मंगळवार, जानेवारी २७, २००९

दिवसें दिवस (divasen divas)


सतीश आणि ज्योती हे दोघे एकाच कॉलेज मध्ये असतात व दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. ज्योतीचे वडील डेप्युटी कलेक्टर म्हणून नोकरी करत असतात. ज्योतीच्या वडिलांना हे लग्न मान्य नसते. ज्योती पळून जाऊन लग्न करते. या दोघांना जीवाला जीव देणारे काही मित्र देखील असतात. सतीशचे खूप मोठे होण्याचे स्वप्न असते. त्याप्रमाणे तो एक मोठा कारखाना काढण्याच्या गडबडीत असतो.


लग्न झाल्यावर ज्यो आणि सतीश मुंबईला राहायला येतात. तेथे एक घर भाड्याने घेतात. घरमालक खूपच चांगले असतात. सतीशची कारखान्याची धडपड सुरु असते, त्यामुळे संसाराला हातभार लागावा म्हणून ज्योती नोकरी करू लागते. त्यानंतर दोघांच्या वेळा अगदीच जुळत नाहीत त्यामुळे जेव्हा ज्यो ऑफिसला जाणार, तेव्हा सतीश झोपलेला, तर सतीश घरी येणार तेव्हा ज्यो झोपलेली असे चित्र दिसू लागते.




जसे जसे सतीशला कर्ज मिळू लागते, तसा तो घरातील बहुतेक वस्तू क्रेडीट कार्डावर विकत घेतो. ज्योला या सगळ्या गोष्टीची भीती वाटत असते. तिचे म्हणणे असते, कि या घरात आपले स्वताचे असे काहीच नाहीये, सगळे उधारीवर आहे आणि हे चांगले नाही. सतीशच्या मते हळूहळू सगळे पैसे फिटणार आहेत त्यामुळे काळजीचे कारण नाही. त्यातच सतीशला खूप मोठी ओर्डर मिळते. सतीशला सगळ्या गोष्टी वेगाने करायच्या असतात, आणि याच गोष्टीला ज्योतीचा विरोध असतो. हे सगळे मतभेद होत असतानाच, अचानक सतीशला मिळालेली मोठी ओर्डर, सगळा माल बनवून झाल्यावर कॅन्सल होते. त्यामुळे सतीशने घेतलेले सगळे कर्ज त्याच्या डोक्यावर पडते. सतीशला काय करावे ते समाजत नाही. सतीश प्रयत्नाची शिकस्त करतो. तरी त्याला सगळीकडूनच अपयश येते. या सगळ्या तणावामुळे, ज्यो आणि सतीश यांच्या मधील संवादाचे धागे देखील कच्चे होऊ लागतात. शेवटी सतीश त्याच्या कर्जातून बाहेर पडतो का, ज्यो या सगळ्या गोष्टीबद्दल काय निर्णय घेते हे बघा "दिवसेंदिवस" मध्ये.




सिनेमा एक गोष्ट म्हणून बघायचा असेल तर चांगला आहे. पण या सिनेमामध्ये त्यांना नक्की काय सांगायचे आहे हे नीटसे समजले नाही. कुठली गोष्ट करताना फार घाई न करता, हळूहळू करा असा सल्ला द्यायचा आहे का हे समाजत नाही. अरुण नलावडेचे कॅरेक्टर मस्त आहे. सगळ्यात जवळचे वाटते. मोहन जोशी नेहमीप्रमाणेच छान. अदिती सारंगधर व सुनील बर्वे दोघेही आपापली भूमिका उत्तम रित्या पार पाडतात. सिनेमात एकाच गाणं आहे पण ते खूप छान आहे. सिनेमा बघावाच असे काही नाही, दुसरे काही करण्यासारखे नसले, तर बघावा. फार वेळ वाया गेला असे वाटणार नाही.




Satish and Jyotsna (Jo) are college friends in Pune. They have a close group of friends too. Jo's father is a government officer. When Jo introduces Satish to her father, he is not happy with Satish as a prospective son-in-law. Satish and Jo get married with help of their friends and decide to settle in Mumbai. Satish is very ambitious and hard working. But he is in a hurry to settle in Business and get rich. He is always thinking about business, loans, finances etc.

As days proceed, Satish is getting established in business. Jo is enjoying her job and though Satish want's her to be at home, want to continue her job. SHe is worried about Satish's speed. He gets credit cards and gets lot of household items on loan. He also buys a car on loan. His business is doing well, and he bags a major order from a big company to supply spare parts for their manufacturing facility.



At the time of delivery of the large order, that gets canceled due to cancellation of the order for the big manufacturer. Satish is broke, and decides to contest a court case to get his money from the big company. In the meantime, his loan installments are not paid on time and one by one banks are approaching for recovery. When unable to pay, he has to do away with the items including the car. To save his company from bankruptcy, he tries to bribe a bank officer and get caught in an ugly crime in the process.

Loosing faith in him, Jo decides to go back to her father, and the drama in the story begins. The divorce case filed by Jo's father and Satish's own company court case. Few unexpected twists and turns added to the story to make in a movie.



In general the movis has a weak message about credit handling and is in the category of may watch but not a must type. Lead roles by Sunil Barve and Aditi Sarangdhar are good. Supporting actors like Mohan Joshi and Arun Nalavade are good too.





Cast

  • Sunil Barve सुनील बर्वे
  • Aditi Sarangdhar अदिति शारंगधर
  • Mohan Joshi मोहन जोशी
  • Arun Nalavade अरुण नलावडे
  • Yatin Karyekar यतिन कार्येकर
  • Mangesh Desai मंगेश देसाई
  • Bharati Achrekar भारती आचरेकर


Director

  • Gajendra Ahire गजेन्द्र अहिरे


Link to watch online