बुधवार, ऑक्टोबर २८, २००९

ग्रान टोरीनो (Gran Torino)


क्लिंट इस्टवूड यांचा नविन चित्रपट "ग्रान टोरीनो ". ग्रान टोरीनो ह्या नावावरून हा चित्रपट गाड़ी विषई असेल असे वाटते परंतु हा चित्रपट "वॉल्ट कोवालस्की" या पोलिश आमेरिकन माणसाबद्दल आहे. वॉल्ट व्हियेतनाम युद्धातला सैनिक आहे. युद्धानंतर त्याने "फोर्ड" कारखान्यात नोकरी केली. नुकतीच त्याची पत्नी वारली आहे व तो एकटाच राहात आहे. मुलांशी फारसे जमत नसल्यामुळे त्यांच्याशी जुजबी संबंध आहेत.

वॉल्टच्या सभोवताली निरनिराळ्या देशातील लोक रहात आहेत. बाजूच्या कोरिअन कुटुंबातील लोक त्याच्याशी ओळख करण्याचा प्रयत्न करतात परंतु हा दुर्लक्ष करतो. कोरिअन कुटुंबात एक बहिण(सु), एक भाऊ (ताओ) त्यांची आई आणि आजी असे लोक आहेत.

एके दिवशी रात्री त्याच्या गँरेजमधून आवाज येतो म्हणून वॉल्ट बंदूक घेऊन जातो, परंतु चोर पळून जातो. काही दिवसात ताओला काही गुंड त्यांच्यात सामील करून घेऊ पहात असताना त्यांचे भांडण होते, व ते वॉल्टच्या घरासमोर येतात. वॉल्ट त्यांना बंदुकीच्या धाकाने पळवून लावतो. ताओला वाचावल्यामुळे परिसरातील सर्व कोरिअन लोक खाद्य पदार्थ व फुले आणून त्याच्या सोप्यामध्ये ठेवतात.


सु त्याला तिच्या घरी एका समारंभात घेऊन जाते. आणि त्याला चांगले चुंगले जेवायला मिळते. नंतर ताओ त्याची गाडी चोरण्याचा प्रयत्न काबुल करतो आणि त्याला पाच दिवस वॉल्ट सांगेल ते काम करण्याची शिक्षा मिळते. त्या पाच दिवसात वॉल्टला ताओचा कष्टाळू स्वभाव कळतो, आणि तो त्याला मदत करू लागतो.

त्याला अनेक कामे शिकवून तो बांधकामासाठी नोकरी मिळवून देण्याची तयारी करतो. आणि नोकरी मिळवून पण देतो. एक दिवस कामावरून परत येताना ती टोळी ताओला परत त्रास देते. याला वैतागून वॉल्ट त्या टोळीतील एकाला गाठून ठोक देतो आणि त्यांना ताओच्या परत वाटेस जाऊ नका असे बजावतो.

दुसर्याच दिवशी ती टोळी रात्री ताओच्या घरावर अंदाधुंद गोळीबार करते आणि नंतर सु व बलात्कार करतात. या घटनेमुळे ताओ भडकतो आणि वॉल्टच्या मदतीने टोळीवर प्रतिहल्ला करायचा विचार करतो. परंतु वॉल्ट त्याला शांत डोक्याने विचार करून योजना बनवायला सांगतो. आणि ऐन वेळी त्याला फसवून घरात कोंडतो. वॉल्ट एकटाच त्या टोळीवर बदला घ्यायला जातो. पुढील कथानक चित्रपटातच पाहायला हवे. शेवट अनपेक्षित आणि वेगळा वाटला.


Client Eastwood's latest movie Gran Torino. Though the name suggests it might be about a Car, the movie revolves around "Walt Kowalski" (Client Eastwood). He is a Korian War Veteran and has spent his remaining working life in Ford car assembly plant. Now retired, an grumpy man, staying alone in a Michigan neighborhood. Not gelling well with his children's families.

His immediate neighbors and a Hmong family. A shy Thao and his sister Sue. They are staying with their mother and grandmother. Thao's cousin is a gangster and wants to join Taho in his gang. His induction mission is to steal Walt's 1972 Gran Torino Sports car, which is Walt's prized item. Walt threatens and drives away Thao in his attempt.

On a later occasion Walt saves Thao from the gang in an attempt to protect his property with help of his rifle. Sue make friendship with Walt and invites him for a family function. Thao confesses his car stealing attempt and is made to work for Walt for 5 days. Impressed by him, Walt starts training his for a suitable job and gets him a job.


But the gang strikes back, shoots indiscriminately at Thao's house and rapes Sue. Thao is raging with anger wants to take revenge. Walt pacifies him and tells him to think and plan the attack with a cool head. On next day he fools Thao and locks him in his basement. Calls us Sue to tell her how to rescue Thao and goes ahead alone with the mission to the gang's house.

Remaining part of the story telling will be a spoiler, but the end is good and needs to be watched and enjoyed.

If you are a Client Eastwood fan, you much watch this movie which got him awards. Client is proving him again and again with his direction abilities.

Cast
  • Clint Eastwood - Walt Kowalski
  • Christopher Carley - Father Janovich
  • Bee Vang - Thao Vang Lor
  • Ahney Her - Sue Lor
  • Brian Haley - Mitch Kowalski
Director
  • Clint Eastwood


Movie DVD

मंगळवार, ऑक्टोबर २०, २००९

क्षण (Kshan)



"क्षण" म्हणजे निखील, निलांबरी आणि विहंग यांच्या आयुष्यात आलेल्या अविस्मरणीय क्षणांची गोष्ट.

निलांबरी आणि विहंग एकाच कॉलेजमध्ये शिकत असतात. तिथेच त्यांची खूप मैत्री होती आणि दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडतात. विहंगला कविता लिहिण्याचा आणि गाणं म्हणण्याचा छंद असतो. छंद असे म्हणता येणार नाही, तर त्यात त्याला गती असते. कविता आणि गाणी म्हणत असताना तो एका छोट्याश्या कम्पनीमध्ये नोकरी देखील करत असतो. निलांबरीचे आई वडील सधन असतात. जेव्हा निलाम्बरीच्या वडिलांना कळते कि निलांबरी आणि विहंगचे प्रेम आहे तेव्हा ते त्याला होकार तर देतात. पण विहंग थोड्या दिवसाने नोकरी सोडतो आणि निलूच्या वडिलांचे डोके संतापाने फिरते. ते निलूला विहंगबरोबर लग्न करायला नकार देतात. पण निलूचे विहंगवर खूप प्रेम असते त्यामुळे ती वडिलांशी भांडण करते आणि त्यातच वडिलांना हृदयविकाराचा झटका येतो. या प्रसंगाने घाबरून जाऊन निलू शेवटी वडिलांच्या आग्रहास बळी पडते आणि निखीलशी लग्न करते. निखील खूप मोठा बिसिनेसमन असतो. पैश्याला काहीच कमी नसते, तो निलांबरीवर खूप प्रेम देखील करत असतो. हे सगळे सुरु असतानाच निलूला खूप मोठा आजार होतो. थोडा हवापालट म्हणून निलू व निखील दुसऱ्या गावाला जातात आणि तिथेच विहंगची निलू बरोबर पुन्हा भेट होते. आता विहंग खूप मोठा कवी / गायक झालेला असतो.


आता बऱ्याच दिवसाने भेट झाल्याने खूप जुन्या गोष्टी आठवतात. विहंग अजूनही निलू सोडून गेली त्यात क्षणात अडकून पडलेला असतो. निलू, निखील आणि विहंग एकत्र येतात. निलूचा आजार खूपच वाढतो आणि ती या आजारातून बाहेर पडणार नाही असे निखीलला कळते. निलूला पण समजते कि आता आपण फार दिवसांचे सोबती नाही. परिस्थितीमुळे विहंगला सोडून गेल्याचे दुख तिला अजूनही त्रास देत असते. त्यामुळे ती निखील जवळ, विहंगबरोबर राहण्याचे थोडे "क्षण" मागते. पुढे काय होते हे तुम्हीच बघा "क्षण" मध्ये.

सिनेमा जरूर बघावा असा आहे. जरा वेगळी गोष्ट आहे. सिनेमा थोडा दुखद आहे असे म्हणायला हरकत नाही. सुबोध भावेची अक्टिंग मस्तच आहे. सगळ्यात जास्त आवडलेला प्रसंग म्हणजे जेव्हा निखीलला, निलूच्या आजाराबद्दल कल्पना येते आणि तो ते लपवण्याचा प्रयन्त करतो तेव्हा तो एका क्षणी हसतो आणि दुसऱ्याच क्षणी रडतो हा प्रसंग सुबोधने खूप चांगला रंगवला आहे. सिनेमातील गाणी म्हणावी तितकी मला आवडली नाहीत. फक्त शेवटचे गाणे खूप छान आहे. प्रसाद ओक आणि दीपा परब हे दोघांनी पण त्यांच्या भूमिकेला न्याय दिला आहे.

या सिनेमाबद्दल व माझ्या मताबद्दल तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा.




Kshan which literally means moment is a story about moments in lives of Nilu, Nikhil and Vihanga.

Vihanga is an performing artist, struggling to establish as a poet and singer. He has a day job and managing to perform in stage shows. Nilambari or Nilu is a college student few years junior to Vihanga and they fall in love with each other.

Vihanga and Nilu decide to talk to parents of Nilu once Vihanga manages to get a own house and for that he is also waiting for his promotion in job. But one day Nilu's father finds out about their love and invites Vihanga for discussion. He agrees for their marriage.




Vihanga decides to quit the job on Nilu's insistence when he was denied the promotion. He decides to concentrate on his music career. But this upsets Nilu's father and they has a heated argument with Nilu. In the process he suffers a stroke. He emotionally blackmails Nilu to forget Vihanga and agree to marry a person of his choice.

On Vihanga's birthday Nilu gives this bad news and walks away from his life forever. Vihanga is shattered and stuck to those moments in his life. Nilu is married to Nikhil and is trying to be happy with him. They have very good relationship with transparency between them.

Destiny brings them together while Nilu is suffering with an unidentified health condition. And soon they realise Nilu hardly has any time in here life. In her final days when Nilu realised that Vihanga is still stuck with their moments together, convinces Nikhil to lend of her final few moments to help attempt Vihanga to recover from his failed love life.

Though a popular love triangle, the storyline has a charm in it and a must watch if you like movies with a difference. All three main characters are well justified by Deepa Parab, Subodh Bhave and Prasad Oak.



Cast:



Director: