
  • Madhura Velankar मधुरा वेलणकर
  • Ravindra Mankani रवींद्र मंकणी
  • Mohan Joshi मोहन जोशी
  • Milind Shah मिलिंद शाह
  • Vandana Gupte वंदना गुप्ते
  • Ketaki Karadekar केतकी करडेकर
  • Vikram Gokhale विक्रम गोखले

Director
  • Gajendra Ahire गजेंद्र अहिरे

Link to watch online

गुरुवार, डिसेंबर २४, २००९

अलास्का (Alaska)



जैक हा पायलट असतो आणि Boeing ७४७ विमाने चालवत असतो. त्याला २ मुले असतात, जेसी आणि श्यान. अचानक त्याच्या बायकोचा मृत्यू होतो व सगळे जगच त्याला नकोसे होते, त्यामुळे तो नोकरी सोडून अलास्का मध्ये एका कंपनी मध्ये नोकरीला लागतो, जी कंपनी community service करते, म्हणजे मोठ्या गावात जाऊन लोकांना आवश्यक असणाऱ्या गोष्टी पुरवणे. Quency नावाच्या गावात सगळी कडे बर्फ असल्याने विमानाने / हेलीकॉप्तेरणे येणे जाणे करावे लागते. तर जैक त्या कंपनी मध्ये एका विमानाचा पायलट म्हणून पुन्हा नव्याने आयुष्य सुरु करतो. त्याची मुलगी जेसी तिथे लवकरच रुळते, आणि तिला तिथले निसर्ग सौंदर्य आवडू लागते. ती आई गेल्याच्या दुखातून लवकरच बाहेर येते. पण मुलगा श्यान हा इथे रमत नाही. त्याला शिकागो ची आठवण येते, व त्याला इथून बाहेर पडायचे असते. त्याचे व त्याच्या वडिलांचे यावरून सारखे वाद होत असतात. असाच एकदा वाद होतो, आणि जाचक ला emergency call येतो व औषध आणायला त्याला मोठ्या गावात जाणे आवश्यक होऊन बसते. संध्याकाळ होत आलेली असते, त्यामुळे त्याने जाऊ नये असे त्याच्या मुलीला वाटत असत, पण तरीही तो बाहेर पडतो आणि अचानक येणाऱ्या वादळात फसतो.




इकडे १ दिवसभर त्याचा शोध घ्यायला २ हेलीकॉप्तेर जातात पण त्याचा शोध लागत नाही, कारण येणाऱ्या वादळामुळे जैक नेहमीचा रस्ता न घेता, दुसरा रस्ता घेण्याचा प्रयत्न करतो. वडील सापडत नाही, व इतर कोणीच त्यांना शोधायला जाणार नाही ह्याची खात्री पटल्याने, श्यान व जेसी त्यांना शोधायला बाहेर पडतात. शोध घेत असताना त्यांना, काही पोचेर्स पोलर बेअर ची तस्करी करताना दिसतात. ते तश्याच एका पोलर बेअर च्या पिल्लास सोडवतात. त्यानंतर ते पिल्लू या दोघांची पाठ काही सोडत नाही. हे त्याला सोडून पळून जाण्याच्या प्रयत्न करतात, पण तरीहि ते या दोघांना शोधून काढतो. अलास्काच्या तीव्र हवामानाच्या व कठीण प्रदेशात ते कसे वडिलांना शोधून काढू शकतात का व वडील तो वर जिवंत असतात का हे बघा "अलास्का" या सिनेमात.

अलास्काचे रम्य दर्शन इथे या सिनेमात घडते. त्यानंतर या दोघा मुलांचे साहस व प्रसंगावधान इथे खूपच छान दाखवले आहे. पोलर बेअर आपली एकदम करमणूक करतो. पोलर बेअर खरच प्रेमात पडावा असा प्राणी आहे. सिनेमा खूपच छान आहे. नक्की बघावा.

This is a story of Jack, a pilot, and his family. Jack used to work in the company, where he used to ride Boeing 747. He has 2 children, Jessi and Sean. Unexpected death of his wife, puts his family in distress and he decided to leave Chicago, and go to Quency, a small town in Alaska, to start a new life. He joins the company, where he pilots small plane and which helps community to get daily commodities.



His daughter, Jessie, settles quickly with the new environment and Sean still lives in the past. He wanted to go back to Chicago and he abuses his father about this decision. One night, Jack gets a call from the company to get emergency medicine from the big city. As it was about to get dark Jessie, request Jack not to go, but he decides to leave and get stuck in the unexpected snow storm.

Two days, search operation continues, but still crew do not find him. And they decide to stop the operation. When Sean knows about this decision, he decides to find his father himself. Jessie also joins him. These 2 children go in search of Jack. While trying to find their way, they see one camp by poachers, who are poaching of polar bear. These 2 children rescue a baby polar bear from the cage of poachers. This baby polar bear gives them company till the end.

This is a really good movie, not only for children for even for adults. Adventures of Jessi and Sean is really admirable. The movie shows the beautiful nature of Alaska to us. Baby Polar bear is really adorable. A must watch movie.



Cast
  • Thora Birch थोरा बिर्च
  • Vincent Kartheiser विन्सेंट कर्थेइसर
  • Dirk Benedict डिर्क बेनेडिक्ट
  • Charlton Heston कार्लटन हेस्टन
  • Duncan Fraser डंकन फ्रेसर

Director
  • Fraser Clarke Heston फ्रेसर क्लार्क हेस्टन