गुरुवार, मार्च २६, २००९

आम्ही सातपुते (Amhi Satpute)




"आम्ही सातपुते" म्हणजे हिन्दीतल्या "सत्ते पे सत्ता" ची कॉपी. जो खर तर Seven Brides for Seven Brothers (1954), या सिनेमाचा रीमेक आहे. गोष्ट त्याच स्वरुपाची आहे. थोडासा बदल केला आहे. सिनेमातील नायक "मुकुंद सातपुते उर्फ़ कांद्या", हा शेतकरी असतो. एकुण ७ भाऊ असतात. सगळे अगदी रानटी. त्यातल्यातात कांद्या जरा माणसाळलेला. सगळ्या भावांची नावे भाजीची. आणि नायिका असते एक अनाथ मुलगी, पूर्णा . खानावळीच्या मालकाने , तिला लहानाचे मोठे केले असते. याला ६ मुली. आणि आपली नायिका मोजता एकुण सात मुली. पूर्णा वयाने खुप मोठी होते, तिने लग्नाचा काहीच विचार केलेला नसतो. सिनेमातील खलनायक तिच्या मागे लागतो आणि त्या रागाच्या भरात ती कान्द्याशी लग्न करण्याचा निर्णय घेते. लग्न करून घरी आल्यावर तिला जो प्रकार दिसतो तो बघून बिचारी अवाक् होते. आणि मग सुरु होतो रानटी लोकांना माणसाळवण्याचा प्रयत्न.

सिनेमातील काही काही विनोद चांगले आहेत. घर कसे बदलते, त्याचबरोबर घरातील लोकांचे बदललेले कपडे पण खुपच फ्रेश आहेत. मला स्वतःला असे "bright" झब्बे खुप आवडले. घरातील पडदे आणि एकुण घरातील interior साजेशे दाखवले आहे. सुप्रिया खरच प्रौढ़ दिसते. सचिन आणि सुप्रिया ची जोड़ी नेहमीप्रमाणेच मस्त. या सिनेमातील गम्मत म्हणजे सचिन या सिनेमात मोठे भाऊ आहे आणि सचिनने सत्ते पे सत्ता या सिनेमा मधे लहान भावाची भूमिका केली होती. अशोक सराफ "अण्णा खानावळवाले" च्या भुमिकेमधे मस्तच शोभून दिसतो.

तुम्हाला सचिन आणि सुप्रिया आवडत असल्यास हा सिनेमा बघा. हलका फुलका विनोदी सिनेमा आहे.
कृपया आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा.



Direction
Cast 

Link


सोमवार, मार्च २३, २००९

लालबागचा राजा (Lalbaugcha Raja)

"लालबागचा राजा", एका गणेश मुर्तिकराची गोष्ट. तिघे मित्र असतात, शिक्षणात अजिबात लक्ष नसते तिघांचेही. त्यातील एकाचे वडिल खुपच श्रीमंत असतात, त्यांचा मूर्ति बनवण्याचा व्यवसाय असतो. पण मुलाचे अजिबात लक्ष नसते धंद्यात ( हा आपला खलनायक "सुभोध भावे"). आणि दुर्दैवाने दुसऱ्या मुलाचे वडिल लहानपणीच जातात. त्याला शिल्पकलेची अतिशय आवड असते. तो वडिलांच्या मित्राकडे जाऊन मूर्ती बनवायला शिकतो ( हा आपला हीरो "सुनील बर्वे".) हातात जादू असते याच्या. मातीतून अगदी सुंदर मूर्ति बनवतो. या त्रिकुटातील तीसरी व्यक्ति म्हणजे आपली नायिका. मग कसा तो मूर्ति बनवतो, त्याला काय काय अडचणी येतात याचा शोध घेण्याचा प्रयत्न म्हणजे "लालबागचा राजा".

ह्या सिनेमामधे काय नक्की दाखवायचे आहे ते मला अजूनही कळलेले नाहीए. सिनेमा अजिबात बघण्यासारखा नाहीए. बघितल्यावर अत्यन्त चिडचिड होते वेळ वाया गेल्याची. कलाकार चांगले आहेत पण ते देखिल इतका वाईट अभिनय करतात की अगदीच त्रास होतो. हा सिनेमा सुबोध आणि सुनीलच्या करिअरच्या सुरवातीचा आहे का काय, अशी शंका मनाला चाटून जाते, पण हा सिनेमा २००६ मधील आहे. सुबोधचा अभिनय इतका वाईट आहे की अरे हा सुबोध आहे हे सांगायला देखिल लाज वाटते. सिनेमा अत्यंत कन्टाळवाणा आहे, इतका की मला हा "review" लिहताना देखील कंटाळा आला आहे.

सिनेमा अजिबात बघू नका. माझे अत्यन्त महत्वाचे ३ तास वाया गेले असा मला वाटले. आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा.


Director
Cast




बुधवार, मार्च १८, २००९

धुडगूस (Dhudgus)




हया सिनेमाची गोष्ट एका तरूण मुलीच्या विधवा झाल्यानन्तरच्या परीस्थितीवर आधारित आहे. "सूरेखा" एका खेड्यात राहणारी तरुण स्वप्नाळु मुलगी. तिचे लग्न ठरते एका मिलिटरीमधे असलेल्या सोल्जरशी. सूरेखा स्वप्नरंजनात रंगून जाते. लग्न करून सासरी येते आणि दुसर्या दिवशी तिच्या नवर्याला युध्यावर ज्ञाण्याचे बोलावणे येते आणि तो सुरेखाला न भेटताच निघून जातो. थोडया दिवसाने सुरेखाला बदल म्हणुन माहेरी घेउन जातात. तिथे असतानाच "ती" वाईट बातमी येते. लग्न झाल्या झाल्याच नवरा गेल्याने सुरेखा सगाळ्यानाच नकोशी होते. तिचे वडिल म्हणतात आता मुलगी तुमची झाली मी तिला माहेरी नेणार नाही आणि सासरी तिला पांढर्या पायाची म्हणुन ठेवायला तयार होत नाहीत. पण महादेवचे बलिदान सरकार ओळ्खुन त्याला २० लाखाचे मरणोत्तर बक्षिस जाहीर करते आणि मग सुरु होतो "धुडगूस".

लोक पैश्यासाठी कसे काहीही करू शकतात याचे यथार्थ चित्रण केले आहे. कधी कधी काही गोष्टी अतीशोयक्तिच्या वाटतात पण त्याकडे काणाड़ोळा केल्यास सिनेमा छान आहे. ह्रुदयापर्यन्त पोचतो. नवरा गेल्यावर सुरेखाच्या मानसिक संतुलानाकडे कोणाचेच लक्ष नसते ते बघून ह्रदय कळ्वळते.

निर्मिती सावन्तची गौराक्का खुप छान. ग्रामीण भागातील जीवनाचे अतिशय सुन्दर दर्शन. भारतात एकूण कसे राजकारण सुरु असते त्याची खुप छान कल्पना येते. विनोदातुन सत्य मांडण्याचा प्रयत्न केला आहें. सिनेमाचा शेवट पण अनपेक्षित केला आहे. मला शेवट आवडला. "सुरवात नको बुडवुस, शेवट नको सांगुस, धुडगूस" .....

सिनेमा एकदा बघण्याइतका छान आहें. वेळ वाया गेला आहें असे वाटणार नाही.


Cast

  • Sanjay Narvekar संजय नार्वेकर
  • Nirmiti Sawant निर्मिती सावंत
  • Bharat Jadhav भारत जाधव
  • Vijay Chavan विजय चव्हाण
  • Pandharinath Kambali पंढरीनाथ कांबळी
  • Suhas palashikar सुहास पळशीकर

Director
  • Rajesh Deshpande राजेश देशपांडे

आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा.

सोमवार, मार्च १६, २००९

सखी (Sakhi)

"सखी" ही गोष्ट आहे निशी आणि सूर्यकांतची. निशी, परिस्थितीला कंटाळुन जीव द्यायला जाते आणि सूर्यकांत तिला वाचवतो. सूर्यकांत ५० शी ला आलेला आणि निशी विशितली तरुण मुलगी. सूर्यकांतला "CRS" मीळते आणि तो गावाकडे येतो. स्वताचे घर आणि शेती असते तिचा संभाळ करणे अश्या उद्देशाने तो गावाकडे परत येतो. मुंबई मधे कोणीच नसते. आणि "CRS" मधे मिळालेले सगळे पैसे एका सहकारी बँकेत ठेवतो. आणि मग निशीची अश्या विचित्र परिस्थितीत भेट होते. निशी त्याच्याकडेच राहू लागते. सुर्यकान्तला अगदी जीवभावाची असलेली कुन्दाताई सल्ला देते की तू निशीला तिच्या पतिकडे पोचवून दे. गावातील लोक तुझ्याबद्दल वाईट बोलू लागले आहेत. पण सुर्यकंताला निशीला अशी वारयावर सोडून देणे पटत नाही. आणि मग त्याला समजते की निशिला गाण्याची खुप आवड आहे, पण परिस्थितिमुळे तिला गाणे शिकता आलेले नाही. तो तिला उत्तेजन देतो आणि मोठी गायिका बनवतो. अत्यंत अबल असलेली निशी, सबल होते आणि सूर्यकांत तिच्या जीवनातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतो.

सोनाली कुलकर्णी आणि अशोक सराफ यांच्या भूमिका उत्तमच आहेत. सुबोध भावे पण त्याच्या भूमिकेत उठून दिसतो. सिनेमाची स्टोरी लाइन ठीक आहे. सोनाली सगळ्याच भूमिके मधे खुप छान दिसते. उषा नाडकर्णीने कुन्दाताई खुपच छान साकारली आहे. अशोक सराफला आता परत फिर असा सल्ला इतका सुन्दर देते, की आपण हेलावून जातो.

पण सिनेमाला "सखी" नाव का दिले आहे हे मला कळलेले नाही. कारण सिनेमा मध्ये एका अबलेला मदत करून स्वताच्या पायावर उभे केले आहे असे दाखवले आहे. मैत्रीच्या नात्यातला सुर इथे गवसला आहे असा मला वाटले नाही..

सिनेमा पाहाण्यासारखा आहे पण "चुकवू नये" असा काही नाही.

Cast :
Director :

लिंक

आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा.

रविवार, मार्च १५, २००९

सनई चौघडे (Sanai Choughade)


सई, (आपली हेरोइन), अनाथ होते. जाताना तिची आई सईकडून वचन घेते की तू लग्न कर आणि मागचे सगळे विसरून जा. सईच्या मावस बहिणीला पण, सांगते की सईचे लग्न करून दया. मग उर्मी आणि श्री दोघेही सईच्या लग्नासाठी मुले बघायला सुरवात करतात. आणि मग त्यांना कळते की "Arrange Marriage" इतके सोपे नाही. उर्मी आणि श्री दोघेही यातून गेलेले नसतात त्यामुळे त्यांना, सईसाठी मुले शोधणे अजुनच कठीण जात. शेवटी ते विवाहसंस्थेचा आधार घेतात. एका नविन कंसेप्ट (Old wine in new bottle!!) वर आधारित असलेली संस्था असते "कांदेपोहे". तिथे सईचे लग्न जुळवण्याचा प्रयत्न सुरु होतो.


सईची इच्छा असते की ती ज्याच्याशी लग्न करेल त्याला ती तिचा भूतकाळ नक्कीच सांगेल. आणि तो तिला जर तिच्या भूतकाळासकट स्वीकार करायला तयार असेल तरच ती लग्न करेल. आणि तिला तसा जोडीदार सापडतो (आदित्य ), जो तिच्या प्रेमात पडतो आणि तिला स्विकारायला तयार असतो. (या क्षणापर्यंत आपल्याला तिचा भूतकाळ अर्धवटच माहिती असतो.) आणि जेव्हा संपूर्ण भूतकाळ समोर येतो, तेव्हा आदित्यची खुप धांदल उड़ते. आणि तो गडबडतो. राहुल बोरगावकरने सई चे लग्न करायचे असे ठाण मांडले असते त्यामुळे, शेवटी शेवटी आपल्याला देखिल राहुल बोरगावकरच्या "strategy" बद्दल शंका यायला लागते. .. शेवटी सई आदित्यशी लग्न करते की ती लग्न न करण्याचे ठरवते, हे बघण्यासाठी बघा "सनई चौघडे"




सिनेमा चांगला आहे. पण त्यांनी खरच काही सामाजिक प्रश्नाला हात घातला आहे का आणि खरच तो प्रश्न आहे का अशी शंका मनात येते. काही काही वाक्य "virginity means extra baggage" माझ्यासारख्या व्यक्तीला चाट करून जातात. आपण खरोखरच अमेरिकन स्टाइल होत आहोत का अशी शंका यायला लागते .



श्री आणि उर्मीचा उडालेला गोंधळ अगदी उत्तम मांडला आहे. श्रीचा प्रश्न, "दाखवण्याच्या कार्यक्रमात आपण "कांदेपोहे" का देतो?" मनाला विचार करायला लावून जातो .

अवधुतचे "आयुष्य हे चुलिवरल्या कढईतले कांदेपोहे" खुपच श्राव्य आहे. आणि सुनिधि चौहानने खुपच छान म्हटले आहे. सिनेमा संपल्यावर देखिल हे गाणे ओठावर घोळत राहते.



Direction 
Cast 





आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा.